Skip to main content

रंगात रंगलो मी - रंगाविना

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/05/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक मित्रहो, नव्या तंत्रज्ञानाच्या युगाने आपल्याला अनेकविध साधने आपल्या मनोरंजनासाठी दिली, आपल्या आनंदाच्या निधानाच्या निकट जाण्याची संधी दिली. संगणक क्षेत्रात सहा फूट बाय चार फूट बाय तीन फूट या आकाराच्या संगणकावर कामाची संधी मिळाली.पण तेथे आजच्या हपिसांसारखी " चंगळ" करण्याची संधी नव्हती. एकाच रंगाचा मॉनिटर, एकच ओळ दुरूस्त करता येणारा " एडीटर" व आठ एम बी च्या दोन हार्डडिस्क ई च्या दिव्य कॉनफिगरेशन वर काम करता करता पी सी एक्स टी आला. मग क्विक बेसिक मधे रनिंग लाईट , गणपतीची आरास ,बीप चा वापर करून जन गण मन ई. उद्योग इतकी तरी " चंगळ" वाट्याला आली. मग आपल्या घरी पी सी आला रे आला .

'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 26/05/2012 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
थोडीशी पार्श्वभूमी: सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले.

रुपया घसरला. तो घसरणारच होता आणि त्याचे कारण आपणच आहोत.

लेखक स्वानंद यांनी शनिवार, 26/05/2012 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो बरेच दिवस पेपरमध्ये, मिपावरती वाचनामध्ये रुपया घसरला त्यामुळे सरकारने धोरण बदलावे, सरकारने हि पावल उचलावी.

' जनसेवा दुग्ध मंदिर '

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/05/2012 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे मोठ्या दिमाखात उभ असलेल ' जनसेवा दुग्ध मंदिर ' , लक्ष्मी रोड पुणे हे बंद झाले अशी वार्ता कानावर चेपू माध्यमातून आहे. अनेक वर्ष चविष्ट बेसन लाडू, खरवस, श्रीखंड वाडी आणि नंतर अनेक नाश्त्याचे पदार्थ येथे मिळत असत. गेल्या काही वर्षात इतर खाद्य पदार्थ द्यायची देखील येथे प्रथा पडली होती.

पुन्हा एकदा गॅस बर्नर...

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 25/05/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली शहरात ग्राहक पेठ भरतात्,खरेदीच्या विविध वस्तु यात विक्रीस ठेवलेल्या असतात. अगदी लोणच्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंतं बरेच काही पहावयास मिळते. अशाच एका बाजार पेठेत माझे तिर्थरुप गेले आणि एक वस्तु त्यांना तिथे दिसली व उपयोगी वाटुन ती त्यांनी खरेदी केली. ती वस्तु म्हणजे एक जाळी असुन ती गॅस बर्नरवर ठेवतात, त्यावर वांगे,पापड इं. भाजणे सोपे जाते आणि बर्नरही खराब होत नाही. हाच बर्नर जाळी ठेवल्यावर कसा दिसतो, ते तुम्हाला दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

लिंबाचे लोणचे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 25/05/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १० लिंब २ चमचे हळद दिड चमचे लाल तिखट पाव चमचा हिंग ८ चमचे मिठ ३-४ चमचे मोहरी डाळ दिड चमचा मेथी २ मोठ्या पळ्या तेल (मी जास्त लिंबांच केलय लोणच.