Skip to main content

एटीएम कार्डाचा अनुभव

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 31/05/2012 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरेंमुळे आपले जीवन किती सोपे आणि सुखकारक झाले आहे असे मला वाटत होते. पण काल मला एक धक्कादायक अनुभव आला. पुणे येथील वारजे भागातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात मी पैसे काढायला गेलो. तिथल्या यंत्राने माझे कार्ड गिळून टाकले आणि वर पुन्हा "प्लीज इन्सर्ट युवर कार्ड" अशी विनंती केली. माझे कार्ड तर आधीच 'इन्सर्ट' केलेले होते. दरवाजाजवळ बसलेल्या रक्षकाला मी ही गोष्ट सांगितल्यावर त्याने दोन तीन बटने दाबून प्रयत्न केला आणि तो असफल झाल्यानंतर जवळच असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जायला सांगितले. दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्या शाखेत गेलो.

Dyatlov Pass - एक जीवघेणे गूढ...

लेखक मोदक यांनी गुरुवार, 31/05/2012 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
Dyatlov Pass - एक जीवघेणे गूढ. ही घटना आहे अत्यंत अनाकलनीय परिस्थीतीची, चक्रावून टाकणार्‍या प्रसंगांची, नऊ स्की ट्रेकर्स च्या भयाण मृत्यूची आणि ५३ वर्षांनंतरही न सुटलेल्या जीवघेण्या कोड्याची... १ फेब्रूवारी १९५९ च्या रात्री रशियातल्या उरल पर्वतावर नक्की काय घडले ते आजपर्यंत गूढच आहे. तिथे मिळालेले पुरावे, त्यांवरून बांधलेले परिस्थीतीचे अंदाज आणि त्या निष्णात ट्रेकर्सनी त्या वेळी घेतलेले निर्णय हे गूढ आणखी वाढवतात. उरल पॉलीटेक्नीक इन्स्टीट्यूट चे दहा अनुभवी क्रॉस कंट्री स्की ट्रेकर्स (तीन मुलींसह) २५ जानेवारी १९५९ ला रशियातील Ivdel शहरात पोहोचले.

लेकीची फरमाईश

लेखक जयवी यांनी बुधवार, 30/05/2012 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
लेकीची नवी फरमाईश ....... :) DSC00729-001" alt="" />

नई दिल्ली पहायचीय ?

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 30/05/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यानंतर दिल्ली तिल वास्तुकला - सुप्रसि ध्द फोटोग्राफर मदन मह्ट्टा यांनी १९५७ मधे घेतलेल्या या फोटोत नव्या दिल्ली तिल सरकारी माल किच्या होटेल अशोका ची ही इमारत दिसत आहे ,मदनजी चा जन्म काश्मिर चा , फोटोग्राफिचे शिक्ष ण इंग्ल् ड येथे घेवुन भार् तात आले,उत्तर हिन्दुस्तानात नामंकित स्टुडिओ पैकी त्यान्चा एक,त्यांनी तेन्व्हा अतिशय सुरेख फोटो काढ्ले आहेत २)इंडियन इंस्टिटूट ऑफ टेक्न्नालोजी -आय आय

माहिती हवे आहे.. पेट्रोल फ्रॉड पुणे - हिंजवडी

लेखक किशोरअहिरे यांनी बुधवार, 30/05/2012 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या हिंजवडी येथे फेज १ ला जो इंडियन ओईल चा पेट्रोल पम्प आहे तिथे पेट्रोल च्या ठिकाणी हवा भरण्यात येते आणि मीटर चालू राहते :( ह्या बद्दल कोणी काही मदत करू शकेल का? किंवा कोठे आणि कशी तक्रार करायची हे तरी सांगू शकाल का? जर पेट्रोल ४०० रु. च्या वर भरायचे असेल तर असा अनुभव येतो.. तिथले काम करणारे लोक.. २००-३०० रु. होई पर्यंत मीटर चालु राहिल आणी पेट्रोल पडतच नाही अश्या प्रकारे पेट्रोल टाकले जाते.. :( आणी थोड्या वेळाने बरोबर सर्व मिटर बंद होते आणी कारण सांगतात लाईट गेली आणि आता जनरेटर वर चालु करणार.. मग ऊरलेल्या पैशाचे पेट्रोल टाकले जाते.. म्हणजे जर तुम्ही १०००रु.

वेगळे आवाज

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 30/05/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
'ए हं आली हं, आता हे यडं बघ जाईल तिच्या मागे!', आमच्या कॉलेजात, नेहमीच्या बस स्टॉपवर, चैतन्यकांडीचा आस्वाद घेत असताना बरेचदा बोलला जाणारा हा डायलॉग. यातला 'हे यडं' म्हणजे आस्मादिक आणि हं म्हणजे निलम बाळ. हा डायलॉग मारला जावो अथवा न जावो, आपसूकच मी तिच्या मागे जात असे. हं नितांत सुंदर होती हे तर सत्यच पण मी तिच्या मागे जाण्याचे कारण तिचे दिसणे नव्हते, ते होते तिचा आवाज, 'वेगळा आवाज'. तिचा आवाज अगदी वेगळा होता. थोडासा रफ, घोगरा म्हणावा असा पण नेमका घोगरा नाही. त्या आवाजामुळेच तिला हं हे नाव पडले होते.