एका म्यानात दोन तलवारी
सकाळी नऊ वाजता चीफ डिस्ट्रिक्ट मेडीकल ऑफिसर डॉ कर यांचा फोन आला. कलेक्टरांनी उचलला. "गुड मॉर्निंग सर. मला लगेच भेटायचंय, येऊ का?" "गुडमॉर्निंग डॉक्टर. या. काय अर्जंट? " कलेक्टर उत्तरले. "सर मी चाललो तुमच्या जिल्ह्यातून. मी एकही क्षण इथे थांबणार नाही. माझ्यावर काय अॅक्शन घ्यायची ती घ्या. " उत्तेजित स्वरात डॉक्टर बोलले. कलेक्टर म्हणाले, "लगेच या डॉक्टर. बोलू आपण."
*********
कलेक्टरांना आश्चर्य वाटले. डॉ करांना जिल्ह्यात येऊन चारच महिने झाले होते. आल्यापासून त्यांनी कलेक्टरांना कसलीच तोशीस पडू दिली नव्हती. एनआरएचएमचा कोट्यवधी रुपयांचा व्याप सांभाळणे साधी बाब नव्हती.
मिसळपाव