Skip to main content

आर्थिक अराजकता

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 26/06/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
'स्टँडर्ड व पुअर्स' या जगातील सर्वात मोठय़ा पतमापन संस्थेने भारताचे पतमानांकन निगेटिव्हमध्ये घटवून 'भारत हा गुंतवणूक करण्यायोग्य देश नाही' असा शिक्का मारला आहे. 'मूडी' या संस्थेने मात्र थोडासा दिलासा देत 'भारतीय अर्थव्यवस्था फार वाईट स्थितीत नाही' असे मत व्यक्त केले आहे. या सर्वांवर संयुक्त पुरोगामी आघाडीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवून कळस चढविला आहे. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे देश आर्थिक अराजकतेच्या मार्गावर उभा असून आर्थिक सुधारणांच्या रुतून बसलेल्या गाडीला धक्का देणे फार गरजेचे आहे. भारताचा विकासदर ९.५ टक्क्याहून(मार्च २००७) घसरून आता ५.३ टक्क्यावर(मार्च २०१२) आला आहे.

बोगदा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/06/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
बोगद्यामध्ये कितीही अंधार असला तरी त्याच्या दोन्ही तोंडाशी उजेड असतोच एकाबाजूने येणारा अन् दुसर्‍याबाजुने जाणारा . मी बर्‍याचदा जाणार्‍या उजेडाकडे उभा राहतो विरुद्ध दिशेला . येणार्‍या उजेडाचा अवखळपणा सोसत नाही आजकाल नाही, अजून काही मी वयोवृद्ध वगैरे नाही झालोय बरगड्यांच्या सापळ्यात धडधडणारे हृदय अजूनही न करकरता बिनविरोध चालू आहे . पण तरी जाणा-या उजेडाचे मृदुमुलायम अस्तर अंगावर वाहण्याची चटक लागलीये आता . बोगद्यातील कळकभिन्न अंधार अन् डोळ्यांपुढे काजवे चमकवणारा "येणारा उजेड" या दोघांना ओलांडून येणारा अनुभवाची शाल पांघरलेला "जाणारा उजेड" तसे खूप काही शिकवून जातो, नाही? |- मिसळलेला काव्यप्रेम
काव्यरस

शाळा व त्यांचे अजब निर्णय

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/06/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्स मंडळी, मागील वर्षी माझ्या मुलीला मी ठाण्यातील एका प्रतिथयश शाळेत के.जी त प्रवेश घेवून दिला. नुकतेच सिनीयर के.जी. चे वर्ग सुरु झाले. या शाळेत मुलांना रोजच्या डब्यात काय द्यायचे याचे नियम आहेत ( आजकाल हा प्रकार सगळी कडेच असतो म्हणे, असो. त्याला काही हरकत नाही.) त्यानुसार प्रत्येक दिवसासाठी काही पदार्थ ठरवलेले आहेत. त्यात, सोमवारसाठी "इडली/डोसा" असा मेन्यु आहे. काल माझ्या बायकोनी सकाळी ६:३० ला उठून, खपून तिच्यासाठी मसाला इडली केली आणि डब्यात दिली. संध्याकाळी तिने विचारले मुलीला "बाळा, इडली आवडली कां?" तर तिचे उत्तर ऐकून मी तीन ताड उडालोच.

राजर्षी शाहू महाराज

लेखक अजातशत्रु यांनी मंगळवार, 26/06/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
लोक कल्याणकारी,आरक्षणाचे जनक,बहुजनांचे प्रेरणास्थान रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १३८ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्य, कर्तुत्व, क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

होस्टेलमधील पहिला दिवस.

लेखक जोयबोय यांनी सोमवार, 25/06/2012 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
सदर गोष्ट आहे दहा वर्षापुर्वीची. त्यावेळी मी नुकताच डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात प्रवेश घेतला होता. पहिले वर्ष मी मित्राच्या खोलीवर रहायला होतो. यावेळी मी होस्टेल्मधे राहायला लागलो. तसा होस्टेलला भीतभीत प्रवेश घेतला. कारणही तसेच होते. कॉलेज शहरापासुन थोडे लांब होते. मनुष्यवस्तीही खुप तुरळक होती. होस्टेल ज्या जागेवर बांधलेले होते तीथे पुर्वी मेलेली मानसांना पुरण्यात येत असे. इमारत बांधत असताना किमान २ सांगाडे सापडले होते. तसा भुताखेतांवर माझा विश्वास नव्हता पन होस्टेलमधील काही मुलांना विचीत्र अनुभव आले होते. त्यातले दोघे माझ्याच वर्गातले.