माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते
माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते
माझ्या दु:खाने माझे अंगण कधीच न्हाले होते
मी कोरडवाहू मातीमध्ये बाग फुलवला हसरा
तू फुले वेचता केवळ काटे मला मिळाले होते
क्षण एक जरासा थांब जीवना तुला न्याहळू दे ना
पाऊल तुझे अन माझे सोबत कधी न आले होते
मी डोक्यावरती छप्पर येण्यासाठी धडपड केली
अन पायाखाली जमीन येता सर्व उडाले होते
आयुष्य असावे कसे मला ही जाणिव झाली जेव्हा
तोपर्यंत 'जीतू' जीवन माझे जगून झाले होते
....रसप....
१० जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_10.html
वर्गीकरण
मस्त मस्त खुप छान ... आवड्ले
धन्यवाद! गझलच्या भाषेत त्याला
मस्त : शेवटचे कडवे छानच
गझलेला दिलेल नाव अतिशय
वा वा वा..! झकास रे एकदम.
मस्त आहे गझल आवडली. माझेच घर
धन्यवाद!
क्षण एक जरासा थांब जीवना तुला
छान आहे!
क्या बात है!
अप्रतिम !