Skip to main content

झटपट क्रिस्पी कोळंबी

लेखक jaypal यांनी सोमवार, 02/07/2012 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य ताजी कोळंबी (आकारमान मध्यम ते लहान. फार मोठी असल्यास तळताना क्रिस्पी होत नाहीत),कांदा,टोमेटो,ही चटणी, घरी केलेला/ विकतचा शेजवान सॉस, सोया सॉस,कॉर्न फ्लोअर,तळणासाठी तेल,बारीक चिरलेला लसुण(१ टी स्पुन), आल्याच्या काड्या,मिठ, हळद व लिंबु. प्रथम ताजी कोलंबी आणुन तीच्यातील धागा काढावा(ही स्टेप ऑप्श्नल आहे).स्वच्छ करुन घ्यावी. p नंतर थोडे मिठ, हळद(पाव चमचा) ,लिंबु आणि वरील लाल चटणी लावुन सुमारे १५/२० मिनीटे मुरुद्यावी.

(आपण शेवटचा घोट कधी घेतला?)

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 02/07/2012 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपण शेवटचा घोट कधी घेतला ? माझ्याबद्दल सांगायचे तर, मी मुळात पितंच नाही. पण एका मराठी वर्तमानपत्राच्या प्रचारामुळे (दारू म्हणजे वाइन नाही) दोन चार वर्षातून एखादे वेळेस कुणा हुच्चभ्रू लोकांकडे जेवायला गेलो तर ष्टायील म्हणून इवलीशी वाइन चाखत राहतो. जेवणाच्या अगोदर सुरू करूनही ती शेवटपर्यंत संपतच नाही मुळी. चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव एखादा आयुर्वेदिक काढा जसे दाडीमावलेह किंवा द्राक्षासवासारखी लागते.

डॉ.अशोक रानडे यांचे स्मरण

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी सोमवार, 02/07/2012 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राला विचारवंताचे वरदान लाभले आहे. संगीत क्ष्रेत्रात ही परंपरा पं.भातखंडेनी सुरु केली. पुढे दि.ब. देवधर , कुमारजी , पु.ल. असे अश्या अनेकांनी संगीता बरोबर संगीताचे विचार पुढे नेले. डॉ. अशोक रानडे त्याच परंपरेचा विचारवंत होता. हया जुलै महिन्यात त्यांच्या निधनाला एक वर्ष होते आहे. त्यानिमित्त त्यांचे स्मरण. आपल्या जवळजवळ पाउणशे वर्षाच्या आयुष्यात डॉ.६० वर्षे संगीता क्षेत्राशी निगडीत होते. स्वतः गजाननबुवा जोश्यांचे शिष्य होतेच पण त्याही पेक्षा ते संगीतावरचे अधिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांचा व्यासंग “संगीताचा” होता आणि तो भारतीय शास्त्रीय संगीता इतकाच लोकसंगीताचा ही होता.

भेंडी मसाला - Spicy Okra

लेखक मोहनराव यांनी रविवार, 01/07/2012 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, पाककृती दालनामध्ये आतापर्यंत पाककुशल मंडळींचे पदार्थ पाहुन वाहवा करण्यात धन्यता मानत होतो. कधीकधी पदार्थ पाहुन जळजळ व अत्याचारही सहन केला जायचा. आपणही काहितरी करावे व येथे सादर करावे असे वाटायचे पण योग जुळुन आला नव्हता, असो. तर हा आमचा पहिलावहिला प्रयत्न, गोड मानुन घ्यावा हि विनंती.

बुगडी माझी सांडली गं या लावणीचे विडंबन

लेखक कान्होबा यांनी रविवार, 01/07/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्राने बुगडी माझी सांडली ग या लावणीचे विडंबन केले आहे अर्थात गीतकारांची माफी मागून. महाविद्यालयीन तरुणीला काही विषयात ए.टी.के.टी.

आपण पहिला घोट कधी घेतला ?

लेखक कुंदन यांनी रविवार, 01/07/2012 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्यमेव जयते" मधली दारु बद्दल ची चर्चा वाचुन हा धागा काढण्याची प्रेरणा मिळाली. माझ्याबद्दल सांगायचे तर , आमच्या शेजारचे काका रोज प्यायचे , कधी कधी मला त्यांचा चखणा आणायला पिटाळायचे. एकदा त्यांचा ग्लास भरुन ठेवलेला होता अन ते जाग्यावर नव्हते तेंव्हा मी "पहिला घोट " घेतला होता. चव काही विशेष आवडली नाही, त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. पुढे मग इंजिनियरींग करताना पहिल्यावर्षी चा निकाल लागण्यापुर्वी "निकालच" लागण्याच्या भीतीने २-३ दिवस झोप लागली नव्हती , त्यातुन सर्दी- खोकल्यामुळे जाम झालो होतो.

तडफड

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 01/07/2012 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मंदीर मशीद मठांच्या समोर लागलेली लांबच लांब रांग भक्तांची लगबग, तगमग आणि लसलस, तिथल्या त्या दलालांची त्यांनी मांडलेला तो भक्तीचा बाजार त्यांच्या भोवती गर्दी करणारे लाचार पापाच्या ओ़झ्यातुन मुक्त होण्या साठी त्यांची चाललेली केवीलवाणी धडपड श्रध्देच्या पार चिंधड्या होउन जातात मनाची होते तडफड कधीकधी किळस वाटते या सगळ्याची, किव येते मला माझी स्वतःची खरोखर का देव देवळात रहातो, पेटीतल्या दक्षीणेला भाळतो आणि नवसाला देखील पावतो, देव खरच असा असतो? या विचाराने मी मात्र भांबावतो. जनतेला खुलेआम लुटणारे, निर्लज्ज व्यापारी, पुढारी, नोकरशहा, कारखानदार पोलीस तर होतेच पण सैनिकही म्हणे आजकाल करतात भ्रष्
काव्यरस

अंड

लेखक गोंधळी यांनी रविवार, 01/07/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी तसा जन्मतः च शाकाहारी.लहानपनी मला मांसाहारी पदार्थांचा वास ही सहन होत नसे.घरात ज्यावेळी असे पदार्थ बनवले जात त्यावेळी मी वेगळा जेवत असे किंवा आधिच जेवुन घेत असे. पण कालांतरने व्यायाम शाळेत जावे असे वाटु लागले व ईतर मित्रांबरोबर मी ही जिम जॉईन केली. पहील्या दिवशी सरांनी माझी शरीरयष्टी पाहुन मला रोजचा खुराक लीहुन दिला.त्याप्रमाणे मला दुधातुन कच्च अंड रोज खावे लागणार होते.बापरे अंड खावे लागणार यामुळे मी थोडा अस्वस्थ होते पण मित्र व घरचे म्हणु लागले की अंड तर शाकाहारी असते.त्यांच्यावर विश्वास ठेवुन मी एकदा देवाचे नाव घेवुन ते कच्च अंड घातलेले दुध नाक डोळे बंद करुन अजिबात उलटी न करता कसे बस