Skip to main content

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 31/01/2013 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता.

भाषा आणि बोली

लेखक सुनील यांनी गुरुवार, 31/01/2013 04:19 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यावर सुरू असलेल्या चर्चेत भाषा आणि बोली यांवर थोडी चर्चा घडल्याचे दिसते. त्यात एखादी बोली ही अमूक एका भाषेची पोटभाषा आहे किंवा स्वतंत्र आहे, तो विषय भाषाशात्रींवर सोडावा, असे प्रतिपादन केलेले दिसते. त्यावर अजून काही प्रतिसाद देणे म्हणजे मूळ चर्चेत खूपच अवांतर झाले असते म्हणून हा वेगळा धागा सुरू करीत आहे. http://www.misalpav.com/node/23765
एक भाषा दुसरीपासून संपूर्ण वेगळी आहे का, कुठल्या जातकुळीत येते हे कळणे कर्मकठीण आहे.

माझे आजोबा - एक आठवण

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 31/01/2013 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
१ जानेवारीला दुपारी मामांचा फोन आला. ते म्हणाले की आजोबा (आईचे वडील) तुझी आठवण काढत होते, भेटून जा ! आजोबा गेले काही महिने वृद्धापकाळानुसार तब्येतीच्या तक्रारीने सारखे, दवाखाना व घर अश्या स्वरूपात होते. पण मला आजोबांनी 'का आणि कशासाठी' बोलावले याची कल्पना नक्कीच होती. आजोबांना भेटायला जायला ४ जानेवारीची तारीख निघाली. ६ तारखेला लहान बहिणीच्या लग्नाची गडबड असल्यामुळे उशीर झाला होता. आजोबांना भेटायला आयसीयूत गेलो तर काळजात धक्कं झालं.

मात

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 30/01/2013 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
गुलजार यांच्या "खुदा" या रचनेचा स्वैर भावानुवाद करण्याचा माझा प्रयत्न गगनपटावर डाव मांडला, ओढलेस खेळात मला घुमता पट अन् अगम्य खेळी, मुळीच रस ना त्यात मला! सूर्य मांडला घरात काळ्या, तुला वाटले विझेन मी, दीप उजळला मी, जो दावी वाटा अंधारात मला तुझा वादळी सागर माझ्या अस्तित्वाला गिळताना एक चिमुकली पुण्याईची नाव तारते त्यात मला! काळाची सरकवुन सोंगटी घेसी का अंदाज उगा? तोडुन काळाच्या बेड्यांना मौज मिळे जगण्यात मला चमत्कार दाखवून माझे आत्मतेज मिटवू बघसी, तुझा चंद्र जिंकला पहा मी, कसली देशी मात मला? शह मृत्यूचा दिला, वाटले तुला, "चला, हरला आता!" देह सोडला मी, वाचविला आत्मा, भय ना घात मला! घुमव

वेदीवर या राही मी स्थिर

लेखक हिटलर यांनी बुधवार, 30/01/2013 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्याही वैयक्तिक भावना दुखावण्याचा हेतू नाहीय पण नथुराम गोडसेंनी गांधीहत्या का केली याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत.

ंमौन...

लेखक उर्जिता यांनी बुधवार, 30/01/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
मौनच एक बर असत.., वरुन का होइना ते शान्त आसत! आत मध्ये असु देत कित्येक वादळ रोरावणरि, घोन्गावणरि , पण त्यान्च्या नादच सुद्धा वरवरति गाणच होत..! मौन बोलतच नाहि ,त्याला काय वाटत कदाचित मुस्काटदाबि होइल अस वाटुन मौनतच राहात..! त्यालाहि थोपवावे लागतात विचरान्चे हिन्दोळे, कल्पनान्चे अथान्ग पल्ले , भावनान्चे किचकट गुन्ते, आणि विचारन्चे भोवरे, ते मुकाट सहन करत आणि समजुतदार मुलाप्रमाणे उगाचच आनन्दत राहत मौनच गणित म्हणा किन्वा कोडा म्हणा सुटतहि नाहि आणि उलगडणहि कथिण असत त्याच स्वतहच अस्तित्त्व मान्य करुन त्यला हळुवार कवेतच घ्याव लागत.

माझ्या गावात कधी आता -

लेखक विदेश यांनी बुधवार, 30/01/2013 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या गावात कधी आता माझा मामा रहात नाही - आजोळी जाण्याचा त्यामुळे प्रसंग कधी येतच नाही...... धूर सोडणारी झुकझुक गाडी साधे झाडही दिसत नाही शहरात राहिला मामा आता त्याला नोकरी मिळत नाही ... वेळ नसल्यामुळे तो मला कधी बोलवत नाही मामी सुगरण आहे का त्यामुळेच माहित नाही... वर्षात कधीतरी एकदाच शिकरण-पोळी खाते म्हणे - एवढे मात्र ऐकून आहे बाकीच काही ठाऊक नाही... मामाची रंगीत गाडी नाही मामाची उंचउंच माडी नाही लपली काळाच्या पडद्याआड आजी बरळते काहीबाही.... माझ्या गावात कधी आता माझा मामा रहातच नाही !
काव्यरस

राष्ट्रपिता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 30/01/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली !

नख

लेखक पेशवा यांनी बुधवार, 30/01/2013 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा शोधावी का तिला ? किती सहज उकरायची गाडलेले कबुलीजबाब फुल्या शिवलेले डोळे फुल्या शिवलेले ओठ कधी हसत कधी रडत विचारायची नुसत्या खुणांनी 'कशी दिसते ह्या नवीन टाक्यांत?' लांबसडक बोटे, न्याहाळायची ती कधी शापा सारखी कधी श्वापदा सारखी बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर आणि कधी हिंस्रतेने करायची शिकार धारदार, रासवटतेने झालेला छिन्नविछिन्न देह शिवत बसायची तासंतास तिने पाळलेली बेवारशी विरह-गाणी पाहायचो घुटमळताना तिच्या आसपास... पुन्हा शोधावी का तिला ? मला भेटून ती निराश झाली तर? मन धजत नाही, हे रिकामेपण झाकता येत नाही तिने दिलेल्या जखमा पुन्हा पुन्हा गोंजारताना दीनवाणा झालेला मी कुठल
काव्यरस

श्रद्धांजली...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 30/01/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
. नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्‍यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्‍यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती... गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो... श्रद्धांजली!