Skip to main content

ड्रॅगनच्या देशात ०७ - शियान... मातीचे सैन्य ("Terracotta Army" or "Terracotta Warriors and Horses")

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 19/12/2012 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

पाकी मंत्री येऊन आपल्याला लाथांचा गोड प्रसाद देऊन गेला त्यावरील संदर्भात

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 19/12/2012 23:30 या दिवशी प्रकाशित केले.

गर्दभ लीला!

एक जंगल होते. त्यातील एका भागात गाढवाचं राज्य होते. इतर अन्य भागात राहात. गर्दभांच्या राज्याची आपापसातील गोष्टी सोडवतानाची रीत नेहमीच खिंकाळण्याची व हमरीतुमरीवर येण्याची असे. एकदा अन्य रानातून गर्दभाच्या राज्याच्या महत्वाच्या व्यक्तीस पाहुणचारला बोलावले गेले. त्या गर्दभांनी प्रवेश करताच आपली गाऱ्हाणी गाऊन इतरांना उपदेश केले की चर्चेचा घोळ न घालता, आपापसातील समस्या गायन-नर्तनाच्या, क्रीडांगणातून कशा सुटतात असे आळवून सांगितले. ते ऐकून इतरांनी करतल रव करून 'अहो रूपम् - अहो ध्वनिम्, वाहवा म्हणुन प्रशंसोद्गार काढले.

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरण आणि स्त्री सुरक्षितता उपाय

लेखक sanjivanik१ यांनी बुधवार, 19/12/2012 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील ...........(शिव्या समजून घ्याव्यात)ना फाशी पण कमीच शिक्षा आहे. एखाद्या मुस्लिम देशा मधील सर्वात भयंकर शिक्षा द्यायला हवी. सरकारने तर लाज सोडलीच आहे . फक्त भाषणा मधून दुख व्यक्त करण्या पेक्षा कृती करावी . अर्थात ती कृती करायला आणखी किती वर्ष घेतील देवास ठाऊक. तो पर्यंत त्या मुलीला आणि कुटुंबियांना किती त्रास होईल त्याची कल्पना न केलेली बरी. मुंबईत बायका इतक्या तरी असुरक्षित नाही हे मात्र खर पण एकदम सुरक्षित आहेत अस पण नाही. तर समस्त स्त्रीवर्गाला विनंती कि ह्या परिस्थितीला तोंड द्यायला हत्यार पर्स मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे.

प्रेमाची मंद मधुर आच

लेखक रविंद्र रुपन् यांनी बुधवार, 19/12/2012 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाचा उन्माद नाही, नशा नाही. कसलेही अलंकरण नाही- शब्दात,स्वरात, चित्रीकरणात. कोठेही कसला देखावा नाही. काळजाला डंख करणारे दुःख नाही की तारुण्याची खूण पटविणारा उत्साह व जल्लोषही नाही. नायक, नायिकाही तसे पाहिले तर सिनेमातल्या हिरो-हिरोईन सारखे वाटत नाहीत. आपल्यातलेच एक असावेत, थोडे जास्त लोभस, पण आपल्यासारखेच. चालण्या-बोलण्यात, भावना व्यक्त करण्यात.एवढेच आहे की त्यांना जीवनात प्रेम लाभले आहे, म्हणून ते सुंदर दिसताहेत. ही त्यांच्या प्रेमाची सुरुवात आहे. मंद- मधुर हलकी हलकी आच त्यांच्या शरीर-मनाला उजाळा देते आहे.भडकणारे 'शोले'नाहीत हे.

कविता

लेखक सु.द.मोरे यांनी बुधवार, 19/12/2012 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी केलेली प्रत्येक कविता तुला ऐकवावीशी वाटते..! पण खर सांगु, तु मनापासून ऐकतेस ना म्हणून तर कविता करावीशी वाटते..!!

टोमॅटो साल्सा/ चटणी

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 19/12/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
tomato salsa सामग्री: १ किलो टोमॅटो ५ लसुन पाकळ्या, बारीक चिरलेल्या १ टेबलस्पून टोमॅटो केचप १ टीस्पून काश्मिरी मिरची पाउडर १ लवंग १ टीस्पून ड्राईड हर्ब्स १ टेबलस्पून साखर मीठ आणि मिरपूड चवीनुसार कृती: - टोमॅटो उकडून/ ब्लांच करून, त्याची साले काढून ते मिक्सर मध्ये वाटून घ्या. - एका जाड बुडाच्या भांड्यात सर्व सामग्री आणि टोमॅटो चा गर एकत्र करून थोडं उकळा, हे मिश्रण उकळून जर दाट झालं कि गार करून एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवा.

मनातलं जनांसाठी

लेखक समयांत यांनी बुधवार, 19/12/2012 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
एच आर वाले म्हणवणारे सध्या कॉल करुन उमेदवार्‍यांना आशा लावत आपली मक्तेदारी गाजवत आहेत. खरेतर त्यांना सद्य परिस्थिती सांगता का येत नाही, प्लेसमेंटची साठेबाजारी करत मंदीची पळमात्र शंका येऊ न देणारे हे भविष्यातले गुन्हेगार आहेत, पण काय त्यांची आत्ताची रोजीरोटी त्या साठेबाजारीतूनच चालत असते. आज गोजिरवाण्या शहरात राहणारे आणि आपली ख्यालीखुशाली सांभाळणारे दारांत उभ्या माणसांना हलके हसून बोळवण करायलाही विसरले आहेत, इथेच ती मंदी वर डोके काढत आहे. मला जाचणारे बरेच काही आहे, पण इथे लिहावे कि नाही याचा विचार करतो आहे. असो, या संस्थळाविषयी आत्मयिता असल्याने मी नक्कीच लिहिणार..

मुसळधार पाऊस आणि मि एक एकटा

लेखक श्रीमत यांनी बुधवार, 19/12/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुसळधार पाऊस आणि मि एक एकटा शांत बससेला... मुसळधार पाऊस आणि सोबतीला त्या दळकाळी फोडणाऱ्या विजांचा कडकडाट पावसाच्या सरी कधी या कुशीवर कधी त्या आणि मि एकटा शांत बससेला......... वाटले मलाही कि जावे त्या पावसात स्वचंद भिजावे, नाचावे, मनमुक्त खेळावे, गाणे गावे....... पण मी एकटाच त्या भयानक पावसात............... सखे येशीलका तू माझ्य्ब्रोबर त्या पावसात .. नाही म्हणू नकोस ... पाऊस थांबेल , विजा नाहीशा होतील , माझ्या आश्या-आकांश्या नष्ट होतील नाही म्हणू नकोस ............ *कृपया संभारून घ्या मराठी प्रथमच लिहितो आहे*

टाकाऊतून टिकाऊ

लेखक त्रिवेणी यांनी बुधवार, 19/12/2012 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या घराशेजारच्या काकू पिको फॉल करायच्या, ते करत असताना साडीला फॉल करताना साडी सरळ रेषेत थोडी कापून घ्यावी लागते त्या कापलेल्या चिंद्यांचे हे बस्कर मला आत्याने करायला शिकविले होते.स्वेटर विणायच्या सुयानी ये विणले आहे.

भूक

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 19/12/2012 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
आला तेव्हा होता नंगा, त्याले कपडे घातले सोन कांतीचिये रंगा, त्याचे रुपडे झाकले कपड्यांच्या अंगा अंगा, सदा लागलेली भूक जिव्हा खादाडीचा दंगा, डोया हवे दृष्टीसूख कान मागती सुराले, त्वचा आसुसली स्पर्शा नाक सुवासा हुंगते, सारी शोधताती हर्षा पंचेद्रियांचे चोचले, पुरविता पुरे नाही किती ह्यांना भरविले, देह वखाखला राही कपड्यांच्या अंतर्भागा, वसे सोनेरी झळाळी त्याची भूक भागेना गा, मारी आक्रोशाने हाळी सारे देहाचे चोचले, पुरे होती त्याचे लाड तेज भुकेने गांजले, पाच गजांचिये आड पंचेंद्रिये अंग अंग खाउ खाउनी खंगले जीर्ण होताची तुरूंग तेज मोक्षाशी धावले
काव्यरस