निवृत्त
[एकसे बढकर एक महारथी पत्रकार जमलेत, पंतप्रधानांची पत्रकार परिषद कव्हर करायला प्रत्येकाचा उत्साह ओसांडुन वाहतोय. अचानक पत्रकार परिषद भरविण्याचं कारण कोणालाच कळेना, त्यामुळे उत्कंठा शिगेला. तेव्हढ्यात पंतप्रधानांचे आगमन. सगळीकडे शांतता. पंतप्रधान माइकपुढे येतात]
पंप्र: मित्रहो... प्रस्तावना करत नाही. मी निवृत्त होणार आहे.
[सगळे अवाक, हे काय भलतंच]
पंप्र: तुमच्या सगळ्यांच्या मनात काय प्रश्न आहे हे मी जाणतो. मी निवृत्त का व्हायचं ठरवलं हेच कळत नाहीये ना?
[पत्रकारांची होकारात्मक शांतता]
पंप्र: माझ वय ८४ वर्ष. गेल्या ६० वर्षापासुन राजकारणात सक्रिय आहे.
प्रयोग..
फार पुर्वी लिहीलेली एक कथा सापडली, ती जशीच्या तशी इथे टाकत आहे ( सुचत असून बदल करत नाही ) ;) फॉर अ चेंज यावर काकु करूया :)
*********
शेवटचा पेशंट आटोपल्यावर मी आपली आवरा आवर सुरू केली. दिवसभराच्या माझ्या कामामुळे मला थकवा जाणवायला लागला होता. रोजचे तेच पेशंट त्याच त्या प्रकारची प्रश्नोत्तरे.., आता कंटाळा यायला लागला होता या सर्वाचाच. आयुष्यात चॅलेंजींग असं काहीतरी घडावं असं प्रत्येकालाच मनाच्या कोप-यात कुठेतरी वाटत असतं, मी ही त्याला अपवाद नव्हतो. पण रोजची ती रटाळ बडबड त्याच ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे.......... वैताग होता सगळा.
ड्रॅगनच्या देशात ०८ - जुने लिजीआंग (पृथ्वीवरचे नंदनवन) : दायान
ड्रॅगनच्या देशात ०८ - जुने लिजीआंग...
गाजर-मिरचीचे चटकदार लोणचे
असे का?
"तुला हा रोजचा अनुभव असेल"?
???
"तरी सुद्धा तपासुन पहा".
????
तुला एक मुलगा मला पण एकुलता.
?????
"अगदी स्वतः च्या घरातुन सुरु कर".
?????
"मी म्हणतो ते पटते का बघ".
काय पटायला पाहीजे? काय तपासु?
"मी अगदी जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली. कधी मारले नाही. ओरडले नाही. अगदी जास्त हट्ट केल्यावर थोडेसे डोळे वटारणे ह्या वरच थांबलो. एवरीथींग बाय बुक. तरी सुद्धा असे का हे कळत नाही.
नेमके काय कळत नाही?
"नाही म्हणजे नाते संबंधात मुलाचा ओढा आईकडे जास्त असतो आणि मुलीचा बापाकडे. असे का? तुझा काय अनुभव?
दहा च्या पट्टीवर तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या संबंधाला मार्क किती? आणि आईला किती"?
मला ६/१०.
गोष्ट एका माणसाची - १
|| ॐ ||
पावसाची रिपरिप अजुनही थोडी चालु होती . गेला आठवडाभर पाऊस काही ऐकायच नाव घेत नव्हता . सारे ओढे नाले अगदी भरभरुन नर्मदामाईला मिठी मारत होते . नर्मदेच्या प्रचंड प्रवाहाचा खळखळाट इथे ही ऐकु येत होता . इतकया दुरवरही ...अगदी स्पष्ट ...त्यात आजच्या ह्या जराश्या उघडीपी मुळे जणु रातकिड्याना जागे केले होते अन तेही सुरात सुर मिळवायचा प्रयत्न करत होते त्याला शेजारच्या पिंपळपानांच्या सळसळीचीही सोबत होती . सार्यानाच जणु लय सापडली होती . हवे मध्ये प्रचंड गारवा भरुन राहिला होता. नुसताच गारवा नव्हे तर तिथेही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली होती . मातीचा, झाडांचा, पानांचा, गवतांचा,....
दीप
तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे
गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले
शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने
अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...
काव्यरस
कविता
तु मला नेहमी विचारायचीस ना
की कश्या रे जमतात तुला कविता ..?
मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो
मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ...
सु.द.मोरे
मिसळपाव