थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्या महायुद्धातील एक पान --अंक २
भाग 1: http://misalpav.com/node/25241
पुजालोच्या खाजगी आयुष्याबद्दलः-
त्याने शाळा अर्धवट सोडली होती. अनेक लहानमोठी कामे तो शिकला होता. कधी हार्डवेअरच्या दुकानात काम कर तर कधी पोल्ट्री फार्म शिक असे त्याचे सुरु होते. वडलांनी मागे थोडिफार संपत्ती सोडली होती. पण स्पॅनिश युद्धादरम्यानच्या काळात तिथल्या कामगारांनी ताब्यात घेतली.
स्पॅनिश यादवी युद्धात एका बाजूला इटाली- नाझी समर्थित फॅसिस्ट गट होता, तर दुसरीकडे रशिया समर्थित कम्युनिस्ट होते.
मिसळपाव
