भीक न घालता कुत्रे कसे आवरावे ?
म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं.
ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे.
मिसळपाव
रायगड ट्रेक योजला. तिघांची टीम जमली. आमच्यासोबत पहिल्यांदाच येत असलेला, पण आमचा शाळेपासूनचा मित्र असलेला, आणि आमच्या तिघांपैकी खरंच 'शिवभक्त' असलेला अनिकेत.