Skip to main content

आणि अचानक त्या वेळी..

लेखक ह भ प यांनी शुक्रवार, 09/11/2012 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी अचानक तुझी पुन्हा भेट झाली, तुला पाहताच माझ्या मनी जुन्या आठवणींची कालवाकालव झाली.. आठवले ते मोरपंखी दिवस तुझ्या सहवासात घालवलेले, आठवले ते सोनेरी क्षण तुझ्या परीसस्पर्शाने बहरलेले.. आठवले ते तासन-तास तुझ्याच प्रतिक्षेत घालवलेले, आठवली ती प्रेमपत्रे तुझ्या मैत्रिणींद्वारे तुला धाडलेली.. प्रेमाचा शिडकावा करुन तु नकळत मला सोडुन गेलीस, आणि आज इतक्या महिन्यांनी पुन्हा माझ्या सामोरी आलीस.. आज तुला असं समोर पाहुन काय बोलावं तेच कळत नाही, तुझी खुशाली विचारायला साधा शब्दसुद्धा सुचत नाही.. वाटलं माझ्या मनाला विचारावं तुला 'सोडन का गेलीस मला?' आणि अचानक त्या वेळी तुच म्हणालीस मला, खुप

गुर्‍हाळ लावलय गुर्‍हाळ....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 09/11/2012 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
या हो मंडळी... गोडखाऊ...साखरखाऊ...गुळखाऊ.... या हो या.... अशी जोरदार हाळी द्यावीशी वाटल असं ठिकाण बगितलं आंम्ही..http://www.misalpav.com/node/23073 पांडवेश्वर दौर्‍याहुन परतताना. अगदी येक नंबर जागा बघा... येकदम मेमरेबल. त्याचं काय हे ना,गुर्‍हाळ मंजे गावकडच्या पब्लिकला म्हाइत असनारी गोष्ट...! पन शेराकडल्या मानसास्नी ह्ये असलं काय बगाया मिळालं,की ल्हान पनी जत्रेत बापाकडनं न मागता जंबो मिळायागत आनंद हुतो बगा...म्हनुन आज आपुन त्येची सफर करायची.

तडकलेली स्वप्न काच

लेखक कल्पी जोशी यांनी गुरुवार, 08/11/2012 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
तडकलेली स्वप्न काच पायात् रुतलेली अन पाऊल पुढं टाकता टाकता माझी मी खचलेली एक फ़र्लांगभर दूर एका मंदिरातला घंटानाद ऐकुन ,पुन्हा माजघरात रडत बसते फ़ुटेस्तोवर ऊर मापं ओलांडल्याच्या पाऊलखुणा अजुनही घाबरवतात थोडी जरा मागे फ़िर बजाऊन किंकाळतात चौकटितल्या आत एक देवघर देवघरातली ज्योत पाठीवर हात फ़िरवताना सांगत असते.....बाईचं जिणं असच असतं मापाच कलंडण... पैजणाच्या सुरात शेवटपर्यत रुणझुणत असतच श्वासातली काही नावं अस्पष्टच हुंकारतात ऐकुन न ऐकल्यासारखी कानात धुसफ़ुसतात कल्पी जोशी

नामाचिये बळे

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 08/11/2012 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
जेवल्यानंतर खरेतर आता पुन्हा शेतात जायचा कंटाळा आला होता.दिवसभर शेतातून नदीवर फेऱ्या घालून मी भयंकर थकला होतो .वीजमंडळाला दिवसभरात भरपूर शिव्या घातल्या होत्या. का नाही शिव्या घालणार , नदी ते शेत दीड किलोमीटर अंतर पंप चालू करून आलो नि पाटाने शेतात पाणी आले नि एखादा वाफा झाला कि लगेच लाईट जायची मग पुन्हा नदीवर जावे लागे. परत पंप चालू करून आलो कि पुन्हा तेच नुसता वैताग आणला होता ह्या लाईट वाल्यांनी शेजारच्या एम आई डी सीत थोडी सुद्धा लाईट जात नव्हती. आणि बाकी गावांनी आठ आठ तास लोड शेडींग, लोड शेडींग मध्ये लाईट अजिबातच नसते पण इतर वेळीही सारखी ये जा चालू असते.

ट्रेडींग करताना स्टॉपलॉस कसा लावावा?

लेखक संदीपसाठे यांनी गुरुवार, 08/11/2012 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेडींग करताना स्टॉपलॉस कसा लावावा? शेअरबाजारात होणारे संभाव्य नुकसान कमीतकमी राखण्यासाठी अनुभवी ट्रेडर्स स्टॉपलॉसचा प्रभावी वापर करतात- हे आपणाला माहितच आहे. एकाच ट्रेडमध्ये मोठे नुकसान करून घेवून बाजाराला रामराम ठोकणा-या ट्रेडरपेक्षा अनेक ट्रेडमध्ये किंचित नुकसान घेणारा ट्रेडर बाजारात अधिक काळ टिकून राहू शकतो. मोठ्या फायद्याची संधी त्यालाच मिळत असते. साधारणपणे डे-ट्रेडच्या बाबतीत जास्तीत जास्त १% ते २% नुकसान ही मर्यादा पाळण्याची पद्धत आहे.

कोर्लई चा किल्ला आणि पोर्तुगीज (क्रिओल) भाषा....

लेखक संदीपसाठे यांनी गुरुवार, 08/11/2012 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.अलिबागहून मुरुड कडे जाताना वाटेत लागणारा हा किल्ला समुद्रात घुसलेला किंवा समुद्राने वेढलेला दिसतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला "नौ लिन्ग" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे. इ.स.

ऊन-सावली नाते अपुले

लेखक जयवी यांनी गुरुवार, 08/11/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
. पानावरच्या दवबिंदूपरी सजते, निसटुनिया विरते ऊन - सावली नाते अपुले कधी हसते अन्‌ कधी रुसते कधी हिरवाईच्या मखमाली भिरभिरते अन्‌ बागडते कधी काहिली, कधी होरपळ कधी पेटुनी धगधगते कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी चमचमते अन्‌ लखलखते कधी गर्द अवसेच्या राती काळोखातुन पाझरते लडीवाळ कधी मोरपिसापरी हळुच कानी कुजबुजते कधी अनावर प्रपातापरी दुमदुमते अन्‌ कोसळते कधी मौनाच्या बंद क्षणांनी हिरमुसते अन्‌ मुसमुसते कधी शब्दांच्या पागोळ्यातुन गहिवरते अन्‌ रिमझिमते विरहाच्या एकांती नाते उष्ण आसवांनी भिजत
काव्यरस

स्वार्थ..

लेखक राघव यांनी गुरुवार, 08/11/2012 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थामधेच सारा आनंद मानतो मी! निस्वार्थ म्हणविणारा नसत्या भ्रमात आहे! ऐसे अनेक आले.. आले तसेच गेले.. माझी इथेच सत्ता तरीही भरात आहे.. संतांस काय जाते नीती जपा म्हणाया.. नाही सुखास म्हणणे अवसानघात आहे धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी.. आता मिजास माझी.. तुमची वरात आहे.. -- चघळून रक्त अपुले, कुत्रा सुखावतो ना? आमीष हाडकाचे.. अन्‌ मी सुखात आहे! राघव