श्री क्षेत्र हरिहरेश्वर-दक्षिण काशी-१
हरिहरेश्वर हे माझं अजोळ.आणी त्याच्या अठवणी मी मागच्या दोन भागात इथे लिहिल्या आहेत. :-)
http://www.misalpav.com/node/21739 भाग-१
http://www.misalpav.com/node/21740 भाग-२
आता हे हरिहरेश्वर आणी काळभैरव यांचं सचित्र दर्शन.लहानपणी सुट्टीचा मे महिना,मी हरेश्वरला निव्वळ धुमाकुळ करण्यात घालवायचो,मग बरेचदा त्यात आज्जीपण मावशिला/आइला म्हणायची,देवळाशी जाऊन आलात का..? अता आंम्ही बंद्रावरुन हिंडता हिंडता/वहात वहात किती वेळा देवळाला जाऊन लागलो,याला गणति नसायची.पण तेच आइ/मावशी यांच्या बरोबर जायचं म्हटलं,की वेगळीच मजा असायची. तिकडे काहितरी खादाडी करायला मिळेल हे मुख्य आकर्षण!आणी काळभैरवाच्या देवळात कळे लाऊन कुणाचं भूत बीत उतरवत असतील,तर ते पहाण्याचं रम्य ;-) गूढ आकर्षण...! अता मी हरेश्वरला गेलो तर बर्याचदा देवळाकडे फिरकत सुद्धा नाही...! ती आस किंवा ओढ राहिली नसावी कदाचित.पण तरिही मला या दोन्ही देवळां विषयी मनामधे ममत्व मात्र नक्की आहे. कारण तिथे होणारे उत्सव यात्रा आणी देऊळभागाचं होणारं ''नाटक''-प्रतिवार्षिक..! हेही सगळं जुन्या अठवणींमध्ये रजिस्टर झालेलं आहेच.आता तर हरिहरेश्वर हे केवळ धार्मिक क्षेत्र न रहाता एक पर्यटन केंद्र झालेलं आहे. तेंव्हा बघुया एक सचित्र झलक,आधी मंदिर परिसराची आणी नंतर प्रदक्षिणातीर्थ मार्गाची :-)
प्रवेशद्वार...
ही दोन्ही देवळांच्या प्रांगणात प्रवेश होण्यापूर्वी लावलेली तोफ...म्हण्जे पूर्वी धर्मशाळेच्या आजुबाजुला कुठेशी पडुन होती..अता इथे नीट स्थानापन्न केलीये.
दीपमाळ..
ही क्षेत्राची संक्षिप्त माहिती..
दोन्ही देवळं आणी सभामंडप...
हे कालभैरवाचे द्वार-लाकुड/नक्षीकाम आत बाहेर तसच रेखिव आहे...
या आतल्या घंटा.. यातल्या लाकडाचा लोलक असलेल्या घंटेचा आवाज लय भारी येतो,अजुनही मी आत गेलो,तर आमची पहिली घंटा हीच असते... :-)
आता ह्यो खांब...लहानपणी आईबरोबर जायचो,तेंव्हा बरेचदा कुणितरी या खांबाला अंगात येऊन चिटकलेलं बघायचो.आई म्हणायची ''बाधा'' उतरवतायत. मी पण भयंकर मस्ती करतो,म्हणुन मलाही चिकटवलं पाहिजे-असं तिचं मत होतं. मी तिच्या नकळत बरेचदा खांबाला चिकटून पाहिलंही..पण मला एकदाही खांबानी धरलं नाही ;-) तो आत् -म्यास काय धरणार? ;-)
या काळभैरवाच्या मूर्ती..
त्यांना कळेबिळे लाऊन वर चंदनाची पुजा झाली कि त्या अश्या दिसतात...
अता हे हरेश्वराच द्वार-
आत गेल्यावर डावि/उजविकडे गरुड/नंदि/गणपति यांचं दर्शन होतं
पुढे हे कासव आणी आजुबाजुला जयविजय आहेत...
अता कासव आणी जय विजय कशाला..? शंकराच्या देवळात..!
तर खाली येथे मूळ स्थानी शंकर पार्वती बरोबरच ब्रम्हा/विष्णू पण आहेत... आणी वैशिष्ठ्य म्हणजे हे सगळेच लिंगरुपानी प्रतिष्ठित आहेत.
हा मंदिराचा कळस(आतला) आतिल बाजुनी...
आणी हा तोच(आतला) बाहेरिल बाजुनी....
अता हे दगडी खांब...
आणी ही भलिमोठ्ठी दगडी सहाण...
अता हे सगळे फोटो घेऊन मी बाहेर आलो..आणी तरी काहितरी राहिल्यासारखं वाटत होतं..ते म्हणजे मंदिराच्या मागुन प्रदक्षिणा मार्गाकडे(तीर्थाकडे) जाताना ही जुनी धर्मशाळा लागते... तीच राहिली होती
तर हा आहे सगळा मंदिर परिसर...
एवढे सगळे फोटो काढून झाल्यावर, जरा थकवा घालवायला चहा घेतला आणी तडक निघालो.. तो प्रदक्षिणा मार्गाकडे...
क्रमशः....
चला प्रदक्षिणा मार्गावर... http://www.misalpav.com/node/21823

वाचने
13054
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
मस्तच :)
फोटो छान आहेत
In reply to फोटो छान आहेत by अजातशत्रु
@सदर मजकुर काय आहे कळेल का?
In reply to @सदर मजकुर काय आहे कळेल का? by अत्रुप्त आत्मा
हे गांभिर्याने घ्यायचं. मजा
अता कासव आणी जय विजय कशाला..?
वा बुवा वा. एकदम मस्त
In reply to वा बुवा वा. एकदम मस्त by प्रचेतस
वल्ली>>>मला परवानगी होती.@हरी
व्वा छान... घरबसल्या श्री
जागृत देवस्थान...
थॅन्क्स अ.आ. ... शाळेत असताना
दक्षिण काशी
In reply to दक्षिण काशी by पार्टनर
सहमत . दक्षिण काशी हे नाव मी
In reply to सहमत . दक्षिण काशी हे नाव मी by llपुण्याचे पेशवेll
नाशिकच !
In reply to नाशिकच ! by हारुन शेख
नाशिकला दक्षिण काशी म्हणत
In reply to नाशिकला दक्षिण काशी म्हणत by प्रचेतस
दक्षिण काशी
In reply to नाशिकच ! by हारुन शेख
हरिहरेश्वर दक्षिण काशी कसे..?
सुंदर
सुंदर!
सचित्र हरिहरेश्वर...