Skip to main content

स्वैर त्याची ही कहाणी...

लेखक वेणू यांनी शनिवार, 29/09/2012 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला हा पाऊस नको एकटी जाऊस, सखे, उनाड हा द्वाड तुज पाडेल भरीस... जरी सखा हा लाडका पण नाठाळ गं भारी, सांभाळून वाट चाल आहे लबाड रंगारी.. स्वैर रूप तो धारिता राधा तूही रंगशील, रंग त्याचा तुझा एक कशी विलग होशील? बरसेल आसुसून तुज करील बेधुंद, परि सावर स्वतःला नको होऊस बेबंद.. क्षणी भान तू हरता त्याचे आयते फावेल, चिंब तुजला करून मनाजोगते साधेल... वारा मदतीस त्याच्या, तुझा पदर ढाळाया.. धाव- धावशील कोठे? चराचरी त्याची माया तुझे वेड त्याला आहे, जशी त्याची तू दिवाणी परि जप तुज सखे, लाज राखूनिया मनी... आज इथे उद्या नाही, स्वैर त्याची ही कहाणी मग झुरशील पुन्हा गात विरहाची गाणी...!! -ब्लॉगवर पूर्

त्याला लागते जातीचे, येरे गबाळ्याचे काम नव्हे

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 28/09/2012 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर मधल्या पंचायती निवडणुका इस्लाम विरोधी ठरवून लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहदीन आणि जैशे मोहमद सारख्या दहशतवादी संघटनांनी एका पत्रका द्वारे फतवा काढून खोऱ्यातील गावांतल्या सरपंचांनी राजीनामे देण्यात यावेत असे आवाहन केले. या आवाहनाला जेव्हा कोणी बळी पडत नाही असे जाणवले तसे धाक घालण्यासाठी दहशदवाद्यांनी सरपंचांना गोळ्या घालून मारण्यास सुरवात केली आहे. पंच मुहंमद शफी तेली ह्यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली. आता पर्यंत चार सरपंचांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे. हे सर्व उत्तर काश्मीर बारामूल्ला भागात घडले. मुहंमद शफी तेली क्रिरी भागातला होता.

कानसेन कोण? २०१२ स्पर्धेचा निकाल.

लेखक रेवती यांनी शुक्रवार, 28/09/2012 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमैत्रिणींनो, "कानसेन कोण?: २०१२" स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. अनेक मिपाकरांनी उत्साहाने भाग घेऊन ती यशस्वी केली याबद्दल सर्वांचे आभार. 'कानसेनच्या' निमित्ताने बर्‍याचजणांना आपापल्या आठवणीतील गाणी पुन्हा भेटली, आनंद देऊन गेली. सुरावट ओळखणे, चुकणे यांची धमाल अनुभवायला मिळाली. स्पर्धेत होणारी लुटुपुटीचे भांडणे, तात्पुरता जय, पराजय अनुभवताना पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले.

तु ..

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 28/09/2012 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : पळुन गेली आहे. तु चॉकलेट केक आहेस, 'क' मालिकेत ला ब्रेक आहेस , पाच कोटीचा चेक आहेस, ...

राम .. राम .. राम ..

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 28/09/2012 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम... राम... राम... राम ... माळ घेऊन माझा जप चालू आहे कानावर बातमी पेट्रोल डिझेल महागले राम .. राम .. राम .. माळ घेऊन जप चालू कानावर बातमी कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा राम . राम. जप चालू राम . सिलेंडरची टंचाई मरा.. मरा.. मरा... आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक ! .

कताई शास्त्र ७

लेखक बापू मामा यांनी गुरुवार, 27/09/2012 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन व मध्ययुगीन काळात कताई हा एक कुटिरोद्योग होता. कापूस उत्पादक शेतकरी, लोकर उत्पादक धनगर, स्वतः सूत कातत्,व विणकर कोष्ट्यांना देत. विणकर त्यांचे कापड विणून परत देत. हा सर्व व्यवहार बलुत्यावर चाले.त्या काळी कताई तकली वर चाले,व सायंकाळी घरोघरी हा उद्योग चाले. महात्मा गांधींना अशा प्रकारची स्वयंपूर्ण खेडी अभिप्रेत होती. त्या मुळे, एकाच यांत्रिक कारखान्यात कापड बनवून विकणे त्यांच्या कल्पनेत बसत नव्हते.