तेल तिखटाचे झटपट चटकदार पोहे
ही एक अतिशय सोपी व झटपट होणारी (जास्तीत जास्त १० मिनिटे) पाककृती आहे. मी अनेकवेळा मुलांना संध्याकाळी ५-६ वाजता भुकेच्या वेळी असे पोहे चटकन करून दिले आहेत.
साहित्यः- (अंदाजे २ माणसांसाठी)
२-३ मुठी कच्चे कोरडे पोहे, २-३ चमचे गोडेतेल, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम आकाराचा टोमॅटो, १ चमचा साखर, चवीपुरते मीठ, १ चमचा तिखट, थोडेसे भाजलेले दाणे, थोडी चिरलेली कोथिंबिर, गरज भासल्यास थोडेसे फरसाण
कृती:- पोहे मावतील एवढे एखादे स्टीलचे पातेले पाण्याने विसळून घ्यावे. विसळल्यानंतर ते पुसु नये. त्यामुळे कच्च्या पोह्यांना किंचित ओलसरपणा मिळेल. त्यात कच्चे पोहे टाकावे.
मिसळपाव