अलीकडेच सहारा वन की कुठल्याश्या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाबाबत मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता तसेच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनाही चार खडे बोल वगैरे सुनावले होते..
भारताविरुद्ध रोज उठून काहीना काही दहशतवादी कारवाया करणाऱ्या, प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात पाठवणाऱ्या पाकिस्तानातील कलाकारांना इथे बोलावून त्यांच्याकरता रेड कारपेट घालण्याची काय गरज आहे? असे मुद्दे घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.. जाहीर भाषण करून आशाताईंनाही फटकारले होते, त्याचप्रमाणे विविध वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमात मनसेच्या पित्त्यांनी सदर कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला होता
आम्हाला तेव्हा राजसाहेबांची भूमिका मनापासून पटली होती. कारण खरोखरच जो देश आपल्याशी केवळ शत्रुत्वाच्या नात्याने वागतो त्या देशाशी आपण सांस्कृतिक किंवा अन्य कोणतीही जवळीक केली तरी त्या पाकिस्तानचे शेपूट नेहमी वाकडे राहणार आणि भारतात अतिरेकी कारवाया करून निरपराध भारतीयांना ठार मारण्याचा त्यांचा उद्योग सुरूच राहणार..
तेव्हा अशा देशाच्या कलाकारांना इथे निश्चितच बोलावता कामा नये.. 'आपल्या देशात काय कमी मुलं आहेत जी चांगली गातात? त्यांना संधी द्या की..' - राज ठाकरेंच्या यादेखील भूमिकेचे आम्हाला खूप कौतुक वाटले होते..
परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क समझौता झाला म्हणे..!
आशाताईंसारख्या महान कलावंताला या कार्यक्रमात भाग न घेण्यासाठी जाहीरपणे चार खडे बोल सुनावणाऱ्या राज ठाकरेंनी त्या बोनी कपूरसमोरशी समझौता कसा केला ??
[संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे. धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती. वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील. धन्यवाद!]
वाचने
10587
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>शेवटी 'पैसा बोलता है.. '
नान्या
In reply to >>>शेवटी 'पैसा बोलता है.. ' by नाना चेंगट
पैसा देवो भव
वास्तव.
परंतु पैसा हा देशापेक्षाही,
आपल्याला असे म्हणायचे आहे का
In reply to परंतु पैसा हा देशापेक्षाही, by सुहास..
या बातमीत तथ्य किती काय ते
राज ठाकरेंनी त्या यःकश्चित
तो कसला वैयक्तीक , जागतिक
In reply to राज ठाकरेंनी त्या यःकश्चित by सुहास..
बाय द वे, सदर बातमी खोटी आहे
In reply to तो कसला वैयक्तीक , जागतिक by कॉमन मॅन
कुठून तरी ऎकलेल्या फुटकळ
In reply to बाय द वे, सदर बातमी खोटी आहे by किसन शिंदे
आम्हाला तेव्हा राजसाहेबांची
थोsssडे कष्ट
यापुढे पाक कलाकारांना घेऊन
In reply to थोsssडे कष्ट by अन्या दातार
तोडपाणी झाल्याचा कुठला पुरावा
In reply to यापुढे पाक कलाकारांना घेऊन by कॉमन मॅन
असा आमचा अंदाज आहे..
In reply to तोडपाणी झाल्याचा कुठला पुरावा by अन्या दातार
आरोपच!
In reply to असा आमचा अंदाज आहे.. by कॉमन मॅन
पब्लिक फोरमवर धागे काढण्यास
In reply to आरोपच! by अन्या दातार
वाट्टेल ते
आरं तेजायला
वाटलच होतं!!
अंतरे कोsपि हेतु?
फक्त 'गोची' एवढीच आहे कीं हे
In reply to अंतरे कोsपि हेतु? by सुधीर काळे
'मनाचे श्लोक'
घ्या! मग आमचे सोकाजीनाना
आयला सोकाजीनाना अंतर्यामी
खोके पोचले असावेत.
आयला अजुन एक अंतर्यामी.
In reply to खोके पोचले असावेत. by अप्पा जोगळेकर
प्रतिसाद अतिशय आवडला..
In reply to खोके पोचले असावेत. by अप्पा जोगळेकर
खोके पोचले असावेत.
In reply to खोके पोचले असावेत. by अप्पा जोगळेकर
एवढीच प्रतिक्रिया
कॉमन मॅन च्या धाग्याला काय
मग लोकपाल च्या वेळी काय
In reply to कॉमन मॅन च्या धाग्याला काय by अमोल खरे
clay feet
संपादितः मूळ धाग्यातील भाषा
मला एका जुन्या आयडीची
माउ
In reply to मला एका जुन्या आयडीची by कवितानागेश
तंतोतत!
In reply to मला एका जुन्या आयडीची by कवितानागेश
मी पहिल्या धाग्यालाच पकडलेला
मिपावरती
टाळ्या.
In reply to मिपावरती by परिकथेतील राजकुमार
शिट्ट्या.
In reply to मिपावरती by परिकथेतील राजकुमार
यांचे पालक संपादक कोण आहेत हे
In reply to मिपावरती by परिकथेतील राजकुमार
होय तेचायला. एकदा काय ती पालक
In reply to यांचे पालक संपादक कोण आहेत हे by नाना चेंगट
कोण रे तो?
In reply to होय तेचायला. एकदा काय ती पालक by बॅटमॅन
अच्छा
In reply to कोण रे तो? by पैसा
फेटे उडवले
In reply to मिपावरती by परिकथेतील राजकुमार
हेच लाडके सदस्य जेंव्हा
एका वेळेस किती धोतरांना फटाके
In reply to हेच लाडके सदस्य जेंव्हा by सुहास..
एका वेळेस किती धोतरांना फटाके
इथे कोणी धोतर वापरणारे असतील
In reply to एका वेळेस किती धोतरांना फटाके by विजुभाऊ
मुळात एक नक्कि राज ठाकरेंच राजकीय गणित जबरदस्त आहे.
छान
डोकेदुखीचा विषय
शेवटी राज ठाकरे एक राजकारणी
जोवर राज निर्दोष आहेत असे सिद्ध होत नाहीं तोवर ते दोषी आहेत?
हे तर सर्वच हिंदूत्ववाद्यांना
In reply to जोवर राज निर्दोष आहेत असे सिद्ध होत नाहीं तोवर ते दोषी आहेत? by सुधीर काळे
ह्या विषयावर वर्तमानपत्रां
सदर बातमीचा उल्लेख नितीन
In reply to ह्या विषयावर वर्तमानपत्रां by मराठी_माणूस
राजसाहेब "विकले गेलेले" दिसत नाहींत! (आजच मिळालेली नवी माहिती)