Skip to main content

युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 21/02/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१) " प्रशासकांच्या वतीने मी आपले स्वागत करतो ! आपण येथे सुट्टीवर आलेला नसून कामासाठी आपल्याला येथे आणण्यात आलेले आहे हे कृपया ध्यानात ठेवा. ज्याप्रमाण आमचे सैनिक आघाडीवर तिसर्‍या राईशच्या विजयासाठी आपले प्राण अर्पण करत आहेत त्या प्रमाण नवीन युरोपसाठी तुम्हाला येथे काम करायचे आहे. ते कसे करायचे हे तुम्हावर अवलंबून आहे. आम्ही तुमची काळजी घेऊ व केलेल्या कामाचा मोबदलाही देऊ.

शनिवारवाडा (भाग १) : इतिहास

लेखक सव्यसाची यांनी गुरुवार, 21/02/2013 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी ग.ह.खरे लिखित 'शनिवारवाडा' हे पुस्तक वाचनात आले. शनिवारवाड्याची कादंबऱ्यांमधून केलेली वर्णने त्या लेखकांनी कुठून मिळवली हा एक प्रश्न मला सतावत होता. या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातून मिळाले. ग.ह.खरे यांनी पेशवे दफ्तरातील सात रुमाल वाचून शनिवारवाड्यावरील हे पुस्तक तयार केले होते. त्यांच्यानुसार हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या पुस्तकात इतिहास आणि अवशेष वर्णन यांचा समावेश आहे.

'काव्य ' कविता स्टोअर्स Pvt . Ltd .

लेखक फिझा यांनी गुरुवार, 21/02/2013 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
'काव्य ' कविता स्टोअर्स Pvt. Ltd. * सुख दु:खाचे किरकोळ व घाऊक विक्रेते * मी : हा ....गुड मॉर्निंग मन ...कसं काय रात्री झोप लागली का गोडावून मध्ये ..... मन : हा होय मालक .....पण न्हाई इतकी ..... मी : घे च्या ....दुकानात कसं माणसानं जरा फ्रेश ऱ्हावं ...... मन: होय घेतो की .... गिऱ्हाईक : राम राम शेटजी ... मी :हा ...राम राम ..आज ...काय काम काढलंत ? गिऱ्हाईक : दु :खं द्या जरा नवीन ....... मी : ए मन्या ,,ती भारी दु :खं आन रं इकडं .... हे घ्या ...एकदम बेश्ट माल ..... गिऱ्हाईक : आत्ता कसं .........कितीला हे सगळं .... मी :अडीचशे फक्त !! गिऱ्हाईक : आवं काय सांगता राव .....

माफीनामा

लेखक विकास यांनी गुरुवार, 21/02/2013 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
रंगीत/भगवा वगैरे दहशतवाद हा विषय आता चावून चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या चर्चाप्रस्तावाचा त्याच विषयावर तीच चर्चा करण्याचा उद्देश नाही... पण आज जे काही मा. गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी जे काही १८० अंशाची फिरकी दाखवली ती पाहून अचंबा वाटला...

जालियनवाला बाग हत्याकांड आणि भारत- ब्रिटन संबंध

लेखक बाळकराम यांनी गुरुवार, 21/02/2013 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन सध्या भारताच्या दौर्‍यावर आहेत. मे २०१० मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच केलेल्या भारत दौर्‍यानंतर अवघ्या २-२.५ वर्षातला हा ब्रिटिश पंतप्रधानांचा दुसरा दौरा. १४० व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींचे ब्रिटनच्या आजवरच्या इतिहासातले हे सर्वात मोठे व्यापारी शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहे. अर्थात, मागच्या प्रमाणे ह्याही दौर्‍याचा उद्देश उगवती महासत्ता असलेल्या भारताबरोबर व्यापारी संबंध दृढ करुन काही व्यापारी करारमदार करता येतील का ते पाहाणे हाच.

मिपा का आवडते

लेखक शुचि यांनी गुरुवार, 21/02/2013 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत खूप नाही पण थोड्याफार संस्थळांचा अनुभव नक्कीच गाठीशी धरुन आहे. असे साधारण लक्षात आले की प्रत्येक संस्थळाचा एक बाज आहे, वैशिष्ट्य आहे.म्हणजे बघा काही संस्थळे बाळबोध तर काही टवाळ काही अभ्यासू तर काही शिष्ठ व्यक्तीमत्वाची आहेत्आ बाज मुख्यत्वेकरुन त्यात्या संस्थळावरील सदस्यांच्या लिखाणातून, लेख , प्रतिक्रिया वगैरे बौद्धीक ठशातून आलेला आहे. "अ कंपनी इझ अ‍ॅज गुड अ‍ॅज पीपल इन अ इट" च्या चालीवर संस्थळांना देखील सदस्यांनी दिलेला आकार, रुप मिळालेले दिसते. मिपावर आले तेव्हा मिपा जितकं आवडलं त्याच्या शतपटींनी अधिक आता आवडत आहे.

कुंडली विवेचन आणि करिअर!!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 21/02/2013 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
(विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त ज्यांना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, त्यांचेसाठीच आहे. कृपया, येथे ज्योतिष शास्त्र खरे का खोटे ही चर्चा आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाही) (१) ज्योतिषशास्त्रात जन्मलग्न कुंडली सोबतच भावचलीत कुंडली, नवमांश कुंडली आणि राशी कुंडली यांचे महत्व काय असते? कुठली कुंडली कशासाठी बघायची असते? (२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात?

परका काळा घोडा

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 20/02/2013 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
'मला ना, का कोणास ठाउक, इथे येऊन असं एखाद्या परक्या प्रांतात आल्यासारखं वाटलं.', माझी बायको म्हणाली. त्या वेळी, आणि त्या आधी तीन तास मला तेच वाटत होतं पण नेमक्या शब्दात मांडता येत नव्हतं. दहावी झाल्यानंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत मित्रांबरोबर मुंबईला गेलो होतो तेंव्हाही हे असंच 'परक्या प्रांताचं' फीलिंग आलं होतं. पण तेंव्हा कुतुहल, उत्सुकता, या गोष्टी मोठ्या होत्या त्यामुळे ते तसं जाणवलं नाही. तिथली गर्दी परकी वाटली नाही, त्या गर्दीचा उबग आला नाही, गोंगाटाचा त्रास झाला नाही की काही नाही. या वेळी काळा घोडा कला उत्सवाला मात्र असं सगळं वाटलं.

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

लेखक पिंपातला उंदीर यांनी बुधवार, 20/02/2013 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.

याला वेळ हवी हो रातीची ...

लेखक आर्णव यांनी बुधवार, 20/02/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
बेत खमंग राया आपुला देऊ फोडणी आमच्या प्रीतीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I ह्यो नजरेचा मदन बान छेडी गुलाबी बेधुंद तान ही गोडी गुलाबी यो मस्का का न लागावा ओ यांचा चस्का कशी सांगू मी बाई कुणाला कथा तुमच्या या करामातीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I ऊब मिठीची उतरे मनात कशी रसरसली माझी काया त्या चंद्राला जाउन सांगा जरा दमान पुढ सारकाया चाहु दिशांनी गार हवेनी दिली सलामी तुमच्या ख्यातीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I