Skip to main content

पाकिस्तान तरणार का?

लेखक lakhu risbud यांनी बुधवार, 08/05/2013 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
तारेक फ़तह फाळणीच्या वेळी भारतातून यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला.शिक्षण पूर्ण झाल्यावर पत्रकार म्हणून काम करण्यास सुरवात केली परंतु त्यांच्या सेक्युलर दृष्टीकोना मुळे आणि धर्मांध प्रवृत्तींना विरोध केल्यामुळे त्यांना आधी सौदी अरेबिया आणि नंतर कॅनडा मध्ये स्थलांतरित होणे भाग पडले त्यांची Chasing a Mirage: The Tragic Illusion of an Islamic State आणि The Jew Is Not My Enemy: Unveiling the Myths that Fuel Muslim Anti-Semitism हि पुस्तके प्रसिद्ध आहेत.या पुस्तकांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

माझा बाप

लेखक अनिल तापकीर यांनी बुधवार, 08/05/2013 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
भासला माझा बाप मज वटवृक्षासमान देई आम्हास सावली,सोसुनी तप्त ऊन नाही आम्हास लागू दिली, दुखाची झळ लेकरे सुखात राहावी हीच त्याची तळमळ झिजला, कष्टला,राबला अपार धैर्याने रोखले संकटांचे डोंगर आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक गाउनी अभंग संतांचे मार्ग दाविला नेक

चिकन रोगनजोश

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 08/05/2013 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
chicken roganjosh चिकन रोगनजोश सामग्री: १/२ किलो चिकन १ छोटा चमचा लसूण पेस्ट ३ मोठे चमचे दही १ छोटा चमचा धने-जिरे पूड २ मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पूड मीठ चवीनुसार मसाला: १ कांदा ८ लसूण पाकळ्या १ सुकी लाल मिरची (कांदा, लसुन आणि मिरची ची पेस्ट करून घ्यावी) १ मोठा चमचा तेल १ छोटा चमचा धने-जिरे पूड १ छोटा चमचा बडीशेप पूड १ छोटा चमचा गरम मसाला पावडर १ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पूड अख्खा मसाला - १ छोटा चमचा जिरे १ छोटा चमचा काळी मिरी १ छोटा चमचा लव

माझी गझल निराळी

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 08/05/2013 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझी गझल निराळी

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी

एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची
सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी

लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे
जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी

युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी

गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही

वाद-संवाद

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 08/05/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मला उशीर झाला होता. माझी पत्नी एलीनॉर आणि मी सात वाजता रेस्टॉरंट मध्ये भेटणार होतो, पण मला चांगले साडेसात होऊन गेले होते. मला उशीर व्हायला क्लायेंटबरोबरची मीटिंग खूप वेळ चालण्याचं कारण झालं होतं. मी धावतपळत पोहोचलो आणि एलिनॉरला माझ्या उशीरा येण्याचं कारण सांगून टाकून 'सॉरी' म्हणून मोकळा झालो, "अगं खरं तर उशीर करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता." "तुझा हेतू कधीच नसतो रे!" अरे बापरे!

शूटआऊट @ वडाला

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 08/05/2013 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
काल काल शूटआऊट @ वडाला पाहिला अतिरिक्त भडक सीन आणि मध्यंतरपूर्वीचा संथ वेग वगळता बरा वाटला पण मन्या सुर्वे ची कहाणी अधिक परिणामकारक रित्या सांगता आली असती असे वाटले बॉलीवूड गुंडांचे ग्लोरीफिकेशन करतेय असा आरोप होत असला तरी दावूद ला टक्कर देणारा एकमात्र मराठी माणूस म्हणून मन्या बद्दल कुठेतरी हळवा कोपरा निर्माण होतो!

हादडाया दाही डिश्या

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 08/05/2013 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स समस्त मिपाकरहो, मिपाकाव्यरत्न "मोकलाया दाही दिश्या" वर काव्य कधी करू असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते. पण अखेरीस ही जिल्बी तळून तयार झालीदेखील!! खाली प्रेरणजिल्ब्यांचा उल्लेखही केला आहेच. वरिजिनलची सर याला नसणार हे मान्य आहेच, पण "राजहंसाचे चालणे" इ.इ. मुळे मुआफ करावे ही विणंती. निसतेले हाद पोलितुन ते मल कुन्वित आहे वास घेत्तो मोकले की मी आता हादे खात आहे एक द्य मज आनुन तुपल वफल हय्दराबादि बिरियनि मझि लळवलेलि जिभ भोगेल ति हजारो रुचिकल्कनि रत्रिच्य तिमिरत फोदलि कनकेचि अल्लद अवरने त्यन्सोबत गिरवी कुथाय? गिरवी कुथाय?
काव्यरस

आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?

लेखक nandan यांनी मंगळवार, 07/05/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनात खूप दिवसापासून एक प्रश्न घोळत आहे … आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ? मला वाटते कि आपल्या ह्या गुळमुळ आणी अति सामान्य राष्ट्राप्रेमामुळे आपल्या भारतात काहीही होऊ शकते. पहा हे असे होईल… उद्या सानिया मिर्झाला मुलगा झाला आणि ही बाई २० वर्षानी तलाक देऊन इंडिया मध्ये आली आणि हिचा मुलगा लोकाल एलेक्शन मध्ये उभा राहिला … कालांतराने जर हा हैदराबाद मध्ये एमलअे म्हणून निवडून आला. आणी कदाचित हाच पंतप्रधान म्हणून देखील निवडला जाऊ शकेल. जिथे एका राज्यापलीकडे कोणी ओळखत न्हव्ते त्या देवे गोडला पंतप्रधान केले ना वेळ आल्यावर ….

कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 07/05/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग...

अंधेरी ते वसई..एक छोटेखानी प्रकटन.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 07/05/2013 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही स्थानकं आणि काही आठवणी.. आज जरा अंधेरी ते वसई हा पश्चिम रेल्वेचा पट्टा आला डोळ्यासमोर.. अंधेरीची माधुरी दीक्षित..योगीनगर, अंधेरी पूर्व. अगदी योगीनगरच्या गणेशोत्सव मंडळातला माधुरीचा नाचदेखील आम्ही प्रचंड गर्दीत जाऊन पाहिला.. पुढे ती एकदा अंधेरीच्या विजयनगरीतल्या नेहमी चट्टेरेपट्टेरी हाफ प्यँन्ट घालून सा-या विजयनगरीत वावरणा-या गोखल्यांकडे आली होती. सौ गोखले आणि माधुरीची आई म्हणे काहीतरी चुलत की मावस बहिणी-बहिणी.. पुढे माधुरी जाम फेमस झाली आणि मग तिचं गोखल्यांकडे येणंही बंद झालं.. गोखले वारले तेव्हा फक्त ५ मिनिटं कारमधून येऊन चटईवर निजलेल्या गोखल्यांना बघून गेली म्हणे.. माधुरी ६८ सालची.