Skip to main content

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 19/04/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले.

जगणे सुरात आले

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 19/04/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाच्या
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना

अग्नी ५

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 19/04/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या इतिहासात महत्त्वाचे ठरावे असे एक पाऊल डी.आर.डी.ओ.च्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी टाकले आहे. आज सकाळी ८ वाजून ०७ मिनिटांनी भारताचे अग्नी -५ हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले गेले. जवळजवळ तीस मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर या क्षेपणास्त्राची ही पहिली चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे या अभियानाचे निदेशक श्री. अविनाश चंदर यांनी जाहीर केले. डी. आर. डी. ओ. चे महानिदेशक श्री. व्ही. के. सारस्वत हेही या यशाबद्दल अत्यंत आनंदी होते. या प्रक्षेपणास्त्राबद्दल जास्त माहिती इतरत्र उपलब्ध आहेच.

भारत सरकार ने निषेध नोंदवला

लेखक छो.राजन यांनी गुरुवार, 19/04/2012 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
शह रुख खान ला नेव योर्क ऐइर्पोर्त वर चौकशी साठी ३ तास थांबवले. भारत सरकार ने निषेध नोंदवला! आपल्याला काय वाटते! तो काय एब्धी मोठी व्यक्ती आहे कि परकीय मिनिस्टर कृष्ण नि अमेरिकाला प्रश्न विचारा?आणि अजून ष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजनामध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कलमाडींवर सध्या खटला सुरू आहे. कझाकिस्तानमध्ये 27 एप्रिल रोजी 73वी आशियाई ऍथलेटिक्‍स संघटनेची बैठक आहे. कलमाडींसह ललित भानोत यांनाही या बैठकीस जाण्याची परवानगी मिळाली आहे. हे कशे चालते? एवढा ब्राष्टाचार करून परत (मी तो नवेच!) '

पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय

लेखक विकास यांनी गुरुवार, 19/04/2012 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपिठीका: "पौराणिक विमाने" या चर्चेच्या निमित्ताने येथे माशेलकरांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला होता. त्यातील माझ्या लेखी महत्वाचा आणि व्यावहारीक भाग पेटंट्सच्या संद्रर्भात होता. त्याला मी जरी हा प्रतिसाद दिला होता, त्यातील माशेलकरांसंदर्भातील भागः
विकीवरील माहितीप्रमाणे, ‘Managing Intellectual Property’ च्या २००३ - २००५ च्या जागतीक सर्वेक्षणानुसार माशेलकर हे पेटंटक्षेत्रातील जगातील पन्नास दिग्गजांपैकी एक आहेत.

आणखी एक स्वप्नं..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 19/04/2012 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. गीतकार म्हणून धडपड करताना... आणखी एक दगड पार केला गेला "ये प्रिये.." च्या रुपाने. आज ही ध्वनीमुद्रीका ऑफिशियली प्रकाशीत झाली. पानू रे आणि सुरोजित रे या द्वयींनी मराठी संगीतक्षेत्रात या अल्बमच्या निमित्ताने केला..

चितगांव संग्रामाचा ८२ वा स्मृतिदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 18/04/2012 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक १८ एप्रिल. ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी मास्टरदा उर्फ हुतात्मा सूर्यसेन यांनी भारतीय प्रजासत्ताक सेनेच्या अवघ्या ६४ सैनिकांनासह रात्री ९.५० ला एल्गार केला आणि अगदी काही दिवसांसाठी असेल पण चितगांव स्वतंत्र केले आणि चितगांव वर तिरंगा फडकावला. या सेनेत सर्वात लहान योद्धा होता तो अवघ्या १४ वर्षांचा सुबोध रॉय! स्वातंत्र्यवेडाने पछाडलेले मूठभर शिपाई विरुद्ध इंग्रजांचे प्रचंड संख्येने आलेले प्रशिक्षित व शस्त्रसज्ज सैन्य या अतिविषम संग्रामात अनेक विरांच्या आहुती पडल्या आणि मास्टरदांना माघार घ्यावी लागली. मात्र सेना विखुरली ती पुन्हा एकदा एकवटण्यासाठीच.