Skip to main content

तुझी पुलावर आठवण येते... एका गीताची ओळख .. राग पूलबहार

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 06/09/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
हिमशिखरांतून खळखळ गाते मनमंदीर तर झगमग झुलते कुणास कोणी हरवून जेते तुझी पुलावर आठवण येते. ---- काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१ काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन. या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो"..

दारिद्र्याचे सोंग!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 06/09/2012 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत यंदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार्‍या या निवडणूकीकरता रणधुमाळी चालू आहे. अमेरिकेत दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन गेल्या आठवड्यात झाले. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे चालू आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार आपण कसे साधे आहोत, कसे आपण हलाखीच्या परिस्थितीतून वर आलो ह्याचे खर्‍याखोट्याची सरमिसळ असणारे वर्णन करत आहेत. विविध प्रकारे आम्ही तुमच्यातलेच आहोत असे बिंबवण्याचा हा प्रयत्न. गेल्या आठवड्यात मिट रॉमनीच्या पत्नीने आपल्या भाषणात सुरवातीला आम्ही कसे साधेपणाने रहायचो वगैरे सांगायचा प्रयत्न केला.

ट्रफिकची भेळ

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/09/2012 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आतुन बाहेर पाहू म्हणता काचेवर धुक्याचा खेळ बाहेर कशी मजबुत झालिये वहानांची पुरति भेळ पावसाचं पाणी भेळेवरती वाढवू पाहातय तिचा भाव त्यातच मधे बाइकवाला जणू फिरे पातेल्यात डाव पुढे एक छोटी गाडी गाडिवरती रांगडी घोडी ट्रॅफिक जॅम असुन सुद्धा वाट देती तिला थोडी इतक्यात तिथे एक काकु घरी पहाती फोन टाकु मागून काका म्हणती त्यांना तू चालव मी देतो टेकू मी कडेला गाडीमध्ये पार्किंग करुन बसलोय मस्त बाहेर छान भेळ जमतीये मजेमजेनी करतोय फस्त रोज त्याच तिकिटावरती चालु होतो तोच खेळ उद्या या तुंम्ही सुद्धा दोघे मिळुन खाउ भेळ ...
काव्यरस

अंगणातल्या चिमण्या

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 05/09/2012 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
खरं म्हणजे एक दिवसासाठी बेळगाव ते मुंबई असा प्रवास करायचे सुचित्राला अगदी जीवावर आले होते. नणंदेच्या सासूच्या भाचीचं लग्न. पण सासू सासरे नेमके चार धाम यात्रेला गेलेले. माहेरचं कुणी आलं नाही तर नणंदेचा रुसवा फुगवा काढायचं अवघड झालंच असतं, शिवाय सासूबाई परत आल्यावर त्यांचे टोमणे खावे लागले असते ते निराळेच. म्हणून तिने बेत केला, आदल्या दिवशी रात्री पुण्यात असलेल्या मावसबहिणीकडे, प्रियांकाकडे मुक्काम करायचा अन खूप दिवसांच्या तटलेल्या गप्पागोष्टी करून घ्यायच्या. अन मग दुसरे दिवशी सकाळी लवकर मुंबईसाठी निघायचं . साडेबाराचा मुहूर्त. अकरापर्यंत सहज पोचता येईल.

भरलेली भेंडी....

लेखक श्रद्धा. यांनी बुधवार, 05/09/2012 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम बाजारात प्रसन्न मनाने जाऊन अर्धा किलो ताज्या ताज्या कोवळ्या अन लहान भेंड्या आणाव्यात. घरी आल्यावर त्याच प्रसन्न मुडमधे स्वच्छ पुसुन घेउन त्याचे देठ आणि शेपटी काढुन टाकावी.

कढी-गोळे

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 05/09/2012 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
DSC_00100001_1 गोळ्यांसाठी साहित्यः चणा डाळ १ वाटी आलं १ इंच हिरव्या मिरच्या ३-४ नग हळद १/२ लहान चमचा (टी स्पून) मीठ चवीनुसार खायचा सोडा १/२ लहान चमचा जीरं १ लहान चमचा गोळ्यांची कृती: चणाडाळ ६-७ तास पाण्यात भिजत टाका.

अति सर्वत्र वर्ज्ययेत....

लेखक Pearl यांनी मंगळवार, 04/09/2012 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
( अति सर्वत्र वर्ज्ययेत.... याबद्दल जे काही विस्कळीत विचार मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू. द्या. घ्या.) आपल्या संस्कृत भाषेत फार छान छान कोट्स आणि सुंदर अर्थपूर्ण अशी सुभाषिते आहेत. त्यातलं 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे वाक्य पण फार छान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये. अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये. अति चिंता: चिंतेबद्दल तर काय सांगावं. असं म्हणतातच ना की चिता मनुष्याला मेल्यानंतर जाळते, तर चिंता जिवंतपणी जाळते.