Skip to main content

पीत वसन, कमल नयन

लेखक स्पा यांनी गुरुवार, 27/09/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीचा उत्सव सुरु आहे.. घरी नसला तरी काकाकडे गणपती होता.. आपल्या हातून गणरायाची काहीतरी सेवा व्हावी असा उद्देश होता.. आज योग आला, घरी तसा लवकरच आल्याने एक गणपतीचं भजन म्हटलं गणपती तसा कलेचा भोक्ता ,त्यामुळे माझे जे काही वेडे वाकडे स्वर असतील ते नक्की त्याने मनापासून ऐकले असतील.. मनापासून गायलं कि तो मनापासून ऐकणारच.. शेवटी भाव महत्वाचा :) गणेश लेखमाला सुरु आहे मिपावर , हा लेख नाहीये..

कानसेन २०१२ भाग क्र. १०

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 27/09/2012 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंडळी गणपाच्या 'एक ही फिल्मसे' नंतर आज सगळी सोप्पी-सदाबहार गाणी घेऊन येत आहे..
गाणे क्रमांक विजेता
मराठे
मराठे
मराठे
चतुरंग, मराठे, स्नेहांकिता

स्वर साम्राज्ञी !

लेखक तर्री यांनी गुरुवार, 27/09/2012 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर सम्राज्ञी चा उद्या वाढ दिवस आहे. मला आठवते तेंव्हा पासून राणी गाते आहे. माझा एक काका “बाईंचा” मोठ्ठा पंखा होता. जाता जाता त्याने मला कोकिळेचा पंखा करून टांगले. रेडिओ मॉस्को वर “हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का” हे गाणे ऐकले आणि मी पुरता बिघडलो. पुढे जावून त्यामागच्या काळातील गाणी ऐकली आणि अनुशेष भरून काढला. शिरीष कणेकर वाचता झालो आणि हिरो वर्षीप सुरु झाली. भक्ती इतकी की कोणी मल्लिकेच्या गाण्याविषयी प्रतिकूल बोलले तर तो आयुष्यातून कटाप होत असे. पुढे वय वाढले आणि भक्ती कमी झाली आणि दिव्यत्वाची प्रचीती आली.

फेसाळबुक

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 27/09/2012 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायकोचं फेसबुक खातं नाहीये. मी तिला एक-दोनवेळा म्हटलं की फेसबुकावर खातं उघड पण तिला अजिबात रस नाही. तिचा प्रश्नः "काय करू मी फेसबुकावर येऊन?" "आपल्या शाळा-कॉलेजमधल्या मैत्रीणींशी आणि मित्रांशी कनेक्ट हो; फोटो शेअर कर...अजून काय? सगळेच करतात. आपण सगळ्यांच्या संपर्कात राहतो." "तुझे २०० मित्र आहेत फेसबुकावर, कुणा-कुणाशी तू वरचेवर संपर्कात असतोस? नुसतीच यादी मोठी असते, असा यादी करून ठेवलेला संपर्क खरे म्हणजे हृद्य नसतोच; तो नुसताच आभास असतो. तुमचा कॉलेजचा गृप पुण्यातच आहे. तुम्ही महिन्याला एकदा तरी भेटता, सहलीला जाता.

आई.....

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 27/09/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
आई..... थोडा वेळ बस अशी शेजारी... थोडं बोलायचय तुझ्याशी... कित्ती दिवस झाले न तुझ्या कुशीत नाही झोपलो... ना तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं कित्ती दिवस झाले तुझी बोटं नाही फिरली केसातून... आणि कित्ती दिवस झाले तुझ्या पदराला जेवल्यानंतर हात पुसून... बरेच वर्ष मला हे सार कधीच जाणवलं नाही आणि जाणवल्यावर मात्र अस कधी सांगताच आलं नाही... म्हणून आई आज थोडा वेळ बस अशी शेजारी... थोडं बोलायचय तुझ्याशी... आई... आज तुला रडताना पाहिलं आणि... आणि जाणवलं.... सगळ्यांच्या अपेक्षांचे ओझं वागवणं एवढं सुद्धा सोप्पं नसतं...
काव्यरस

'Lamhe' - A Journey With The Hundred Strings

लेखक अक्षया यांनी गुरुवार, 27/09/2012 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा एक इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप आहे. जो मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजीत करतो. अशाच एका महान कलाकाराचा कार्यक्रमाची साक्षीदार होण्याचे भाग्य नुकतेच मला लाभले. ‘Lamhe A Journey With The Hundred Strings’ असे या कार्यक्रमाचे नाव ठरले. पंडित शिवकुमार शर्मां यांचा हा कार्यक्रम धारवाड मध्ये करायचे ठरले आणि आम्ही तयारीला लागलो.ह्या कार्यक्रमाचे स्वरूप शिवकुमारजींचे फक्त संतूरवादन असे नसून त्यांचा सांगीतिक जीवन प्रवास अर्थात स्वतः त्यांचा कडून ऐकण्याची सुवर्णसंधीही होती..

शुभंकरोति

लेखक तिमा यांनी गुरुवार, 27/09/2012 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
शुभंकरोति काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा! स्कॅमं करोति कल्याणम भूखंड्म जलसंपदा सुष्टबुद्धी विनाशाय ब्रिगेडशक्ती नमोस्तुते || आजोबा, पणजोबा नमस्कार तुम्हीच आमचे तारणहार सर्वांना वाकून नमस्कार दिवा लावला दिल्लीपाशी आमची सत्ता घराण्यापाशी ||
काव्यरस