आयुष्यातून आयुष्यच हद्दपार.............
आयुष्यातून आयुष्यच निघून चालले आहे.............
एक दिवस असा उगवतो की वाटते आता आयुष्यातून काहीतरी कमी होत चालले आहे. सगळी सुखे दाराशी हात जोडून उभी आहेत पण काय कमी होते आहे हेच कळत नाही. आत्तापर्यंत जे नव्हते ते मिळवण्यात सगळा वेळ गेला. जे मिळवले त्याचा उपभोग घेण्यात वेळ गेला. मित्र मंडळीसमवेत मजेने या आयुष्याची मजा घेतली पण आता असे वाटते आहे की काहीतरी हातातून सुटत चालले आहे. आत्तापर्यंत दु:खे ही अनेक भोगली आणि खोटे कशाला बोलू, त्यांचीही या आयुष्यात सोबतच होती.
या, या चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बनवा एक नवीन चित्र...
मझ्या अलिकडल्या एका धाग्यातील एका प्रतिसादात ५० फक्त यांनी म्हटले: .... आता आहे त्या स्थितीत हे चित्र सॉफ्ट कॉपी करुन इथं डकवु शकाल का, म्हणजे इथले हौशी चित्रकार संगणकावर त्यावर प्रयोग करतील.....
ही कल्पना खरोखर फारच छान आहे.
खालील चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बघा यातून नवीन काय होउ शकते:


निराकार
आलो वेस ओलांडून देह जन्म त्वा वाहून
आले गेले निरोपाचे रोप अंगणी लावून
करू पाहिला संसार ऐहिकाचा मुका मार
पळ पळालो बेजार नाही फिटला अंधार
रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार
जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार
जळू गेली माया काया छेडली अंगी शततार
राहिल्या न पडदे भिंती दिसू लागले त्या पार
क्षणाची उसंत बेतली उलगडले घन संभार
घरटे उसवून उघडले उजेडास मिटले दार
सुटे मोकळे आकाश जीव आता,.. विना पाश
झिंग निराकार अशी ही नको पुन्हा उसने श्वास
शेवटास आरंभाची चिरंजीव वेडी आशा
राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास
.........................अज्ञात
काव्यरस
माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते
माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते
माझ्या दु:खाने माझे अंगण कधीच न्हाले होते
मी कोरडवाहू मातीमध्ये बाग फुलवला हसरा
तू फुले वेचता केवळ काटे मला मिळाले होते
क्षण एक जरासा थांब जीवना तुला न्याहळू दे ना
पाऊल तुझे अन माझे सोबत कधी न आले होते
मी डोक्यावरती छप्पर येण्यासाठी धडपड केली
अन पायाखाली जमीन येता सर्व उडाले होते
आयुष्य असावे कसे मला ही जाणिव झाली जेव्हा
तोपर्यंत 'जीतू' जीवन माझे जगून झाले होते
....रसप....
१० जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_10.html
पराभूत थोरवीच्या शोधात
कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात? एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सागितले होते की एका महानायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले 'जर हे गाणं बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता.' माहागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते.
रुढी परंपरा अंधश्रध्दा शकूण अपशकून
आपल्या समाजात अनेक रुढी परंपरा आढळतात. त्यात अनेक अंधश्रध्दा आहेत हे माहीत असुनही अनेक सुशिक्षीत मंडळी त्यांचे अणुकरण करताणा दिसतात.
मांजर आडवे गेले की अपशकून झाला म्हनुण पाच पावले माघारी जानारे महाभागही आहेत. आपल्याकडे मुंगुसाचे दर्शण झाल्यास 'मिष्टाण्ण भोजण' मिळेल असे मान्यता आहे तर राजस्थानात मुंगसाचे दर्षण अशूभ शगुण मानला जातो. शेतत जाताणा भाकरीबरोबर काही तेलकट असेल तर हमखास कोळस्याचा खडा भाकरीबरोबर बांधूण दिला जातो. अन्यथा भूतबाघा होन्याची शक्यता असते. घराबाहेर पडताणा उजवाच पाय प्रथम टाकावा अषी माण्यता आधळ्ते. उंबर्यात पाल चुकचूकली तर पानी टाकावे अषी धारना आहे.
काट्यानं काटा
'बब्र्या, कामुन आसा गपचिप बसलास ?' सडनमदी यंट्री घेत दोस्त म्ह्न्ला.
आडनिड टाईमाला आलेल्या दोस्ताला बघुन म्या म्हन्लं. 'पेपरवाले - च्यानेलवाले कवाधरनं त्या कसाबच्या नावानं दांगुडा घालुन र्हायलेत, त्याला जिता ठिवलाय, बिर्यानी खातो, खर्चा होतो. या ब्याग्राउंडवर काल त्या पुन्याच्या पोराने आजुक यका कसाबचा जीव घेत्ला, सिद्दीकी की कोन त्यो, अन तेबी डायरेक्ट अंडासेलमदेच ! कॉमन म्यान म्हन्तो बरच झालं, कसाबसारखं यालाबी सांबाळण्यापेक्षा काट्यानं काटा गेला. तिकल्ड्या साईडला फिलॉसॉफर लोकांनी तर ह्ये चुक हाये म्हन्तान्ना पार ह्युम्यानिटीलाबी क्वैश्वनमदे घेतलय.
नवरा नाही काही कामाचा
माझा नवरा नाही काही कामाचा
माझा नवरा आहे बिनकामाचा
सकाळी सकाळी पिवून येतो
संध्याकाळी झोकून घेतो
बिनघोर पडतो रात्रीचा
दारू प्यायला मागतो पैसे
पैसे मी आणावे कुठून कसे
त्यासाठी कायम करतो घोशा
फाटक्या संसारात पडला पाय
तुम्हीच सांगा मी करावं काय
त्याला पायपोस लागेना कशाचा
दुसर्या बायांकडे बघते जेव्हा
आनंद होतो मनात तेव्हा
संसार तसा होवो माझा सुखाचा
मिसळपाव