Skip to main content

मिरची भजी

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 20/09/2022 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
च पाऊस तर काही जायचं नाव घेत नाही तेव्हा म्हटलं जे करायचे राहिले आहे.. ते मिरचीचे भजे आज करावे. अगदी झणझणीत!!! साहित्य: सात आठ कमी तिखट मिरच्या एक छोटी वाटी तांदळाचे पीठ एक मोठी वाटी डाळीचे पीठ जिरे ओवा, हिंग हळद चवीपुरतं मीठ हवा असेल तर खायचा सोडा मिरचीसाठी सारण- बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला. कृती: पहिल्यांदा मिरच्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात आणि मध्ये चिरून त्यातील बिया काढून घ्याव्यात. चिरलेल्या मिरच्या मीठ चोळून बाजूला ठेवाव्यात.

अबोला..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 20/09/2022 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या एका अबोल्यानं उदासली फुलदाणी. जीव झाला वेडापिसा आणि काळजाचं पाणी.. तुझ्या एका अबोल्याची कशी खुलावी रे कळी? सुचेनासे होते काही लोकं म्हणतात खुळी. तुझ्या एका अबोल्यात किती चंद्र गेले वाया.. अरे वेड्या, पाऊसही आता आला नं संपाया! तुझ्या एका अबोल्याशी आता माझाही अबोला, बघतेच किती वेळ झुलतो हा खेळझुला!

पोलिस मिरवणूकीत नाचले !!

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 20/09/2022 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cops-w… उन्माद भाव मनात साचले पोलिस मिरवणूकीत नाचले!! आयुक्त कुलवंत सरंगळ म्हणे हे सर्व आहे अमंगळ जास्त 'चूलबूल' करु नका 'पांडे' नाहितर सस्पेंड चे देवू डंडे. जास्त बनू नका गोविंदा व कान्हा कुठून आणायची सोनाक्षी सिन्हा?! आयुक्तांनी त्यांचे उपटले कान म्हणाले मी दबंग, तुम

सिंग वाज किंग

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 19/09/2022 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी : कॅप्टन अमरिंदर सिंग आज भाजपात प्रवेश करणार https://www.loksatta.com/desh-videsh/former-punjab-cm-captain-amrinder-… कॅप्टन अमरींदसिंग झाले अगवा हाती धरणार आता भगवा सिध्दूने लावली त्यांची वाट स्वत: उबवतोय जेल ची खाट सिद्धू ने भरले रागा चे कान पंजाबमधे आले भगवंत मान बलीष्ट कॅप्टनचा केला अपमान फुकटचंबू जनतेने दिला 'आप' ला मान वंशज त्यांचे राजघराणे पटियाला राजकारण हास्यजत्रा शो झाला 'पंजाब लोक काँग्रेस' भाजपात विलीन फुकटचंबू लोकांचं 'मत'परीवर्तन करीन खुशहाली

एका लेखाची चाळीशी

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 19/09/2022 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक : माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ३९ वर्षांपूर्वी लिहिला. तेव्हा मी नुकताच एमबीबीएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर एक वर्षे इंटर्नशिपचा कालावधी असतो. त्या काळी त्यापैकी सहा महिने ग्रामीण भागात राहायला लागायचे. मी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात माझे ग्रामीण प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वास्तव्याच्या अनुभवावर आधारित मी प्रस्तुत लेख लिहिला. तो नंतर कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला. यंदा त्या प्रथम लेखनाने चाळीशीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त तो लेख जसाच्या तसा इथे प्रकाशित करीत आहे.

भुताचा जन्म

लेखक सागरसाथी यांनी सोमवार, 19/09/2022 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
भुताचा जन्म.... शहरातल्या गजबजलेल्या भागातील मी जूनी चाळ अनेकांच्या सुखदुःखाची साक्षीदार होत गेली अनेक वर्ष उभी आहे.

दिंडी (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी रविवार, 18/09/2022 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिंडी (गूढकथा) दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.                 पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

रॉजर फेडरर- एक संयमी झंझावात

लेखक वझेबुवा यांनी शनिवार, 17/09/2022 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या टेनिस विश्वाला भुरळ पाडणारा नजाकतदार खेळाडू. गेल्या २० वर्षांत, जे लोक नियमित टेनिस पाहतात किंवा जे लोक केवळ ग्रँडस्लॅम पाहतात त्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता खेळाडू कोण असे विचारल्यास नक्कीच फेडरर हे उत्तर मिळेल. पीट सॅम्प्रस चं लयाला जाणार साम्राज्य याने बळकावले आणि हा टेनिस जगताचा नवीन सम्राट म्हणून उदयास आला. आधी विम्बल्डन बॉईज मध्ये विजेतेपद नंतर मुख्य विम्बल्डन मध्ये सेमीफायनलला सॅम्प्रसला हरवून हा प्रेक्षकांना खुणावू लागला. आणि मग पुढील वर्षी विजेतेपद पटकावल्यावर याने मागे वळून पाहिलेच नाही.