Skip to main content

आक्रमण

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/12/2012 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सतत भेटीला येणा-यांची वर्दळ काही नजरा झुकलेल्या, काही चोरुन न्याहाळणा-या काल ते पोलिस देखील असेच काय काय विचारीत होते. तिला काहीच उमजत नव्हते, हे कोण आहेत, कशाला चवकशा करीत आहेत? नवरा तिला सारखा समजावित होता. अग तू धीराने घे.

देवबाग - तारकर्ली (महाराष्ट्राचे मॉरिशस)

लेखक नांदेडीअन यांनी सोमवार, 17/12/2012 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
दरवेळी प्रवासात असतांना प्रवासवर्णन लिहायचेच असे मनाशी पक्के ठरवत असतो, पण प्रवासातून परतल्यावर लिहावेसेच वाटत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फेसबुक. (पूर्वी ऑर्कूट.) हो. कॅमेरा हातात पडल्यापासून लिहिणे कमी झाले आहे आणि फोटोग्राफी जोमात सुरू झाली आहे. त्यामुळे एकदा का प्रवासाच्या फोटो फेसबुकवर टाकल्या की मग लिहावेसेच वाटत नाही. पण आता लेखनसुद्धा परत सुरू करण्याचा विचार करतोय. त्यामुळे एक आत्मिक समाधान मिळते. असो, पुरे झाले माझे लेखनपुराण, विषयावर येतो. दरवर्षी आम्ही कुठेतरी फिरायला जातो आणि या वर्षातली ही दुसरी वेळ. (फेब्रुवारीमध्ये ताडोबाला जाऊन आलो.

पु.ल.देशपांडे उद्यान (सिंहगड रोड)

लेखक neeta यांनी सोमवार, 17/12/2012 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच पुण्यामध्ये सिंहगड रोड्वर ओकायामा ( पु.ल.देशपांडे उद्यान) पाहिली. महानगरपालिकेचे उद्यान असूनही इतके साफ आणि सुंदर आहे. सर्वांनी जरुर भेट द्या. काही फोटो टाकत आहे.

स्ट्रॉबेरि - बनाना स्मुदि...

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 17/12/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
Smoothie उन्हाने अंगाची काहीली झाल्यावर ह्या थंडगार स्मुदिचा आस्वाद घ्या आणि मोठे/बच्चे कंपनीला खुश करा... साहित्यः १. स्ट्रॉबेरि - ८ ते १० २. पीकलेली केळि - २ ३. दहि - १/२ कप ४. साखर - २ ते ४ चमचे ५. बर्फ - ६ ते ८ तुकडे कॄती: १. स्मुदि करण्याआधि १/२ तास सर्विंग ग्लास (रिकामे) फ्रिजर मधे ठेवेणे २. ब्लेंडर मधे सर्व साहित्य एकत्र करुन मिश्रण स्मुथ होईपर्यत फिरवणे ३.

Arkansas

लेखक शैलेंद्रसिंह यांनी सोमवार, 17/12/2012 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री साडेबारा वाजता फ़ोन आला....सकाळी ३ वाजता एअरपोर्टला जाऊन कार रेंट करायच्या आहेत, ४ वाजता परत येऊन सगळ्यांना घेऊन आरकंसास च्या ओझार्क टेकड्यांकडे निघायचंय...२ दिवस कॅम्पिंग करायचीय. नकार द्यायचा प्रश्नच नव्हता..कारण तसा ऑप्शन दिलाच नाही....नुकताच टॅको बेल मधुन चालुपाज घेऊन आलो होतो. दोन-दोन चालुपाज हादडले...किचनची आवराआवर, डिश वाशर लावता लावता १:३० वाजले आणि मग बेडवर लॅपटॉप घेऊन ऑर्कुटींग सुरु केली. काही पोस्ट वाचता वाचताच झोप आली...आणि तसाच झोपलो. ३ वाजता उठायचे टेंशन होतेच. पण तरीही ४:१५ वाजता फ़ोन आला तेव्हाच उठलो.

आमची मुंबई गलिच्छ मुंबई!

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 17/12/2012 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एका जागतिक सर्वेक्षणात मुंबई हे सगळ्यात गलिच्छ शहर असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. तसेच सौजन्याने वागण्यातही मुंबई पिछाडीवर आहे. अगदी सगळ्यात शेवटी नाही एवढेच. गेल्या काही वर्षात जेव्हा जेव्हा मुंबईला जायचा प्रसंग आला तेव्हा ते शहर अधिकाधिक घाणेरडे वाटत होते. लोकल जायचा मार्ग हा एक लांबच्या लांब कचराकुंडी आहे असे वाटले. समुद्राचा रंग गटारासारखा किळसवाणा होता. बाकी भिकारी, वाटेल तिथे मलमूत्रविसर्जन वगैरे होतेच. ह्या सर्वेक्षणाच्या निकालावरून ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जुन्या सिनेमात मुंबईचे दर्शन होते तेव्हा एक छानसे शहर दिसते.

संक्षीप्तानुभव

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 17/12/2012 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या काही सदस्यांशी नुकत्याच गप्पा झाल्या. मिपावर येणारे जिलब्यापाडू धागे, धोधो येणारी खल्लास विडंबनं, नवलेखकांचा नवखा उत्साह, स्वतःची मतंच खरी मानणारे, ती दामटणारे काही सदस्य असं सगळंच त्यात आलं. मग पुढे लेखन कसं हवं, कसं नको, प्रतिक्रिया कशा द्याव्या, कशा नसाव्या हेदेखील. या निमित्ताने पटणाऱ्या, न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली. या सगळ्या उचापतीचा सारांश म्हणून हे जिलबीचं ताट.. हे ताट भरायला हातभार लावणाऱ्या (आणि लावणार असलेल्याही) इतर बल्लवांचेही आभार.

चाळीची चिंता

लेखक भरत कुलकर्णी यांनी सोमवार, 17/12/2012 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
अमुकराव: रामराम हो तमुकराव रामराम. तमुकराव: हं. रामराम. अमुकराव: काय हो, काय लई चिंतेत हाय काय? रामरामबी करूना वाटं व्हय? तमुकराव: काय नाय हो. आपलं नेहमीचंच चाललंय. अमुकराव: काही म्हणा तुमी तमुकराव, तुमचा चेहेराच सांगू र्‍हायलाय की कायतरी घडलंय म्हनून. कायतरी हाय तुमच्या मनात. काय आसंल तर सांगून टाका. मन मोकळं करा बघा. तमुकराव: काय सांगायचं तुमाला अमुकराव. माझं दुख तुमाला सांगून कमी व्हनार हाय काय? अमुकराव: आसं कसं? आवं जरी तुमी मला सांगीतलं तर म्या काय तुमचं दुख वाटून घेनार नाय पन त्या दुखातून बाहेर पडायचा कायतरी उपायतरी सापडल का नाय? सांगा सांगा.

बढतीमधले आरक्षण: राजकारण .. देशहित वगैरे

लेखक शैलेंद्रसिंह यांनी सोमवार, 17/12/2012 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी नोकऱ्यांमधील बढतीमधे आरक्षण लागू व्हावे ह्यासाठी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव संसदेत येणार आहे. शिवसेना आणि समाजवादी पक्ष ह्यांचा अपवाद वगळता प्रत्येक पक्षाने ह्याला पाठींबा जाहीर केलाय. शिवसेनेचा जातीय आरक्षणालाच विरोध असल्याने त्यांचा विरोध समजण्यासारखा आहे, पण सपाचा विरोध ह्याकरता असावा की ओबीसीं आरक्षणाचा त्यात समावेश नाही. हे आरक्षण फ़क्त SC/ST गटालाच आहे. ह्या विधेयकाने मायावतींचा सपोर्ट युपीएला पुढील दिड वर्ष मिळत राहिल आणि सरकार तरेल असं एक राजकारण त्यामागे असावं कारण मायावतीं ह्याचा प्रचार आधीपासुन करत आहेत. मायावतींचा राजकिय बेसही ह्यामुळे अधिक मजबुत होईल.