Skip to main content

आठवण

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 09/05/2012 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या "मेरी मा" हे "तारे जमीन पर" ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या "प्रेमा स्वरूप आई" ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती.

घटस्फोटाचे प्रमाण का वाढले आहे ?

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 09/05/2012 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल घरी जितक्या लग्नपत्रिका येतात तितकेच, किंबहुना एखाद दोन चढच, घटस्फोटांचे प्रसंग कानावर येतात. मर्जीप्रमाणे शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण का वाढले आहे ? दोन घटना अगदी समोर आहेत. संकेत अभियांत्रिकी पदवीधर. बाळबोध वळणाचे मराठी घराणे. सहा आकडी पॅकेजवाली नोकरी. दिल्लीमध्ये संकेत कंपनीच्या फ्लॅट मध्ये रहात असलेला. कर्नाटक सीमेवरच्या लहानशा गावातली साध्या घरातली मध्यमवर्गीय सुशिक्षित पण जॉब न करणारी मुलगी पाहून लग्न झाले. दोनेक महिन्यांनी वधूवर संकेत अन संमिता दिल्लीला राहावयास गेले. साधारण सहा महिन्यांनी कुरबुरी कानावर येऊ लागल्या.

मुख न लपवून जगा

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 09/05/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुख न लपवून जगा, आणि न मानही झुकू द्या की दुःख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा की अंधारात बुडून, तारे नाहीसे न होती अंधेर्‍या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला न जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा हे मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत, ते तुम्ही ओळखालच!

" तो एक पदर मायेचा ... "

लेखक विदेश यांनी बुधवार, 09/05/2012 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक पदर मायेचा आधार किती आईचा वादळात सामर्थ्याचा भयमुक्ती उपदेशाचा नजराणा संस्काराचा संदेश शांत जगण्याचा रागास शांत करण्याचा मस्तकास थापटण्याचा तो दर्शक सन्मार्गाचा तो रक्षक कल्याणाचा तो पूजक सौंदर्याचा
काव्यरस

ईडल्या-चटणी / ईडल्या-सांबार

लेखक कुंदन यांनी बुधवार, 09/05/2012 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी , इकडे बरेच सौथंडियन लोक असल्याने असेल कदाचित , पण मस्त झकास अप्रतिम असा तयार ईडली आटा मिळतो. पण एक लफडे असे आहे , एक पाकिट आणले की त्यात जवळपास ३६ ईडल्या होतात; त्यामुळे मग २-३ सांजेला ईडली-चटणी / ईडली-सांबार असा बेत असतो. फारच हुक्की आली तर डोसे करतो. तर परवा असेच एक पाकिट आणले. मग आज सकाळी इडली-चटणी चा बेत केला. चटणी पा़कृ यापुर्वी वालाच्या शेंगांच्या बरोबर दिली गेल्या आहे.ईडली करणे सोपे आहे , ईडली पात्र मात्र हवे त्यासाठी. एका कढईत १ ग्लास पाणी उकळ्त ठेवा अन तोवर ईडली पात्राला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे ईडली त्याला चिकटत/चिटकत नाही ( प्रा डॉ शुध्लेखन बघा ब्वॉ जरा).

According To Accordion

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 08/05/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
निमित्त होतं ते Accordion या जादुई वाद्याच्या १८३व्या वाढदिवसाचं... मा.चौराकाकांच्या मुळे मी व मोदक (दिनांक ६ मे रोजी) या एका अभूतपूर्व कार्यक्रमाचे सह-भागी होऊ शकलो...होय सहभागीच..!

...तू कुठे आहेस गालिब?...

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 08/05/2012 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी 'सकाळ' मध्ये सौमित्र ची 'तू कुठे आहेस गालिब?' ही कविता वाचली होती. खूपच आवडली होती. पण कात्रणं वगैरे करून ठेवायचा आळस आणि रद्दी टाकायची घाई या नादात ती पुरवणी गेली कुठेतरी. पुरवणी तर गेली पण कविता मनात घर करून बसली होती. युट्युब वर सौमित्र चे कविता वाचनाचे व्हिडिओ वगैरे धुंडाळले पण नाही सापडली. आणि परवा नकळत पणे हातात आली. झालं असं की घराजवळंच पुस्तक प्रदर्शन लागलं होतं, तिथे पुस्तकं बघता बघता सौमित्रचंच एक पुस्तक हाती आलं. अधाश्यासारखी झडप घातली आणि त्यात ही कविता कुठे आहे आहे का ते शोधायला लागलो. आणि काय सांगू महाराजा...चक्कं सापडली.