सायोनारा s s
सायोनारा s s
नोकरी निमित्त दहा वर्षे पैठणला होतो. (१९७९ ते १९८९). त्यावेळी आलेले हे दोन अनुभव. औरंगाबाधून फोन आला. विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्यासाठी आलेले एक जपानी प्रतिनिधी मला भेटू इच्छित होते. हे जपानी कनेक्शन माझ्या काही लक्षात येईना. निरोप अर्जंट होता. लगोलग मी गेलो. ते प्रतिनिधी कामात होते. पण त्यांनी निरोप ठेवला होता. मला गेस्ट हाऊस वर बोलावलं होतं. मी गेलो. ते प्रतिनिधी माझी वाटच पहात होते.
मिसळपाव