Skip to main content

पद्म पुरस्कार - 'टू लिट्ल अँड टू लेट'?

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 29/01/2013 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतातील एक दिग्गज गायिका एस. जानकी यांनी या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार नाकारल्याची बातमी अलीकडेच वाचली. आपल्याला दिलेला पुरस्कार आपल्या लौकिकाला साजेसा नाही आणि तो देण्यात खूप उशीर झालेला आहे ('टू लिट्ल अँड टू लेट') असे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले आहे. हिंदुस्थानी संगीतशैलीतल्या कलाकारांपैकी उ. विलायत खाँ यांनी अशाच भावना व्यक्त करून पद्म पुरस्कार नाकारला होता, तर पं. रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यावर पं. जसराज यांनी उघडपणे नाराजी दर्शवत पं. रविशंकर यांच्यावर कंपूबाजी केल्याचा/ दबावतंत्र वापरण्याचा ('लॉबिंग' केल्याचा) आरोप केला होता.

नाणेघाट

लेखक स्पा यांनी मंगळवार, 29/01/2013 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाणेघाट : मध्यम श्रेणीचा ट्रेक उंची : अंदाजे २७०० फूट जिल्हा: पुणे कसे पोहोचाल : १. कल्याण मार्गे : मुंबईकर कल्याण ला येऊन तिथून कल्याण - मुरबाड - टोकावडे - वैशाखरे असे करत नाणेघाटाच्या पायथ्याशी पोचू शकतात. इथून नाणेघाटात जायला साधारण २ तास लागतात २. पुण्या मार्गे : पुण्याहून जुन्नर - घाटघर करत थेट नाणेघाटात येता येते . भल्या पहाटे थंडीत निघून बरोबर ७ च्या आसपास आम्ही मिपाकर (मी, शैलेंद्र ,सौरभ उप्स ) नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नामनिर्देशक बोर्डापाशी पोचलो. गाडी खालीच लावली (होय, यावेळी बायका नव्हत्या सोबत ) आणि वर निघालो. थंडीसोबतच जंगलात तुफान वारं सुटलेलं होतं.

ती खोली

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 29/01/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली बंदच असते आजकाल खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------- त्या खोलीत एक टोपली आहे जुन्या खेळण्यांनी भरलेली डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत मी जिंकून आणलेल्या फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता आरपार रंगीत जग दिसायचे तसे दिसत नाही आताशा ------- बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे खर तर एक पंख तुटलाय त्याचा पण जरा जोरात धक्का दिला तर खुरडत खुरडत चालते कधी कधी ------- एक माकडही आहे चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे आताही चावी दिल्यावर हातातल्या इटुकल्या काड्या वरखाली करते पण आता काड्यांखालचा तो ढोल तेवढ
काव्यरस

देहाला चोळून घेता...(एक लांबड)

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 29/01/2013 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
देहाला चोळून घेता मालिशवाला वदला ढेरी वाढली मालक! लाईफस्टाईल बदला देहाला चोळून घेता नेते सुखाने म्हणले सत्तेच्या कृपेने मी बख्खळ पैसे आणले देहाला चोळून घेता रोमिओही तणतणले बायका वाघिणी झाल्या आम्हा चप्पलने हाणले देहाला चोळून घेता ते विकलतेने कण्हले लवकर ये मृत्यू मन रोगाला शीणले...
काव्यरस

अजिंठा: भाग ४ (अंतिम)

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 28/01/2013 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
अजिंठा: भाग १ अजिंठा: भाग २ अजिंठा: भाग ३ खरेतर अजिंठ्याचा प्रत्येक विहार, प्रत्येक चैत्य बारकाईने पाहायला एकेक दिवसपण कमीच आहे पण कसेतरी घाईगर्दीतच पण तरीही निवांतपणेच हे बघत आम्ही पुढे सरकत आम्ही बाहेर आलो व पुढ्च्या विहारांकडे आणि चैत्यांकडे वळलो. आता यापुढील विहारात चित्रे कमी पण शिल्पे जास्त आहेत त्याविषयी पाहू आता अजिंठा लेखमालिकेच्या पुढच्या व अंतिम भागात.

किल्ले शिवनेरीचे दु:ख ...

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 28/01/2013 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
-- - -- -- पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिवनेरी किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. अगदी अलिकडेपर्यंत सारे ठीक होते. श

डोळे

लेखक मनिष यांनी सोमवार, 28/01/2013 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तळ गाठलेल्या, जुन्या, जाणत्या विहिरीसारखे खोल, खोल डोळे. त्यातलंही पाणी आता आटलंय... आणि खोलवर आत, आता फक्त दु:ख साठलंय! ~ मनिष (28/1/2013)

अबु धाबी किंवा दुबईचे आहेत का कुणी?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 28/01/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी रुवैस, अबु धाबी इथे एस्.के. ईंजि. मध्ये कामाला आहे. महिन्यातून एक दिवस (शुक्रवार) मला अबु धाबी किंवा दुबईला जायला मिळते. "मिसळ्पावचे" कुणी सदस्य ह्या शहरांत असतील, तर त्यांना भेटायची इच्छा आहे. माझा येथील मोबाईल नं. देत आहे. ००९७१५६३५९३५८६

मूर्ग हैदराबादी

लेखक जयवी यांनी सोमवार, 28/01/2013 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
“आई, मस्त चिकन बनवशील का आज ?” पिल्लाचं आर्जव…… तेही त्याच्या वाढदिवसाला……!! मग ते न बनवून कसं चालणार… !!