Skip to main content

ड्रॅगनच्या देशात १४ - ली आजीची भेट, मास्टर यांग ची शाळा आणि चेंगदूचे जायंट पांडा केंद्र

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 09/01/2013 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५...

विचारमैथुन १ - डॉक्टर सान्यांची न्यूज

लेखक खान यांनी मंगळवार, 08/01/2013 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
या धाग्याचं शीर्षक औपरोधिक असलं तरी धागा पूर्ण सिरीयस आहे. बर्‍याच वेळा एखाद्या प्रश्नाबद्दल आपली नक्की काय भूमिका आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. अशावेळी एक हायपोथेटिकल सीनारिओ बनवून त्या प्रसंगात आपण काय करू, असा प्रश्न स्वतःलाच विचारला तर कदाचित आपल्या मनातला गोंधळ निस्तरायला मदत होऊ शकते/शकेल. या धाग्यात असाच एक सिनारिओ कल्पला आहे. समलिंगी संबध पूर्ण वैध की अवैध, याबद्दल आपल्यापैकी काहींच्या मनात संशय येत असतो. एका बाजूला समलिंगी संबंधांचे पूर्ण समर्थन करणारे लोक, तर दुसर्‍या बाजूला स. सं.

हरवला आहे...

लेखक रविंद्र रुपन् यांनी मंगळवार, 08/01/2013 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
शासनसंस्था, विद्यापीठे,कुटुंबसंस्था आणि ह्या सगळ्यातून उद्भवलेली एक राक्षसी महत्त्वाकांक्षा ह्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या प्रत्येकात दडलेल्या रॅंछोला पार पाताळात दडपून टाकले आहे. त्याला आपण कधी शोधणार?
साऱ्या आयुष्याचा घोळ झाला आहे. कशाचाच अर्थ लागत नाही. चांगली कचकचून भूक लागलेली असावी. समोर वाफाळलेल्या नूडल्सची प्लेट यावी अन् कुणी आपल्याला सांगावे की तुला ते खाता येतील, पण एका शर्तीवर. ह्यातील एकेक नूडल वेगळी करून, काट्याभोवती लपेटून किंवा काड्यांनी वेचून खायची. नूडलचे एक टोक आपल्यासमोर, दुसरे कुठे आहे कळतच नाही. वेळ वाया जातो आहे, काय करावे सुचतच नाही.

"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी"

लेखक शिवप्रसाद यांनी मंगळवार, 08/01/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" (माझी पहिलीच कविता ) ऊठ मुला झडकरी आळस टाक झटकून | परिक्षा येता जवळी वेळ जाईल निघुन || करायचे आहे आईवडिलांचे स्वप्न साकार | तुझ्या शिवाय त्यांना नाही कोणाचा आधार | अभ्यास करि चांगला लाउनी मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || आईवडीलांनी तुझ्यासाठी कष्ट केले अपार | प्रसंगी फक्त तुझ्याचसाठी सोसली उपासमार | शिक्षणाकडे लक्ष दे देऊनी ध्यान | परीक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || ठेच लागता तुझ, जीव त्यांचा तळमळे | आता तरी सोडुन दे तुझे ऊनाड चाळे | तुला करायला हवे अभ्यासात एकाग्र मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || जिवनात असंख्य परिक्षा द्याव्या लागतात

मी बिभीषण एकटा

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 08/01/2013 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती यांना न कसली नीती, यांना न कसली भिती तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
काव्यरस

गोवा - ईतर छायाचित्रे

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 08/01/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा भेटि दरम्यान काढलेली काहि इतर छायाचित्रे १. छोटा वाघातोर / ओझरान समुद्रकिनार्‍यावरील एक संध्याकाळ - Small Vagator Beach Distant View २.

मागे वळून पाहताना.....

लेखक मन यांनी मंगळवार, 08/01/2013 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
संपर्काची फारशी साधने उपलब्ध नसतानाच्या काळातील एका घटनेचे धावते वर्णन. hindsight. ते बघा, ते फार दिवसाचे चालताहेत. शेवटी एकदाचे खूप खूप दिवस चालत, तंगडतोड करत ते तिघे चौघे वरती, एका उंच डोंगरावर नुकतेच पोचलेत. डोंगर त्या अतिअघनदाट जंगलानं पूर्णपणे वेढलेला आहे. जंगलात वाट चुकून ह्या टोळक्याला नक्की किती दिवस झाले तेही आठवत नाहिये. जंगल भलतच दाट आहे. मनुष्यासाठी आजवर अस्पर्शित राहिलेलं आहे. दाटी इतकी, की भरदिवसा सुद्धा जमिनीवर सूर्यप्रकाश पडूच नये. त्या वनात एक अतिप्रचंड, आभाळाएवढं पाणी सतत वाहवत असणारी नदी आहे.

राधा

लेखक रेशा यांनी मंगळवार, 08/01/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मोरपीस जणू फिरते तनी, वेणू नाद हा पडता कानी, काहूर मनात, अन हुरहूर आगळी मोहरते आठवता, छबी सावळी थरथरते अधर, लाली गाली किंचित लाज, अधीर नयनी ललना साजिरी, नटली सजली शाम सख्यावर, आणिक भाळली बावरे मन, अन आशा कोवळी मिलनास आसुसली, राधा भोळी पाहून अधीर राधा, बोले सखी "होईल बोभाटा ग गोकुळी!", नयनी पाणी, मिटे पापणी अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!! ... रेघोटी