Skip to main content

मिसळपाव दिवाळी अंक

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 13/10/2012 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या वर्षी मिसळपावचा दिवाळी अंक काढावा असे ठरले आहे. त्यासाठी सदस्यांकडून लेख, कथा, कविता, पाककृती, भटकंती, कलादालन अश्या मिपावरील सर्व साहित्यप्रकारातील साहित्य आमंत्रीत आहे. दिवाळी अंकासाठी आपले साहित्य येत्या २५ तारखेपर्यंत पाठवायचे आहे. तसेच हे साहित्य दिवाळी अंक या खात्यावर पाठवायचे आहे. दिवाळी अंकाविषयी अन्य काही शंका किंवा प्रश्न येथे या धाग्यावर विचारू शकता किंवा दिवाळी अंक या खात्यावर संदेश पाठवू शकता. तसेच काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे. - नीलकांत

लवकरच एका सुर्याचा अस्त...!

लेखक चिम् चिम् मामा यांनी शनिवार, 13/10/2012 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
'I don't think I have plenty of cricket left in me'--सचिन तेंडुलकर हि बातमी वाचली आणि डोळ्यात टचकन पाणी आले... सचिन...सगळ्यांचा "तेंड्ल्या" आपल्याला काही दिवसानंतर कधीच त्या खेळतट्टी दिसणार नाही, या विचरानेच मन बैचेन झाले. क्रिकेट ते पण तेंडल्या शिवाय विचार ही करवत नाही. त्याची २३ वर्षांची कारकिर्द डोळ्या समोर आली... १६ वर्षांचा असताना न घाबरता "वसिम अक्रम, वकार युनुस सारख्या बॉलरला सामोरा गेलेला... ते आत्ता मागच्या वर्षी वल्ड्-कप जिंकल्यावर पळत येउन युवराजला मिठी मारणारा सचिन... सामना चालु असताना...सचिन आउट झाला तर आपण टि.वी बंद करायचो...

पुस्तक संस्कृती/पुस्तक प्रदर्शन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 12/10/2012 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
वाचन संस्कृती लोपण्याच्या काळात,काहि व्यक्ति यासाठी हिरिरिने काम करतात.ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद असते. शिवाय ज्या भागात पुस्तकांची म्हणुन विशेष दुकाने नाहित तिथे तर अश्या कामांना अतिशय महत्व असते. हेच काम आज राज जैन यांनी सिंहगड रोडवर पुष्पक मंगल कार्यालय येथे १० दिवसांचे पुस्तक प्रदर्शन भरवुन केले आहे. वेगवेगळे बहुविध विषय,आणी दर्जेदार प्रकाशनं या दोहोंचा मिलाफ राज जैन यांनी उत्तम घडवुन आणला आहे.

कबुतरे............

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/10/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
कबुतरांचा उपयोग. असाही..... बर्‍याच लोकांच्या कबुतरावरच्या एका काथ्याकुटावरच्या प्रतिक्रिया वाचून करमणूक झाली पण त्याच वेळी एका वाचलेल्या लेखाची आठवण झाली.

चावडीवरच्या गप्पा – लग्नाचे वय

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 12/10/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
“कळस आहे हा मूर्खपणाचा! हसावं का रडावं ह्यापुढे आता?”, नारुतात्या कपाळाला हात लावतच चावडीवर आले. “कोणांचा आणि कसलां मूर्खपणां नारुतात्या?”, घारुअण्णा. “अहो, ही खाप पंचायत हो! म्हणे मुला- मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करा, का? तर त्याने म्हणे बलात्काराचे वाढते प्रमाण कमी होईल, आहे की नाही मूर्खपणा”, नारुतात्या. “ह्या शिंच्या पंचायतीला भारीच ब्वॉ पंचायती?”, घारुअण्णा. “सोळाव्या वर्षीच मुलामुलींचे लग्न झाली तर ती भरकटणार नाहीत आणि त्यातून बलात्काराच्या घटना घटतील असे त्यांचे म्हणणे आहे हो.”, शामराव बारामतीकर. “आयला खरंच आचरटपणा आहे हा.

मूगाच्या डाळीची खिचडी

लेखक Pearl यांनी गुरुवार, 11/10/2012 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
हा वन डीश मील साठी छान, सोपा, टेस्टी ऑप्शन. ही खिचडी कमी तिखट केली तर लहान मुलं पण आवडीने खातात. लहान मूलांना द्यायला हा एक हेल्दी ऑप्शन आहे. साहित्यः अर्धी वाटी तेल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, कढिलिंबाची ४-५ पानं, २/३ पाकळ्या लसूण बारीक चिरून किंवा किसून (साधारण १ टीस्पून), कच्चे/भाजलेले शेंगदाणे पाव वाटी, सुकं खोबरं अर्धी वाटी, गोडा मसाला अर्धा टीस्पून, तिखट अर्धा टीस्पून, तांदूळ १ वाटी, पाऊण वाटी हिरवी (स्प्लिट) मूगडाळ, १ टीस्पून मीठ, ४ वाट्या पाणी कृती: १) एका स्टीलच्या कुकरमध्ये तेल गरम करत ठेवावे.

कबुतरांचा दहशतवाद

लेखक तिमा यांनी गुरुवार, 11/10/2012 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत आम्ही एका उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर रहातो. सोसायटीला आता तशी बरीच वर्षे झाली आहेत. पहिली अनेक वर्षे या वरच्या मजल्याचे आम्हाला आणि घरी येणार्‍या परिचितांना कोण कौतुक होते. भरपूर हवा, प्रकाश यामुळे पंख्याची आवश्यकताही कमी भासे. तसेच, वर गच्चीत जाणे हे सोपे असल्यामुळे, ते एक विशेष आकर्षण होते. संध्याकाळी नुसते गच्चीत जाऊन पाय मोकळे केले व चौफेर दिसणारे विहंगम दृश्य बघत बसले तरी एखादा तास सहज जात असे. कालांतराने सोसायटीतले जुने सदस्य सोडून जायला लागले व त्यांच्या जागा, अव्वाच्यासव्वा किंमतीला विकत घेऊन, अमराठी सदस्य वाढायला लागले.