Skip to main content

तेझ : एका तिकिटात ५ चित्रपट

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 30/04/2012 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी 'एका तिकिटात दोन बालनाट्ये आणि आइसक्रीम मोफत' अशा जाहिराती आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत.

देव झाला दानव

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी रविवार, 29/04/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या हातात भरपूर वेळ आणि मोफत लेखणी करण्याची पर्वणी आभसी जगतात विनाशुल्क उपलब्ध असल्याने असल्यामुळे आम्ही कोणावरही काहीही खरडू शकतो. असे अनेकांना वाटते ,मलाही वाटते म्हणून ही खरडेगिरी. सचिन ला देव मानणारे अचानक त्याने खासदारकी स्वीकारली म्हणून दानव समजू लागले आहेत, इंटर नेट वर त्याला शिव्याची लाखोली वाहिली जात आहे. जणू काही त्याने निशाने पाकिस्तान स्वीकारले आहे असा गजहब करण्यात येत आहे. पूर्वी हा देव मातोश्री वर दर्शन द्यायचा आता कृष्ण कुंज मध्ये त्यांचे बस्तान हलल्यामुळे अपेक्षित त्या प्रतिक्रिया राजकारणी मंडळींकडून आल्या.

पानी आनाया जावू कशी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/04/2012 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
पानी आनाया जावू कशी हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ|| दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया? आगं विहीर कोरडी, हापसा तुटका नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१|| दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी?
काव्यरस

उत्कल दिवस २०१२

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 29/04/2012 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी खडगपूरमध्ये मला देशाच्या विविध भागातील लोकांचा सहवास मिळाला. त्यांच्या चालीरिती, सण वगैरे जवळून बघायला मिळाले. अर्थात अन्य प्रांतात स्थायिक झालेल्या कुणालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात मला अजुन एक असाच कार्यक्रम बघायला मिळाला, तो म्हणजे उत्कल दिबस (हो, पूर्व भारतात (बंगाल, ओडिशा, बिहार इ.) व चा उच्चार ब/भ असाच केला जातो) एका रुढार्थाने मागास राज्याचा स्थापना दिवस म्हणजे नक्की असणार तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण या कार्यक्रमाचा आयोजक माझा मित्रच असल्याने थोडेफ़ारतरी भव्य-दिव्य असणार याची कल्पना आधीच मिळाली होती.

पुणे कट्टा: १ मे २०१२

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 28/04/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

मायक्रोव्हेवमधील कैरीचा छुंदा

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 28/04/2012 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ कप कैरीचा कीस दीड कप साखर (कैरीच्या आबंटपणानुसार कमी-जास्त ठरवावे) १ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून भरडसर जीरेपूड १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार १ टेस्पून पाणी . पाकृ: एका मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये कैरीचा कीस, मीठ व हळद एकत्र करुन १० मिनिटे बाजूला ठेवावे.

अग्नी-५, लेक टॅपिंग व रिसॅट-१...

लेखक अमितसांगली यांनी शनिवार, 28/04/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात घडलेल्या तीन घटनांनी भारतीयांनी जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतत चाललेल्या भारताला या घटनांनी पुन्हा एकदा भरारीचे पंख मिळाले आहेत. १. अग्नी-५ अग्नी-५ या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे सरंक्षण क्षेत्रात भारतीयांनी जगाला दखल घ्यावयास भाग पाडले. आज पर्यंत भारताच्या सर्व शहरांवर चीन हल्ला करू शकत होता. अग्नी-५ मुळे आता चीनमधील प्रमुख शहरे तसेच संपूर्ण आशिया व आफ्रिकेतील काही भाग आपल्या टप्यात आला आहे. चीनची वाढती महत्वाकांक्षा रोखण्यासाठी व आशियात शांतता निर्माण करण्यासाठी अग्नी-५ ची अत्यंत आवश्यकता होती. २.

माझे ब्रह्मज्ञान

लेखक यकु यांनी शनिवार, 28/04/2012 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्‍य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्‍या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्‍ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p ------------------------------------- मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्‍या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे?