गोव्यावर सुरू असलेल्या चर्चेत भाषा आणि बोली यांवर थोडी चर्चा घडल्याचे दिसते. त्यात एखादी बोली ही अमूक एका भाषेची पोटभाषा आहे किंवा स्वतंत्र आहे, तो विषय भाषाशात्रींवर सोडावा, असे प्रतिपादन केलेले दिसते. त्यावर अजून काही प्रतिसाद देणे म्हणजे मूळ चर्चेत खूपच अवांतर झाले असते म्हणून हा वेगळा धागा सुरू करीत आहे.
http://www.misalpav.com/node/23765
एक भाषा दुसरीपासून संपूर्ण वेगळी आहे का, कुठल्या जातकुळीत येते हे कळणे कर्मकठीण आहे. ते आपण भाषाशास्त्रींवर सोडूयात.जसे विज्ञानाच्या नियमांची उकल वैज्ञानिकांवर वा गणितीय प्रमेयांची उकल गणितज्ञांवर सोडा असे म्हणता येते, तसे भाषेबाबत होत नाही. आणि तसे होऊ शकत नाही कारण भाषाशास्त्र हे समाजशास्त्राचाच एक भाग आहे. कसे ते पाहू. भारतीय भाषांबाबतीत शात्रीय पद्धतीचे सर्वेक्षण सर्वप्रथम ब्रिटिश अमदानीत ग्रियर्सन यांच्या देखरेखीखाली झाले. त्याचे त्यांनी ११ खंड प्रकाशित केले. पैकी सातव्या खंडात मराठीविषयी विवेचन केले आहे. मराठीविषयी ग्रियर्सन अनेक निरीक्षणे नोंदवितात. त्यापैकी ३ आपण पाहू. १) कोंकणी ही मराठीचीच एक बोली आहे. २) खानदेशी (ग्रियर्सन ज्याला खानदेशी म्हणतात ती अहिराणी असावी) ही गुजरातीची बोली आहे. ३. कोंकणी आणि हळबी (आजच्या छतीसगडच्या बस्तर विभागात बोलली जाणारी) वगळता, मराठीच्या इतर सर्व बोलींत विलक्षण सारखेपणा आहे. आता पहिल्या दोन निरीक्षणाबाबत आजची काय परिस्थिती आहे? राजकीय - आज कोंकणी ही स्वतंत्र भाषा म्हणून साहित्य अकाडमीनेच नव्हे तर, भारतीय घटनेनेदेखिल मान्य केलेले आहे. तर, खानदेशी अशी कुठलीच भाषा घटनेने मान्य केलेली नाही. इतकेच नव्हे तर, भाषावार प्रांतरचनेच्या वेळी, खानदेशाचा समावेश महाराष्ट्रात केला गेला. सामाजिक - कोंकणी भाषी समाज विभागलेला आहे. काही जण कोंकणीचे भाषा म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानतात. तर काही तिला मराठीचीच बोली मानतात. मात्र दोघेही घरी-दारी एकच भाषा (कोंकणी) बोलतात. याउलट, खानदेशी मंडळी घरी-दारी खानदेशी (अहिराणी) बोलत असली तरी आपण व्यापक मराठी समाजाचाच एक हिस्सा आहे असे मानतात. गुजराती समाजाचा नव्हे. म्ह॑णजे पहिल्या दोन्ही निरीक्षणात, आजची परिस्थिती ग्रियर्सनने म्हटल्यापेक्षा पूर्णपणे उलटी आहे. याचा अर्थ ग्रियर्सन चूक होता? नक्की सांगता येणार नाही. कदाचित भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून त्याची निरीक्षणे बरोबर असतीलही (शिवाय ग्रियर्सननंतरही गोदावरीतून बरेच पाणी वाहून गेले आहे!) परंतु शेवटी महत्त्वाचे ठरते ते ती भाषा बोलणार्या समाजाची भूमिका. जर खानदेशी समाज स्वत:ला गुजरातीचा नव्हे तर मराठी समाजाचा भाग मानत असेल तर, भाषाशात्र काय म्हणते त्याला फारसा अर्थ राहत नाही. वर म्हटल्याप्रमाणे भाषा-बोली ठरवण्यामागे निव्वळ भाषाशात्रापेक्षाही राजकीय आणि सामाजिक हे दोन्ही पैलू फार महत्वाचे ठरतात. पोर्तुगालचे जर स्वतंत्र राष्ट्र नसते तर, आज पोर्तुगिझ ही स्पॅनिशचीच एक बोली ठरवली गेली असती, असे अनेक युरोपीय भाषाशात्रींचे मत आहे. अगदी तीच गत फ्रान्स आणि इटली यांच्या दरम्यानच्या भागात बोलल्या जाणार्या अनेक बोलींची. नेपोलियन ज्या कॉर्सिकाचा ते कॉर्सिका बेट आता फ्रान्सच्या ताब्यात आहे. साहजिकच कॉर्सिकन ही फ्रेन्चची बोली समजली जाते. पण अनेक भाषाशास्त्रींच्या मते ती इटालियनला जास्त जवळ आहे. तेव्हा भाषा-बोली ठरवण्यासाठी निव्वळ भाषशास्त्रीय निष्कर्ष लावणे योग्य आहे काय?
वाचने
6237
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजकीय प्रभाव
छिनून
In reply to राजकीय प्रभाव by राही
त्रैभाषिक सोलापूर
In reply to राजकीय प्रभाव by राही
चांदीचा धूर
In reply to त्रैभाषिक सोलापूर by अभ्या..
पद्मशाली म्हणजे साळीच
In reply to चांदीचा धूर by दादा कोंडके
अच्छा...
In reply to पद्मशाली म्हणजे साळीच by अभ्या..
त्यामुळे मराठीभाषिक व
In reply to त्रैभाषिक सोलापूर by अभ्या..
उत्तम चर्चाविषय
लेख आवडला. संतुलित
लेख आवडला. संतुलित
In reply to लेख आवडला. संतुलित by बॅटमॅन
मटा च्या ब्लॉगवर एक लेख आहे
मराठी कोंकणी
रोचक माहिती
ग्रिअर्सन चूक होता असे नव्हे
In reply to रोचक माहिती by विकास
इथे प्रत्येकजण
राहता राहिली कोंकणीची गोष्ट.
संबंधित शब्द-व्यवस्थांबाबत राजकीय-समाजशास्त्रीय प्रश्नच
रोचक!
ब-याच दिवसांनी एका वेगळ्या