Skip to main content

जुने तेच सोने की --

लेखक शकु गोवेकर यांनी रविवार, 19/08/2012 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
जुने तेच सोने की---- प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट व चांगला काळ येत असतो किंवा जात असतो साधारण पणे सन १९६० ते २००० या काळात मी अनेक चांगल्या गोष्टी वाचल्या,लिहिल्या व पाहिल्या,त्या काळी वाचलेल्या काही मराठी कादंबर्या- ययाती , म्रुतुंजय, छावा,असा मी असा मी,अपुर्वाई,राजा शिव छ्त्रपती, श्री.बाबुराव अर्नाळ्कर रहस्य कथा, रेडिओ-आकाश् वाणी पुणे - पुन्हा प्रपंच्,असा आमचा गाव्,युवावाणी, रेडिओ सिलोन -ओवल टीन के साथी-हमीद सयानी,बिनाका गीत् माला-अमिन सयानी दुरदशन वर पाहिलेल्या काही मालीका-(हिंदी) आलीफ लैला,अकबर द ग्रेट,बुनियाद,चंद्रकाता,रामायण्,व्योमकेश बक्शी,महाभारत्,भारत एक खोज्,मालगुडी डेज्,

सुपर३०. ( एक आगळा वेगळा प्रयोग).

लेखक कलंत्री यांनी रविवार, 19/08/2012 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
रोज वर्तमान पत्र वाचण्यासाठी घेवो अथवा एखाद्या वृत्तवाहिनीचे दर्शन घेवो, भ्रष्टाचार आणि तोही उच्चपदस्थाचा पाहिला की जीव वैतागतो, मनात विचार येतो की या लोकांना इतके कोट्यावधी रुपयांची संपन्नता असताना परत हजारो कोटीची घोटाळा करताना का मी करीत आहे आणि कधी मी थांबणार असा विचार का बरे मनात येत नाही बरे? अश्या विचारांच्या काहिलीत असतांना सुपर३० नावाच्या संस्थेची माहिती मिळाली आणि उन्हात शितळतेचा अनुभव आला. सुपर३० ही संस्था पटना येथे आनंद कुमार नावाचे गृहस्थ चालवतात.

राष्ट्रपतींचा दयाळूपणा -

लेखक विदेश यांनी रविवार, 19/08/2012 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
. नवीन मा. राष्ट्रपती "दयाळू" आहेत की नाहीत, हे मला माहित नाही. जुन्या मा. राष्ट्रपतीनी दयाळूपणा दाखवण्यात "उच्चांक" केला आहे, हे मला विविध माध्यमांद्वारे माहित झाले. आपल्या न्यायव्यवस्थेवर किती विश्वास ठेवावा, हे मला कळत नाही. खालचे न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय- ह्या तिन्ही न्यायालयांच्या न्यायमूर्तीनी "पूर्ण विचार करूनच" समोरच्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली असणार ना ? असे असतांना, केवळ "दयेच्या अधिकारा"खाली मा. राष्ट्रपती सदर शिक्षा रद्द करण्याचा उच्चांक प्रस्थापित करून जातात- हे खरोखरच अनाकलनीय कोडे वाटते ! मा.

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

लेखक शरदिनी यांनी रविवार, 19/08/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनन्यशून्या गरळविशिष्टा मंतरलेली चरणप्रतिष्ठा अल्लडढोली धोतरजोडी चित्तरबद्धा जळमंजिष्ठा चपळ्शरीरी आटापीटा अल्फाबीटाग्यामाथीटा शोधनभंजक वरबालंटा कुठे कोणासी सचित्रघंटा अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे

अतिरेकी देवो भव !

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 19/08/2012 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15544120.cms अतिथी देवो भव अर्थात अतिथीला देव मानणारे व्हा अशा अर्थाचा वेदातला एक श्लोक आहे. आपल्या सरकारने त्यात थोडा बदल करुन अतिरेकी देवो भव केला आहे की काय अशी शंका येणारी ही बातमी. ही खोटी असू दे अशी इच्छा. पण ह्या नराधमाला रमझान आहे म्हणून सुकामेवा, भेजा फ्राय, मलई असल्या अन्नाची रेलचेल असणारे खाणे दिले जात आहे अशी ही बातमी आहे. सामान्य लोकांनाही असले खाणे परवडत नसेल. आणि अन्य कैद्यांनाही असले खायला दिले जात नसेल ते ह्या नररत्नांना कुठल्या कारणाने दिले जाते?

रजनी

लेखक शुचि यांनी रविवार, 19/08/2012 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
खलील जिब्रान यांच्या "नाईट" या लेखातील एका उतार्‍याचे स्वैर रुपांतर - जिने हाती भीतीरुपी तलवार धारण केलेली आहे, मस्तकी चंद्र ल्यालेला आहे आणि नीरव शांततेची वस्त्रे जिने परिधान केलेली आहेत अशी जीवनाच्या गूढर्भी लाखो नेत्रांनी पहाणारी रजनी, नि:शब्द मौनात हजारो कर्णांनी मृत्यूचे भयगीत ऐकते. हे रजनी समस्त कवी, प्रेमिक, गायकांचे विश्रामधाम अशी तू , तुझ्या गर्भात काळोख्या , गूढ सावल्या, आत्मे आणि चित्रविचित्र भासाभासांचा निवास आहे.

एकहार्ट

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 19/08/2012 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य किती सोपंय, किती सहज आहे पाहायचं असेल तर जगात आज एकमेव व्यक्ती आहे, एकहार्ट! कोणताही चमत्कार नाही, सिद्धाच्या लक्षणांचं कोणतंही अवडंबर नाही. तुम्ही दखल घेतली नाही तर लक्षातही येणार नाही इतका साधा एकहार्ट. त्याचं पॉवर ऑफ नाऊ प्रकाशित होऊन अनेक वर्ष झाली. तो भारतात येऊन गेला. इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही. अनेक वर्ष त्याच्याकडे कुणाचं लक्षही गेलं नाही. एकदा ओप्रा विनफ्रेनं त्याला टॉक शोला बोलावलं आणि तो प्रकाशात आला. आजही तो इतक्या सादगीनं जगतो की तुम्ही रिसेप्टीव असाल तरच त्याला समजू शकाल.

"प्रे (सावज)" एक थरकापवून टाकणारी विज्ञान कादंबरी

लेखक सागर यांनी शनिवार, 18/08/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नावः प्रे (सावज) मूळ लेखकः मायकल क्रायटन अनुवादकः प्रमोद जोगळेकर प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत : रु. ३००/- मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये. जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्‍या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्‍यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच.