Skip to main content

महानंदा चित्रपटातील अस्वस्थ करणारा प्रसंग

लेखक शुचि यांनी शनिवार, 09/03/2013 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट इज नॉट आर्ट टिल इट डिस्टर्ब्स यु.
हे वाक्य म्हणून वाचायला बरे आहे. पण खरच अशी कला जेव्हा सामोरी येते, तेव्हा भयंकर वाटते. खूप वर्षांपूर्वी, खरं तर लहानपणी "महानंदा" हा चित्रपट पाहीला होता. दूरदर्शनवर लागला होता. अर्थातच सेन्सॉर केलेला होता. आज परत आपलीमराठी वर पाहीला. व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी आहे. जयवंत दळवींसारख्या सिद्धहस्त लेखकाची कथा असल्याने चित्रपट उत्तम असणार यात वादच नव्हता.

तंत्रज्ञान आणि स्वातंत्र्याचं शेकहँड - सिल्की मिल्की

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 08/03/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
खास महिला दिनानिमित्त नेस्ले कंपनी घेऊन येत आहे, त्यांचे ब्रँड न्यू अनुभव 'सिल्की मिल्की'. आजकालच्या स्पर्धेच्या युगात स्त्रियांना नोकरी मिळवण्यासाठी पुरुषांशी स्पर्धा करावी लागत आहे. कामाचा वेळ अधिकाधिक देता यावा म्हणून स्त्रियांना फक्त आपली कामासंदर्भात असणारी स्किल्स वाढवून चालत नाही. किती वेळ पोर्सलिनच्या सिंहासनावर घालवला हे जिथे मोजतात तिथे पुरुषाच्या दाढी करण्याच्या रेकॉर्ड कमी वेळेला टक्कर देत झटपट सॅनिटरी नॅपकिनही बदलावा लागतो. या जीवघेण्या स्पर्धेतून कोणीच सुटू शकत नाही. ज्यांना उन्नती करायची आहे, पैसा कमावायचा आहे, स्वतःचं नाव कमावायचं आहे त्यांना या स्पर्धेला तोंड द्यावंच लागतं.

फोन वापरताना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/03/2013 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
फोन वापरताना बरेच वेळा फोन ची कॉर्ड एकमेकात आडकते फोन येतो व आपण गडबडीत रिसिव्हर उचलतो अन कॉर्ड एकमेकात गुंतल्याने फोन पण रिसिव्हर सगट उचलला जातो अन गोंधळ उडतो. ते टाळण्या साठी एक साधी युक्ती. १..बाथरुम मध्ये वापरतो त्या रबरी नळी चा साधारण ३ " लांबीचा तुकडा घेणे (चित्र क्र .एक) . २.कॉर्ड काढुन त्यात हा रबरी नळिचा तुकडा साधारण मधोमध ओवणे (चित्र क्र .दोन )

वर्तुळ-कोन सिद्धांत

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 08/03/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
" 'वर्तुळ-कोन सिद्धांत' हा एक नव्याने पुढे आलेला विषय आहे. गेल्या साधारण सहा-एक वर्षांतील (माझ्या) अनुभवांवरून तो मला समजला. मग मी एक प्रयोग केला. त्या प्रयोगातून हा सिद्धांत शाबीत होतो, असे ध्यानी आले. तेव्हा त्या प्रयोगाची वारंवारिता वाढवली. काही प्रमाणे बदलली, आणि प्रयोग केले. याचवेळी माझ्या असेही ध्यानी आले की, काही जण (बहुदा अजाणता) असा प्रयोग करत असतातच. माझे प्रयोग आणि त्यांचे प्रयोग यातून असे दिसले की हा सिद्धांत शाबीत होत आहे.

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०४ : ट्रुम्सो – नॉर्दर्न लाइट्स् (ऑरोरा) डिनर क्रूझ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 08/03/2013 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

लेखक सुज्ञ माणुस यांनी शुक्रवार, 08/03/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट ---------------------------------------------- फोटो चा काय पंगा होतोय इथे कळत नाहीये. फोटो नाही दिसले तर हि लिंक उघडा : http://sagarshivade07.blogspot.in ------------------------------------------------ शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते. गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला.

सुदीन

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 07/03/2013 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
वेध घेत कल्लोळांचे जाहलो मलीन नाथा होऊ दे माथा चरणी तव लीन पोत कोवळ्या शब्दांचे वाहुनी कुलीन तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन चैन सुखी घडलो पडलो चाल दिशाहीन चाललो अथक पण झालो ध्येयाविण दीन शिणले गजबजलेले मन देह आता क्षीण तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन माघारी फिरते पाउल म्हणे ओळखीन दिसते ना कोणी तेथे पात्र ना जमीन अंधार्‍या गर्तेतुन ह्या किरण जागवीन तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन निळ्या अंबरी तार्‍यांचे चांदणे विभोर विरघळले अवघे कातळ नाहि शेष घोर अनुभूती आहे-नाही मीच देहहीन हेच गीत आहे राया हाच तो सुदीन ......................अज्ञात