नमस्कार मिपाकरहो,
पाककृती दालनामध्ये आतापर्यंत पाककुशल मंडळींचे पदार्थ पाहुन वाहवा करण्यात धन्यता मानत होतो. कधीकधी पदार्थ पाहुन जळजळ व अत्याचारही सहन केला जायचा. आपणही काहितरी करावे व येथे सादर करावे असे वाटायचे पण योग जुळुन आला नव्हता, असो. तर हा आमचा पहिलावहिला प्रयत्न, गोड मानुन घ्यावा हि विनंती.
तेल तापवुन घ्यावे. तेल गरम झाल्यानंतर जिरे तळावे. नंतर भेंडी ५ ते ७ मिनीटे चांगली परतुन घ्यावी.
त्यानंतर हळद, गरम मसाला व लाल मसाला, लसुन पेस्ट, चवीनुसार मीठ हे मिश्रण २ मिनीटे तळुन घ्यावे.
नंतर यामधे बेसन पीठ मिक्स करुन परतुन घ्या. कापलेली सिमला मिर्च यामधे मिक्स करुन ही भाजी चांगली मंद आचेवर ५ मिनीटे शिजवुन घ्यावी. लिंबाचा रस यावरुन पिळावा व सादर करावे.
भेंडी मसाला - Spicy Okra
साहित्यः
पाव किलो भेंडी
१/२ टीस्पून जीरे
अर्धा चमचा लसूण पेस्ट
१/२ टीस्पून लाल मसाला (घरी बनवलेला)
चिमुटभर हळद
२ टीस्पून बेसन पीठ
१/४ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून लिंबाचा रस
१ १/२ टीस्पून तळण्यासाठी तेल
सजावटीसाठी लाल व पिवळी सिमला मिर्च
मीठ चवीनुसार
पाकृ:
सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या. जर भेंडी नीट पुसुन घेतली नाही तर भाजी चिकट होईल. भेंडी मधुन कापुन घ्यावी. लाल व पिवळी सिमला मिर्च बारीक चिरुन घ्यावे.
तेल तापवुन घ्यावे. तेल गरम झाल्यानंतर जिरे तळावे. नंतर भेंडी ५ ते ७ मिनीटे चांगली परतुन घ्यावी.
त्यानंतर हळद, गरम मसाला व लाल मसाला, लसुन पेस्ट, चवीनुसार मीठ हे मिश्रण २ मिनीटे तळुन घ्यावे.
नंतर यामधे बेसन पीठ मिक्स करुन परतुन घ्या. कापलेली सिमला मिर्च यामधे मिक्स करुन ही भाजी चांगली मंद आचेवर ५ मिनीटे शिजवुन घ्यावी. लिंबाचा रस यावरुन पिळावा व सादर करावे.
वाचने
10449
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिरं तळायचं ?? असो. भेंडीत
भेंडीत डाळीचं पीठ पेरुन
In reply to जिरं तळायचं ?? असो. भेंडीत by सूड
मस्त दिसते आहे.
जरा ....
In reply to मस्त दिसते आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
In reply to जरा .... by कुंदन
मस्त जमले आहे..
चांगला प्रयत्न आणि वेगळी
झकास रे. टमाट्यावर कलाकुसर पण
मोहनराव तुमचा पहिलाच प्रयत्न
वेल्कम.
बेस्ट बेस्ट...
मस्त, मस्त....
सूड, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
मस्त रे !!
एक शंका आहे.
हो पण फक्त सजावट म्हणुन मिक्स
In reply to एक शंका आहे. by चिंतामणी
छान दिसतेय!
भेंडी मसाला मस्तच जमलाय..
भेंडी मसाला मस्तच जमलाय..