Skip to main content

आम्हा घरी धन..

लेखक मोदक यांनी रविवार, 26/05/2013 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी. खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. मी सुरूवात करतो.. ******************************************************** गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन... ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत.

एकुलती एक.....

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 25/05/2013 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
जर एखाद्या बिकनी घालणाऱ्या मुलीला नव्वारीत पाहिलं तर कस वाटेल? तसच काहीस होत.... या सिनेमाचे प्रोमो पाहताना जे चित्रपटाबद्दलचे पूर्वग्रह मनात तयार होतात, ते सगळे प्रत्यक्ष चित्रपट पाहताना पुसून जातात. सिनेमाची सुरवातच विमान उडण्यापासून सुरु होते. सचिनची (अरुण देशपांडे) आणि सुप्रियाची (नंदिनी देशपांडे) यांची एकुलती एक कन्या श्रीया (स्वरा) विमानाने मुंबईत तिच्या वडिलांना भेटायला १८ वर्षांनंतर येते. {पार्श्वभूमी : कथेतील अरुण देशपांडे प्ले बॅक सिंगर बनण्याकरता परिवार सोडून मुंबईत येतो. त्याची पत्नी चिडून त्याला डिव्होर्स पेपर्स पाठवते.

माहिती हवी आहे - पुण्यातील आयुर्वेदिक केंद्रे /निष्णात वैद्य

लेखक saishwari यांनी शनिवार, 25/05/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ही माझी मिपावर नवीन सुरुवात अहे. चू. भू. सांभाळून घ्यावी. काही दिवसांपूर्वीचा "आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या विषयाचा धागा आणि प्रतिक्रिया पहिल्या. मिपावर या विषयाचे बरेच जाणकार आहेत हे पाहून आनंद झाला. म्हणूनच या ज्ञानाचा फायदा मला आणि सर्वाना व्हावा म्हणून हा काकू. माझ्या घरी सर्वांना (मी,बहिण, भाऊ,आई ) संप्रेरक असंतुलनाचा (hormonal imbalance)त्रास आहे असे आढळून आले आहे. याची लक्षणे आम्हा भावंडांमध्ये खूपच समान आहेत जसे कि चेहऱ्यावर पुरळ येणे,केस गळणे,केस अकाली पांढरे होणे,जाडी वाढणे,वारंवार तोंड येणे, चिडचिड होणे, कोणत्याही कामात उत्साह नसणे.

कार्या लयात असताना.... ;)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/05/2013 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर .... कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे, केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे, क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ;) ) ''सुपार्‍या'' वाजविणे... असले जे काही ''जॉब-कार्ड'' संस्कृतितले प्रकार आहेत... ते मानवी मनाची कसोटी पाहाणारे असतात.
काव्यरस

चिली ऑनियन चसका

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी शुक्रवार, 24/05/2013 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तांदुळ, काश्मिरी लाल मिरच्या, तिखट लाल मिरच्या (दोन्ही मिरच्या मिळून १०० ग्राम) , मिठ., बारीक चिरलेला कांदा. तीन वाट्या तांदुळ स्वच्छ धुवुन दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. पाणि बदलण्याची गरज नाही. तिसर्‍या दिवशी तांदुळातील पाणी ओतून टाकून तांदूळ बारिक वाटून घ्या. दोन्ही प्रकारच्या मिरच्या पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या. आता वाटलेल्या तांदुळात तेवढेच पाणी, चिरलेला कांदा, मिरच्यांची पेस्ट, मिठ (जरा जास्तच) घालून गॅसवर ठेवा. उकड काढतो तसे. मधुन मधुन हलवत रहा पिठाची गुठळी होऊ नये.

इराण्याची हॉटेलं ..........

लेखक १००मित्र यांनी शुक्रवार, 24/05/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
कालच दादर टीटी ला होतो. पाहतो तर काय , तिथल्या [पुणे बस-स्थानकासमोरचं] इराण्याच्या जागेवर चक्क वामन-हरी-पेठे आले. एका कोप~यातलं मराठी उद्योजक [निरुद्योजक] मन सुखावलं-उगाचच. की मराठी माणूस सुद्धा टेक-ओव्हर वगैरे करू शकतो ई.ई. पण विषय तो नाही. त्या-निमित्तानी आठवली - नामषेश होत जाणारी इराणी हॉटेल्स ![वा.ह.पेठेंचं आम्हांस कौतूकच आहे - उगाच त्यांचा राग कशाला ?

एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 24/05/2013 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो.

Gnocchi न्यॉकी

लेखक स्पंदना यांनी शुक्रवार, 24/05/2013 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी मुलांना शाळेत सोडुन आले तर दारात डेव्हीड उभा. जरा त्रस्त. हा माझा शेजारी. वय वर्षे ८९. कॅन्सरन कृष झालेलं शरीर. एकेकाळी म्हणजे दुसर्‍या महायुद्धात एअरफोर्स मध्ये असणारा हा वैमानिक ब्रिटन मधुन ऑस्ट्रेलियन फोर्स मध्ये पाठवला गेला. जवळ जवळ सार जग फिरुन झालय याच त्या नोकरीत. फार मिश्कील प्राणी. सत्तावीस भाषेत तो You look beautiful! I love you! :-) म्हणु शकतो. का? कशासाठी? तर म्हणे जेंव्हा तेंव्हा फिरतीवर असल्याने पोरी गटवायला वेळ मिळायचा नाही म्हणुन जेथे जाइल तेथे ही दोन वाक्य शिकायची अन पोरींना इम्प्रेस करायच.

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने

लेखक दशानन यांनी गुरुवार, 23/05/2013 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची. मैं तैनू फ़िर मिलांगी कित्थे ?