Skip to main content

सस्नेह आमंत्रण

लेखक सुर यांनी मंगळवार, 23/10/2012 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना, सस्नेह आमंत्रण, ऊद्या सकाळी साधारण ०५.३० ते ०६.०० च्या दरम्यान विक्रोळी येथील बिल्डींग नंबर २०,टागोर नगर येथुन देवी ची भव्य मिरवणुक निघणार आहे.

नवीन सल्लागार

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 23/10/2012 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिसळपावच्या सल्लागार मंडळात चित्राछोटा डॉन सहभागी होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा मिसळपावला लाभ होत राहील अशी अपेक्षा आहे. - नीलकांत

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - शनिवारवाडा – अहमदनगर – घृष्णेश्वर

लेखक सारथी यांनी मंगळवार, 23/10/2012 03:13 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या सुरवातीला ०३ जानेवारी ते २५ जानेवारी २०१२ रोजी सुमारे २५० जणांनी “ पुणे ते पानिपत ” असा दुचाकीवर सुमारे ६००० किमी चा प्रवास केला. प्रवासात उन, हाडं गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस या सर्वांचा सामना करत हि मोहीम मावळ्यांनी यशस्वी केली. या मोहिमेचं सगळं श्रेय जातं ते आयोजक डॉ. संदीप महिंद यांना.

टेंन्शन...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 22/10/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...! देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं... की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं... पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही... समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही? सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय???

''ब्लॉग माझा''...अभिनंदन आणि शुभेच्छा..!

लेखक खेडूत यांनी सोमवार, 22/10/2012 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
''ब्लॉग माझा'' या जालिय मराठी अनुदिनी स्पर्धेचा निकाल सालाबादप्रमाणे लागला आहे. आपले लाडके मिपाकर त्या यादीत असणे अपेक्षित पण सुखावणारे आहे. सोत्रि,नरेंद्र गोळे आणि मुटे काका माहीत आहेत. याशिवाय इतरही अनेक जण मिपाकर असतील.सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..! दिसामाजी काही लिहीत जावे' हे ठीक, पण ते काही तितके सोपे नाही, हे आम्ही स्वानुभवाने कधीच ओळखले आहे. काय लिहायचे जा प्रश्न नसून कसे आणि किती लिहायचे हा खरा प्रश्न असतो. शिवाय वाचणार कोण? हा तर त्याहून मोठा प्रश्न! मिपावर येण्याचा (आणखी एक) फायदा म्हणजे स्वाक्षरीतून इतरांची मुशाफिरी पण माहीत होते.

महालक्ष्मी दर्शन

लेखक लीलाधर यांनी सोमवार, 22/10/2012 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजितै! शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते!! यादेवी सर्वभूतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः !! मंडळी नवरात्रात माझ्या घरी अशी महालक्ष्मीची स्थापना करुन तिचे समोर घागरी फुंकल्या जातात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की महाल्क्ष्मी बरोबर शंकर भगवान कशाला आहेत ? त्याचे उत्तर असे की, कोल्हापूरची महालक्ष्मी व तुळजापूरची भवानीमाता यांच्या शिरस्थानी शिवलिंग धारण करुन त्या विराजमान झाल्या आहेत... सो महालक्ष्मी ज्यावेळेस पूजतात त्यावेळेस शंकर भगवानांची देखील स्थापना करुन त्यांची पूजा केली जाते.

बाँबे टॉकीज

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 21/10/2012 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमधल्या बर्‍याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं. ( तरीही कानसेन कसंबसं निभावून नेलं खरं) त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्‍याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता.

नवरात्र उत्सव २०१२ (टेंभी नाका) ठाणे.

लेखक मदनबाण यांनी रविवार, 21/10/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी. :) काल ठाण्याच्या टेंभी नाका स्थित देवीचे दर्शन घेउन आलो. :) या वेळी मदुराईच्या मिनाक्षी मंदीराची ७० फुट उंच प्रतिकॄती साकारण्यात आली आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीचा ओघ आणि बाहेर खरेदीचा भरलेला बाजार पहायला मिळाला.एव्हढ्या गर्दीत फोटो कसे काढायला मिळतील असा विचार मनात डोकावुन गेला,पण संधी मिळाली.

उपवासाला कुठले पदार्थ चालतात?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 20/10/2012 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
बटाटा, रताळे, केळे, वरई, साबुदाणा, शेंगदाणे हे माहित असलेले काही पदार्थ आहेत, मला एक प्रश्न पडतो कि उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो किंवा चालत नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. कुठल्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे काय? तसेच कर्नाटकात चालणारा पदार्थ महाराष्ट्रात चालत नाही असे काही प्रांतिक भाग पण त्यात आहे म्हणे? मला शेंगदाण्याची गंमत वाटते कि शेंगदाणा चालतो पण शेंगदाण्याचे तेल चालत नाही. एखाद्याने ठरवले की मी उपवासाला हलका पदार्थ म्हणुन फक्त भातच खाईन पण ते चालत नाही.उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य.