Skip to main content

मीर जाफरची आठवण

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 24/06/2022 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला.

दिनेश कार्तिकची फिनिक्स भरारी...

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 23/06/2022 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स हा काल्पनिक पक्षी असला तरी त्याच्याप्रमाणे राखेतून नवी भरारी घेणारे काही लोक प्रत्यक्षात असतात. दिनेश कार्तिक हा क्रिकेट जगतातील नवा फिनिक्स आहे. १ डिसेंबर २००६… जोहान्सबर्गमध्ये भारत विरुद्व दक्षिण आफ्रिका टी-२० सामना सुरु होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील भारताचा पहिला टी-२० सामना होता. सचिन, सेहवाग, झहीर, आगरकर, हरभजन असे खेळाडू त्या संघात होते. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले. चांगली सुरवात मिळूनही मधल्या षटकांत भारताचा डाव ढासळला. दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी करून भारताला तो सामना जिंकवून दिला.

बंडवीर

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 23/06/2022 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
।। उध्दवाते ना धरवे धीर ।। ।।सेने त उभे बंडवीर ।। ।। गेली ही सत्तेची खीर ।। ।।हातातून।। ।। बदलली नाही पार्टी ।। ।। बदल फक्त रिसाॅर्टी ।। ।। अजून कलटी मारती ।। ।। एकएक ।। ।।राहीले पंधरा जेमतेम ।। ।।नंबरचा हा सर्व गेम ।। ।। कुणाचा धरावा नेम ।। ।।नाॅट रिचेबल ।। ।।गनीमीने करता वार ।। ।।कोण नवा हा सूत्रधार ।। ।।विठ्ठला महापूजा करणार।। ।।कोण आता?।।
काव्यरस

पंचायत - २

लेखक साहना यांनी मंगळवार, 21/06/2022 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : पंचायत सीजन १ पहिला नसल्यास पुढे वाचू नये. सीजन दोन चे रसभंग इथे नाही दिले आहेत. त्यामुळे तो पहिला नसल्यास सुद्धा तुम्ही वाचू शकता. गावच्या गजाली म्हणून मी एक लेखमाला इथे लिहिली होती. ग्रामीण भागांतील सर्वसाधारण जीवन आणि त्यातील सध्या सध्या गोष्टींतील मनोरंजन हि त्याची पार्शवभूमी होती. ऍमेझॉन च्या पंचायत ह्या सिरीज चे कथानक सुद्धा तेच आहे. त्यामुळे मला ती आवडणे अतिशय अपेक्षित होते. पण सर्वानाच हि सिरीज अत्यंत आवडली आहे. ह्या सिरीज मध्ये काहीही वॊक पणा नाही. नेहमीच्या बॉलिवूड मध्ये जसे तोंडी लावायला सेक्युलॅरिसम किंवा इतर काही अजेंडे नाचवले जातायत तसले काहीही नाही.

कोंडून घेण्याचा जपानी प्रकार

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 21/06/2022 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यात अग्रेसर असलेले राष्ट्र म्हणून जपानला आपण ओळखतो. प्रचंड मेहनत, वक्तशीरपणा आणि काटेकोर शिस्त हे तिथल्या नागरिकांचे गुण कौतुकास्पद आहेत. दुसऱ्या बाजूस तिथल्या औद्योगिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेले ताणतणाव हेही प्रचंड आहेत. त्यातूनच निरनिराळ्या मानसिक समस्यांचे प्रमाण तिथे खूप आहे. या लेखात अशाच एका मानसिक समस्येचा आढावा घेत आहे. 1970 ते 80 च्या दशकात जपानमधील पौगंडावस्थेतील मुले आणि तरुण यांच्यात एका मनोवृत्तीची लागण होऊ लागली. ही मुले शाळा-कॉलेजला विनाकारण वारंवार दांड्या मारू लागली आणि स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागली.

विनिपेग डायरीज-४

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 20/06/2022 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग विनिपेग डायरीज विनिपेग डायरीज-२ विनिपेग डायरीज-३ टोरांटो ट्रिपचा शेवटचा दिवस मला अजूनही आठवतो.हॉप ऑन बसने दिवसभर शहरात फिरून आम्ही संध्याकाळी सी एन टॉवर बघितला आणि मग कॅब करून हॉटेलवर परत आलो.येताना रात्रीचे जेवण म्हणून एका ठिकाणी थांबून पिझ्झा खाल्ला. खरेतर माझा अंदाज चुकल्याने मी दोन मोठे पिझ्झा मागवले होते. पण कॅनडात प्रत्येक गोष्ट जरुरीपेक्षा मोठीच असते की काय कोण जाणे.

मुंबई लोकल मधील खरेदी

लेखक मालविका यांनी सोमवार, 20/06/2022 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते.

मुंबई लोकल मधील खरेदी

लेखक मालविका यांनी सोमवार, 20/06/2022 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते.

बहारो फूल बरसाओ - २

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 18/06/2022 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
या बँडवाल्याची एक गम्मत असते. त्यांचे पोशाख एकदम मस्त असतात . लालजर्द कोट त्यावर सोनेरी दोरीची नक्षी. सोनेरी बटणे. डोक्यावर पी कॅप. ती फरची असती ना उंच तर एकदम कोणीतरी बकिंगहॅम पॅलेसचे गार्डच शोभले असते. पण जरा नजर खाली करा. इतक्या सुंदर कोटच्या खाली पायजमा आणि पायात स्लीपर असतात. कुठल्याही लग्नात वाजणार्‍या बँडवाल्याना पहा थोड्या फारफरकाने हेच दिसते. मागील दुवा http://misalpav.com/node/50337 मी कार्यालयाच्या दारात उभी आहे. मायाच्या आईने माझ्यावर दिलेली जबाबदारी म्हणजे येणार्या पाहुण्याना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करणे, सांभाळतेय. मजा येते.