Skip to main content

याला वेळ हवी हो रातीची ...

लेखक आर्णव यांनी बुधवार, 20/02/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
बेत खमंग राया आपुला देऊ फोडणी आमच्या प्रीतीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I ह्यो नजरेचा मदन बान छेडी गुलाबी बेधुंद तान ही गोडी गुलाबी यो मस्का का न लागावा ओ यांचा चस्का कशी सांगू मी बाई कुणाला कथा तुमच्या या करामातीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I ऊब मिठीची उतरे मनात कशी रसरसली माझी काया त्या चंद्राला जाउन सांगा जरा दमान पुढ सारकाया चाहु दिशांनी गार हवेनी दिली सलामी तुमच्या ख्यातीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I
लेखनविषय:

वाचने 1312
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

एकदम टिपीकल. लगे रहो. मस्त

कविता आवडेश. ह्यावरुन भाऊसाहेबांचे लिखाण आठवले :- शायर सूर्यास म्हणतो- भास्करा येते दया मला तुझी आधीमधी. आहेस का तू पाहिली रात्र प्रणयाची कधी? सूर्य उत्तर देतो - आम्हासही ह्या शायराची कीव केऊ लागते, ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते!

In reply to by परिकथेतील राजकुमार

मित्रा, शायर सूर्यास म्हणतो- भास्करा येते दया मला तुझी आधीमधी. आहेस का तू पाहिली रात्र प्रणयाची कधी? सूर्य उत्तर देतो - आम्हासही ह्या शायराची कीव केऊ लागते, ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते! अप्रतीम!