Skip to main content

वारीसोबत चार पावलं....

लेखक मन यांनी रविवार, 08/07/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेमकं लवकर उठून शुचिर्भूत होताच समोर दिंडी चाललेली दिसली. त्यावर ज्ञानेश्वर ,तुकाराम ह्यांचेही फोटो दिसले, वारिचे रिंगण बहुदा बनवले जात होते. मनातल्या मनात त्यांच्यासोबत चार पावलं फिरुन आलो. "जे न देखे रवी" मध्ये प्रथमच लिहीत आहे. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ मझिया मना देइ भगवंता. तुझिया कृपेने झालो मी अमर मेलो मी तक्त्क्षणी उरलो हा नश्वर. तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा ज्वाळा ह्या शांत, बुडविती अनंता आता काय होणे सांगी पांडुरंगा ठाकलो उभा दारी तुझ्या वाजवी टाळ सजवी मृदुंगा टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा ---मनोबा---
काव्यरस

मिपावरील संगणकतज्ञांना आवाहन

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 08/07/2012 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या वर्तमानपत्रात 'आपला संगणक सुरक्षित आहे की बाधीत?' अशी बतमी वाचली. डी एन एस सर्वर बदलुन टाकणारे खलयंत्र जर आपल्या संगणकात शिरले असेल तर सोमवारपासून असे बाधित लोक जालावर दाखल होण्यास मुकतील, त्यांना आपल्या सेवादात्याशी संपर्क साधुन नव्याने जुळणी करावी लागेल असे म्हटले आहे. आपला संगणक बाधीत झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काही संकेतस्थळांची नावेही दिली आहेत. सोमवारी जेव्ही एफ बी आय लुच्चे सर्वर बंद करुन टाकेल तेव्हा बाधीत संगणकाला जालावर प्रवेश मिळणार नाही. नुकत्याच एका स्थळावर गेलो असता माझा संगण़क व जाल सुरक्षित असल्याचा निर्वाळा मिळाला.

"अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी"

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शनिवार, 07/07/2012 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बर्‍याचजणांना CCD अर्थात कॅफे कॉफी डे माहीत असेलंच. म्हणजे आहेच. तर त्यांची जी टॅगलाईन आहे " A Lot Can Happen Over Coffee" बर्‍याच दिवसापसून डोक्यात भणभणत होती. म्हणजे असं की, काय नक्की सांगायच असेल यांना, असं काय काय घडू शकतं फक्त एका कॉफीवरून...... असे एक न एक अनेक विचार होते. पण कोणास माहीत होतं की, ते काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोणीतरी असावं लागतं.. मी स्वतः आतापर्यंत कधीच तिथे गेलेलो नाही. त्या महागड्या कॉफ्या पिण्यापेक्षा आमच्यासारखी भटकी माणसे, एखाद्या टपरीवरच्या चहात स्वर्गसुख शोधतात.... आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. घर - नोकरी - मित्र - जोपासलेले छंद (चांगले)...

कवी मेघवेडाची 'उरा'तली सर !

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 07/07/2012 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
'उरा'तली सर ! - http://misalpav.com/node/22159 *** 'नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर' अशी सुरुवात करुन नावातच मेघ आणि त्याचे वेड सामावलेला कवी जेव्हा पावसावर लिहितो तेव्हा पावसाने जशी धरणी तृप्त होते तसे रसिक मन तृप्त होणार याची खात्री असते आणि मग उरतो केवळ कवीच्या लेखणीतून झरझर उतरलेल्या काव्यामृताचे पान करण्याचा एक उपचार. अमृत मिळणार हे आधीच माहित असते आणि तसेच घडते.

काय केले असते तुम्ही....?

लेखक चिम् चिम् मामा यांनी शनिवार, 07/07/2012 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
हा माझा स्वतःचा अनुभव आहे... तुम्हालापण हा अनुभव आला असेल. माझ्या समोर ओरडा-ओरडी करण्या पलीकडे काहीच पर्याय नव्हता...तुम्ही काय केले असते. पावसात भिजल्या नंतर...चहाच्या तपरी वरचा चहा... प्लास्टिकच्या अतिशय पातळ अश्या कपात... टपरी समोर नक्किच पाणी तुंबलेले... मझ्या दोन्ही हातात चहाचे (प्लास्टिकचे) छोटे-छोटे कप (चहाने गच्च भरलेले)... पाण्यातुन चालताना चहा माझ्या बोटावर चटके देत होता.... आणि तेवढ्यात गुन-गुन करत डोळ्यावर...नाकात... जाउन मला प्रचड त्रास... दोन्ही हातात...चहाचे कप आणि नाका-समोर माशी.... चहा खाली ठेवायला जागा नाही... माशी झटकायला हात रिकामा नाही...

जाहिरातींची विनोदी "वाट"!! (पूर्ण संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 07/07/2012 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत आहेत, काही जुन्या प्रसिद्ध जाहिराती .... माझ्या ("व्यंगचित्रकाराच्या") मिस्कील तिरकस नजरेतून... वाचतांना मूऴ जाहिराती आठवल्यास वाचनाचा आनंद आणखी वाढेल यात शंका नाही.... अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयोग.... मूळ जाहिराती मुद्दाम येथे सांगत नाही... तो तुमच्यासाठी होमवर्क समजा! जागोजागी हिन्ट दिल्या आहेतच. (१) 'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो : "काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?" ती म्हणते : " असा ऊस खायला मजबूत दात हवेत. हे दातच नाही तर माझे शरिरसौष्ठव पण बघ.

"गॉड पार्टीकल्स​" निर्मीत वस्तुमान आणि बिग बॅन्ग थेअरी - तफावत!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 07/07/2012 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
वस्तुमान निर्मितीस कारणीभूत, हिग्स्-बोसोन असे नाव असलेले "गॉड पार्टीकल्स" प्रोटॉनच्या अघातापसून निर्माण करण्यात यश आल्याबद्दल सर्न च्या सगळ्या वैज्ञानिकांचे अभिनंदन! मात्र, त्याद्वारे जे वस्तुमान निर्माण झाल्याचा दावा केला आहे ते फार अल्पजीवी होते म्हणजे मायक्रो सेकंदा पेक्षा ही कमी काळ ते टिकले आणि आपल्या ब्रम्हांडात मात्र अनेक कायमस्वरूपी वस्तुमान आहेत म्हणजे आपली पृथ्वी आणि इतर ग्रह. कमीत कमी छोट्या आकाराचे अनेक कायमस्वरूपी गोळे त्या प्रयोगातून बाहेर निघायला हवे होते. मग बिग बॅन्ग थेअरी यातून पूर्णपणे स्पष्ट होत नाही. कुणी स्पष्ट करू शकेल का?