Skip to main content

हे धदंड तत्तड...पेट्रोल अजून महाग झाले

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 23/05/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! पेट्रोल साडेसात रुपयांनी महाग झाले धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13411047.cms सरकारला शिव्या घालून, संताप करुन काही उपयोग नाही :) त्यापेक्षा नाचलेले काय वाईट ! :) धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! नाचा रे नाचा !!! आज सोनियाचा दिन आला... धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

पहिले क्रुसेड........... भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 23/05/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
या सगळ्या क्रुसेडमधे ख्रिश्चनांनी फक्त एकच जिंकले. सलादीनच्या युद्धाचा अभ्यास करता करता जमा झालेली माहिती थोडक्यात मांडत आहे. पिटर द हर्मिट योध्यांना जेरूसेलेमचा रस्ता दाखवताना,,, क्रुसेडची पार्श्वभूमी. ६२२-१०९० इतिहासातील घटना त्यावेळी अचानक उद्भतवल्या असे वाटले तरी आत्ता त्याचा अभ्यास करताना त्या तशा अचानक उद्भवल्या नाहीत हे आपल्याला कळते. ते कळाल्यावर त्या तशा का घडल्या याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अर्थातच राष्ट्रपतीपदाचे आणखी अवमूल्यन.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 23/05/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esakal.com/esakal/20120523/4617244213726099706.htm आजच्या सकाळमधील आजची बातमी वाचण्यासारखी आहे. राष्ट्रपतीपदाचे आपले एक उमेदवार संगमा हे सोनीयांच्या पाठींब्यासाठी त्यांची माफी मागायला तयार आहे. ( त्यांनी त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केला होता). प्रंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर सर्व पदांचे अगोदरच बर्‍यापैकी अवमूल्यन झालेले आहे किंवा होत आहे. आता राष्ट्रपतीपदाचे अवमूल्यन होऊ नये ( होऊन ये) असे वाटते.

दक्षिणायन

लेखक अमृत यांनी बुधवार, 23/05/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
'एक्कड की सार?' ऑटोवाल्याचे शब्द कानावर पडले तसा मी भानावर आलो. 'सार... मिटरसे चलते सार?' 'हा जुबिली हील्स जाना है चलो' ऑटोत बसलो तसा परत मुसळभार पाऊस सुरू झाला. काल दिवसभरापासून याने पिच्छा पुरविला होता. २७ तासांचा शिणवणारा प्रवास त्यात कडी म्हणजे तिनहीवेळा जेवणात खावा लागलेला 'राइस', सोबतीला कुणीच नाही आणि प्रत्येक स्टेशनवर थांबा घेणारी ट्रेन अरेरे सगळच 'सोनेपे सुहागा'. गेल्या महिनाभरापासून या राइसने नाकी नऊ आणले होते. त्रिवेंद्रमचं एक महिन्याचं ट्रेनिंग कसं पटकन संपलं काही पत्ताच लागला नाही. या काळात ट्रेनिंग कमी आणि संपूर्ण केरळचं टुरिंग मात्र मस्त झालं.

गोष्ट एका अंगठीची

लेखक JAGOMOHANPYARE यांनी बुधवार, 23/05/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या दारासमोर पायरीवर रामा एकटाच विमनस्क अवस्थेत बसलेला होता. गेले दोन दिवस लोकांचे प्रश्न ऐकून ऐकून बिचार्‍याचा जीव कावला होता. 'कमळी कुठं गेली रे? ' 'रामा, तिला कुणी पळवलं तर नसेल? ' 'तिचं कुणासंगट लफडं होतं का रे?' 'गावात सगळीकडं शोधलं म्हंतोस, खरं गावातल्या पडक्या हिरीत बघितलास काय रे?' एकेकाचा एकेक प्रश्न. आणि एकाही प्रश्नाचं उत्तर बिचार्‍या रामाकडे नव्हतं. 'पाचामुखी परमेश्वर' असं म्हणतात खरं, पण अशा वेळेला लोकांच्या तोंडून परमेश्वर नव्हे सैतान बडबडत असतो, याचा पुरेपूर अनुभव रामा दोन दिवस घेत होता. शब्द वेगळे, प्रश्न वेगळे परंतु सगळ्यांचा अर्थ एकच होता- कमळी गायब आहे.

इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे !

लेखक धुमकेतू यांनी बुधवार, 23/05/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " असे का म्हणतात ? शेतकऱ्याला बळीराजा असे का म्हणतात ? पुरानाप्रमाणे वामनाने बळीला त्याच्या मस्तकावर पाय ठेऊन पाताळात पाठवले अशी आख्तायिका आहे . बळीराजा जर वाईट होता आणि म्हणून वामनाने ( म्हणजे विष्णूने ) त्याला पाताळात पाठवले असेन तर मराठी मध्ये "इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " अशी शब्दरचना का आहे ?

क्रौर्याची परिसीमाः

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 23/05/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
क्रौर्याची परिसीमाः बीडमधील डॉ. सुदाम आणि डॉ. सरस्‍वती मुंडे यांच्‍या रुग्‍णालयात गर्भपात करताना एका महिलेचा मृत्‍यू झाल्‍यानंतर अनेक खळबळजनक प्रकार उघडकीस येत आहेत. डॉ. मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग चिकित्सेसाठी तसेच मुलीचा गर्भ पाडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून रिघ लागत होती. अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी या दाम्पत्याने चार कुत्रे पाळले होते.