Skip to main content

आठवणींचा प्रवास

लेखक जागु यांनी रविवार, 04/11/2012 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहीलं तर चित्रपट सृष्टी आणि मी ह्यात भरपूर अंतर आहे. लग्नापूर्वी वेळ भरपूर असल्याने माझ्या तुलनेने बरेच चित्रपट पाहिले आहेत, त्यातील हिरो- हिरॉईन पाहणे आणि ती कथा जाणणे एवढ्यातच इंटरेस्ट असायचा. बाकी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, गायक कोण हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच नाही केला. त्यामुळे चित्रपटसृष्टीबद्दल लिहिणे म्हणजे माझ्यासाठी बालवाडीतल्या विद्यार्थ्याने जोडाक्षरे लिहिण्यासारखे आहे. तरी पण चित्रपट सृष्टीच्या माध्यमांच्या संदर्भात जी काही माहिती डोळ्यांनी पाहिली, अनुभवली आहे ती नम्रपणे रेखाटण्याचा प्रयत्न करते. पूर्वी १०० घरांतून एखाद्याकडे टीव्ही असायचा.

क्षण ते...

लेखक कौस्तुभ आपटे यांनी शनिवार, 03/11/2012 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण ते (कॉलेज डेज) क्षण ते, फांदीवरी बसलेले क्षण ते, झुळकीसवे झुरलेले क्षण ते, संपुनही उरलेले मज मिळतील का पुन्हा सवे, झुलतील का पुन्हा मज सांग रे मना. क्षण ते... ॥धृ॥ नभ भासे विहरण्या, पंखाना तोकडे थांबावे ते कुठे, नच आम्हा सापडे त्या पक्षांचे थवे, आता जमतील का पुन्हा भिजुनी मने, जुळतील का पुन्हा क्षण ते .. ॥१॥ हसण्यात आमुच्या जग सारे विरघळे गाण्यात आमुच्या मन सारे पाघळे रंगाने आमुच्या आता रंगेल का आकाश गंधाने आमुच्या पसरेल का सुवास क्षण ते ... ॥२॥ काळ जाई रे पुढे मन मागे ओढते गळलेली ती फुले पुन्हा जोडु पाहते त्या बागेत बहर आता नाचेल का पुन्हा मातीत आमुच्या दिसतील का खुणा क्षण ते ...
काव्यरस

मूग पोहा कटलेट

लेखक neeta यांनी शनिवार, 03/11/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः भिजवलेले जाड पोहे १ वाटी,उकडलेले मूग अर्धी वाटी ( थोडेसे उकड्वावे जास्त मऊ नको), १ कांदा बारीक चिरलेला, साखर पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा आल हिरवी मिरची पेस्ट. १ उकडवलेला बटाटा.पाव वाटी रवा. क्रूती : प्रथम भिजवलेल्या पोह्यामध्ये उकडलेले मूग्,उकडलेला बटाटा, कांदा व बाकी साहित्य घालावे.मिश्रण हलक्या हाताने मळून त्याचे आपल्याला हव्या त्या शेप मध्ये कटलेट बनवावे, रव्यामध्ये घोळवून तळावेत अथवा तव्यावर तेल घालून भाजावेत. कोथींबीर , हिरवी मिरची व पुदीन्याच्या चटणी बरोबर खायला द्यावेत. शक्यती गरमच खावेत.

प्रेमाचा विडा

लेखक वडापाव यांनी शनिवार, 03/11/2012 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी नि माझी जोडी जमली, तर किती गं येईल मज्जा! बँडस्टँडवर जाऊन रोमान्स करु, गं सोडून सगळी लज्जा! गीतांजलीच्या बागेमधली फुलं गं गपचूप वेचू, गच्चीत जाऊन लाडात येऊन एकमेकांना जवळ खेचू क्लास बुडवून, थापा मारून भेटण्यात असतं खरं थ्रिल! क्लास संपला तरी भेटता येईल, देअर्स अ वे इफ देअर्स अ विल! रात्रभर कॉल नि चॅटिंग करू, झोपून उठू दुस-या दुपारी टीनेज प्रेमाचे विक्रम करण्याचा, घेतलाय विडा, घेतली सुपारी

असतेस घरी तू जेव्हा.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 03/11/2012 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
(संदीप सलील यांची माफी मागून सगळ्या हतबल पुरुषांसाठी नवीन स्त्रीसूक्त) असतेस घरी तू जेव्हा... जीव उंदराएवढा होतो..... कुत्रं लागल्यागत मागे... मी इकडे तिकडे पळतो.... भूत पाहून बोबडी वळावी बर्फाळ तसा मी होतो... तुझी नजरच खलास करते.. अन देहच आडवा होतो........ येतात शेजारी दारापाशी.... उत्साहाने उजळती तोंडे........ कुणी हळूच डोकावले घरी.... तर त्यालाही प्रसाद मिळतो.... तव भीतीत थरथरणार्या... मज स्मरती हजार वेळा........ मार खाऊनच बाहेर पडावे... हा असाच शेवट होतो..... तू संग सखे मज काय मम गुन्हाच नक्की कसला? आयुष्याचा हा एक त्रास न कळेना कधी हा संपतो?? जरी झालो तुझाच नवरा ना शूर मी अजुनी झ
काव्यरस

पाकी शेरनी!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 03/11/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानातील एक पत्रकार, विचारवंत महिला मारवी सरमद ह्यांची ही एक झलक पहा http://www.youtube.com/watch?v=ZdLvNH_BkRk अजूनही अनेक उदाहरणे सापडतील. एकंदरीत पाकिस्तानात मुसलमानांप्रमाणेच हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध, शिया, अहमदी हे बरोबरीचे नागरिक आहे हा मुद्दा अगदी आक्रमकतेने मांडणारी एक महिला. पाकिस्तानवरचा इस्लामी पगडा कमी करण्याकरता आपल्या परीने निर्भय प्रयत्न करणारी एक महिला विचारवंत.

शाहू मोडकांशी वार्तालाप- एक आठवण

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 03/11/2012 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
शाहू मोडकांशी वार्तालाप पुण्यात सुभाषनगर मधून चाललो होतो तेवढ्यात एक जुन्या पिढीतले वयस्कर गृहस्थ भेटले. अशीच ज्योतिषाच्या सर्व्हेनिमित्त ओळख. "तुम्ही परवा शाहू मोडकांच्या व्याख्यानाला आला होतात का? " मी नाही म्हणालो. मुंबईत होतो मी. " फार सुंदर झाले व्याख्या्न. काय गाढा व्यासंग! त्यांनी बोलाव आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाने ऐकावं. ज्योतिषशास्त्राचं फार चांगलं विवेचन केलं. अध्यात्माची जोड हवीच तरच ते ज्योतिषशास्त्र. तुम्ही भेटा की मुंबईत. शिवाजी पार्कला राहतात. " मी नाही म्हणलं तरी भारावून गेलो. " हं आणि फोनवर अपॉइंटमेंट घ्या.

पराभव...

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 03/11/2012 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी जेव्हा उभा रहातो स्वतः विरुद्ध लढायला.. तेव्हा लक्षावधी विचारांच्या झुंडीच्या झुंडी घेरतात मला निमिषार्धात.. मी एकटा केविलवाणा दुर्बल.. सुळावर चढवलं जातय मला... विचारांचा एक एक बोचरा खीळा ठोकला जातोय माझ्या मेंदुत हृदयात, शरीराच्या प्रत्येक संवेदनशील भागावर प्रचंड अत्याचार...!!

मुली आणि आम्ही

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 02/11/2012 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे.