Skip to main content

आवडणारे ब्लॉग्स

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 07/09/2012 03:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववरती गाण्यांचे धागे खूप येऊन गेले आहेत. अमकी अमकी गाणी आवडतात,वेडावतात वगैरे. पण कोणत्या साईटस्/ब्लॉग्स मिपाकरांना आवडतात आणि का याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझ्या आवडनिवडीत, ब्लॉग्सच्या यादीत ही भर पडेल - हे मुख्य. :-D माझी आवडते ब्लॉग्स सांगते. मला पुढील साईट्स्/ब्लॉग्स नितांत आवडतात - (१) http://www.psychologytoday.com/ मानसशास्त्रावर आधारीत लेखांचा हा एक फार मोठा खजिनाच आहे. यातही अनेक विभाग आहेत - आनंद, आरोग्य, निराशा, लैंगिकता, राजकारण , झोप वगैरे.

पीस

लेखक विभावरीकाले यांनी शुक्रवार, 07/09/2012 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रवाह कागडिया... सध्या मी एम. एल. ए असल्या मुळे तुम्हाला माझं बोलणं खरं वाटणार नाही. पण काही माणसाचं अजब असतात, जीवनात असल्या व्यक्तीं पेक्षा कितीही जास्त यश प्राप्त केलं, तरी तुम्हाला तुमच सर्व यश बेकार वाटतं आणि त्या व्यक्ति प्रती तुमच आकर्षण किवां कदाचित इर्षा वाढतच असते. माझं बोलणं नाहीना कळाल? जो पर्यंत तुम्ही माझ्या मित्र सुज्ञाला नाही भेटणार, तुम्हाला माझी गोष्ट नाही कळणार... ... आज चौकातून जात असताना, मी माझी 'एस्टीम' गाडी सूज्ञाचा चाळी समोर थांबवली.. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस, दुपारी चारचा सुमार होता.

व्हेज समर रोल्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 07/09/2012 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः राईस पेपर / शीट्स पातळ उभा चिरलेला कोबी पातळ उभं चिरलेलं गाजर पातळ उभी चिरलेली काकडी थोडे मीठ घालून उकडवून घेतलेल्या न्युडल्स (तुम्ही राईस न्युडल्स, पास्ता , काही ही वापरु शकता) १/२ टीस्पून पांढरी मिरपूड १ टेस्पून टोमॅटो सॉस स्वीट चिली सॉस सर्व्हींगसाठी

बार्ली डोसा

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 07/09/2012 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! 'या लेखकाने पाककृती विभागात सक्रिय लिखाण करण्याचं धाडस कसं केलं' असा विचार करून दचकू नका! ही पाककृती माझी नाही :-) तेंव्हा नि:शंक मनाने प्रयोग करा, हा पदार्थ फारच नामी होतो असा माझ्या जिभेचा दावा आहे! अमेरिकेत राहूनही फक्त शाकाहारी आणि फक्त स्वहस्ते शिजवलेलंच खाणार्‍या आमच्या परिचयातील हिमबिंदू या तेलुगू कन्यकेने, 'नेहमी नवीन काहीतरी प्रयोग करून पहायचं' या वृत्तीने ही अनोखी डिश खायला घातल्याबद्दल आणि त्याची पाककृती पुरवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

चावडीवरच्या गप्पा - प्रमोशन आणि आरक्षण

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 06/09/2012 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
“चिंतोपंत खरे नशिबवान आहात तुम्ही”, नारुतात्या चावडीवर हजेरी लावत. “काय झाले?”, चिंतोपंत बुचकाळ्यात पडत. “अहो काय झाले काय? रिटायर झालात तुम्ही! आमची अजुन आठ वर्षे जायची आहेत. आता काही नशिबात सिनीयर डिव्हीजनल ऑफीसरची पोस्ट नाही. प्रमोशन घेऊन रिटायर होणे हे आता स्वप्नच रहाणार असे दिसतेय”, नारुतात्या हताश स्वरात. “कशाला जीव जाळताय एवढा, व्ही.आर.एस. घेऊन टाका”, शामराव बारामतीकर “त्याने काय होणार आहे शामराव, नोकरीरुपी म्हातारी मरेल पण काळ सोकावतोय त्याचे काय?”, नारुतात्या. “अरे पण झाले काय ते सांगाल का?”, घारुअण्णा काहीच न कळल्यामुळे बुचकळ्यात पडून. “घ्या!

सोपी, स्वस्त व केव्हाही करता येणारी पाव भाजी

लेखक सदानंद ठाकूर यांनी गुरुवार, 06/09/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
पाव भाजी म्हटले कि ब-याच भाज्या वगैरे तयारी लागते, पण अगदी कमी साहित्यातही हि करता येते, पटकन होते व चांगलीसुध्दा लागते. साहित्यः ३ ते ४ कांदे, ३ ते ४ टॉमॅटो, २ ते ३ बटाटे, २ टे.स्पू. पा.भा.मसाला, मस्का किंवा गोडे तेल, २ टे.स्पू.

शब्दांचा स्पर्श !!

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 06/09/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
शांत स्वरात मिसळावा,अन एकच तरंग कानात घुमावा, इतका सुरेख प्रवास व्हायचा शब्दांचा ! कधी तोच शब्द, तुझ्या माझ्यात ओठांचा आधार घेऊन, अस्तित्व सिद्ध करायचा ! तर कधी, अबोल डोळ्यातल्या भावनेच्या स्वरूपात, स्वता:ला पहायचा ! मी खरच हरवून जायची ,उताविळ नजरेनं, तुझ्या नकळत तुझाच पाठलाग व्हायचा ! तुझ्या एकेक हालचालीवर, शांत नजरेन लक्ष ठेवायची मी, तुझं बोलन तुझं चालणं, अगदी तुझं माझ्याकडे चोरून बघणं हि मी मनमुराद लुटायची,पण मग कळलं, कि तुलाही शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचाय ! तुझ्याही डोळ्यात, त्या अर्थाचे भाव तयार झालेत, तुझ्याही ओठांवर त्या शब्दांना, स्पर्शाच्या खुणा ठेवायची इच्छा आहे ! बाहेरच्या जगापासू
काव्यरस

राज ठाकरेंनी अखेर बोनीकपूर च्या कार्यक्रमाचा विरोध थांबवला..!

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 06/09/2012 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच सहारा वन की कुठल्याश्या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाबाबत मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता तसेच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनाही चार खडे बोल वगैरे सुनावले होते.. भारताविरुद्ध रोज उठून काहीना काही दहशतवादी कारवाया करणाऱ्या, प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात पाठवणाऱ्या पाकिस्तानातील कलाकारांना इथे बोलावून त्यांच्याकरता रेड कारपेट घालण्याची काय गरज आहे? असे मुद्दे घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता..

उपांड्या घाट - मढे घाट

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी गुरुवार, 06/09/2012 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
१५.०७.२०१२ जून महिन्यात सुधागड परिसरात नाणदांड घाट केल्यानंतर जुलै महिन्यात कुठला ट्रेक करायचा हे ठरत नव्हते. ऑप्शन बरेच होते पण घाटवाट करायची म्हणजे जुलै महिना तसा गैरसोईचाच कारण ह्याच दिवसात वाटांवरचे गवत एवढे वाढते कि बस... पण शेवटी लाँग पेंडीग मध्ये असलेला मढे घाट आणि त्याला जोडून असलेला उपांड्या घाट करायचे असे ठरवले. ग्रुप मध्ये सर्वांना मेसेज टाकले पण बर्‍याच जणांना जमत नव्हते तरीही १२ जण जमलेच. मिपावर पण काही जणांना विचारले होते पण कोणाला जमत नव्हते पण अनपेक्षितरीत्या पिंगुचा "मी येतोय" असा रिप्लाय आला.