Skip to main content

वारीसोबत चार पावलं....

लेखक मन यांनी रविवार, 08/07/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेमकं लवकर उठून शुचिर्भूत होताच समोर दिंडी चाललेली दिसली. त्यावर ज्ञानेश्वर ,तुकाराम ह्यांचेही फोटो दिसले, वारिचे रिंगण बहुदा बनवले जात होते. मनातल्या मनात त्यांच्यासोबत चार पावलं फिरुन आलो. "जे न देखे रवी" मध्ये प्रथमच लिहीत आहे. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ मझिया मना देइ भगवंता. तुझिया कृपेने झालो मी अमर मेलो मी तक्त्क्षणी उरलो हा नश्वर. तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा ज्वाळा ह्या शांत, बुडविती अनंता आता काय होणे सांगी पांडुरंगा ठाकलो उभा दारी तुझ्या वाजवी टाळ सजवी मृदुंगा टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा ---मनोबा---
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1640
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा>>>> सुंदर रचना

वल्ली, अतृप्त आत्म, किसन्,अमित्,अमोघ्,पैसा आणि इतर सर्व वाचनमात्र वाचकांचे आभार.