आकाशातील गमती जमती- ८/११/२०२२ चे चंद्र ग्रहण!
✪ ८ नोव्हेंबर रोजी चंद्र ग्रहण- पूर्ण भारतातून दिसणार
✪ सहजपणे उघड्या डोळ्यांनी बघता येईल
✪ चंद्राच्या जवळच युरेनस- बायनॅक्युलरमधून सहज बघता येईल
✪ सौ फॉरवर्ड नॉलेज की, एक खुद के अनुभव की!
✪ मनोरंजक अनुभवातून विचारांना चालना
✪ ग्रहणात चंद्र लाल का दिसतो?
✪ माझं दु:ख सर्वांत मोठं! नक्की ना?
सर्वांना नमस्कार. मागच्या आठवड्यात झालेल्या सूर्यग्रहणानंतर येत्या पूर्णिमेला- ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी चंद्र ग्रहण दिसणार आहे. ह्या निमित्ताने सतत स्पर्धा आणि परफॉर्मंसचं दडपण असलेल्या मुलांना आणि मोठ्यांनाही एक वेगळा अनुभव घेण्याची संधी आहे.
योगी आदित्यनाथांची सापशिडी,पोलीस डिएसपी स केला शिपाई
https://www.lokmat.com/crime/yogi-adityanaths-snake-ladder-ups-corrupt-…
वजीर केला प्यादा
योगी आदित्यनाथांची सापशिडी
डिएसपी उतरला काॅर्पोरेट शिडी
पैसे खाल्ले रु. 5 लाख, भ्रष्टाचारापाई
पोलीस डिएसपी स केला शिपाई
सीएम आदित्यनाथांचा झिरो टाॅलरन्स
चुकीला माफी नाही, नो सेकंड चान्स
महाराष्ट्रालाही पाहीजे एक योगी
जागा दर्शवण्या ,जे नाही उपयोगी
हवालदारपरमजीतसिंह रिपोर्टींग सर
बक्कल नंबर-007 पावतीबूक सादर कर.
काव्यरस
सांजावता दाटते का तुझी आठवण?
सांजावता दाटते का तुझी आठवण?
जीवास या जाळते का तुझी आठवण?
होते तुझे गोड ते लाजणे ही
होते तुझे गोड ते हासणे ही
गेल्या सुखा माळते का तुझी आठवण?
वाऱ्यासवे शब्द येती तुझे हे
पर्णातुनी वाटते नांदती हे
गंधापरी वाहते का तुझी आठवण?
येती जशी पाऊले चांदण्याची
होते कशी काहिली ही मनाची
रातीस या भाळते का तुझी आठवण?
दीपक पवार.
काव्यरस
भाषा घडतांना
लेखक श्री. अविनाश बिनीवाले, त्यांच्या परवानगीने पुस्तकाचे प्रास्तविक आणि त्यातील दोन किस्से इथे मराठी वाचकांसाठी टाकतो आहे.
मूळ पुस्तक: भाषा घडतांना
संकल्पना-संशोधन-लेखन: श्री. अविनाश बिनीवाले
गौतमी प्रकाशन
किंमत: १३० रुपये
प्रास्तविक
भाषा म्हणजे बोली, लोकांकडून बोलली जाणारी भाषा ह्या अर्थानं भाषेचा विचार केला तर जगातल्या कोणत्याही भाषेत हळू हळू पण सातत्यानं बदल होत असतात.
जगणे
आला दिवस पुढे ढकलणे, जगणे नाही
मरणा आधी जगत राहणे, जगणे नाही.
जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ सारा
सावलीसाठी उन्हात पोळणे, जगणे नाही.
करार मदार सजावट कागदावरची
जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही.
होते ताटातूट किनारा आणि लाटांची इथे
पुळणीवरची नक्षी जपणे, जगणे नाही
हातावच्या रेघांना अर्थ नसतो प्रत्येक वेळी
नेहमी नशीबाला बोल लावणे, जगणे नाही.
----- अभय बापट
३१/१०/२०२२
काव्यरस
मद्रासकथा - १
तमिळनाडूचा इतिहास- शेवटचा भाग पासून पुढे
https://www.misalpav.com/node/50762
“आम्हा ब्राह्मणेतरांना ब्रिटीश असतानाच आपले हक्क मिळवावे लागतील. अन्यथा ही ब्राह्मण सत्ता कधीच संपणार नाही आणि आम्हा द्रविडांना कायम ब्राह्मणशाहीच्या जुलमात रहावे लागेल.
- ई व्ही रामास्वामी 'पेरियार' [१९२४ साली सालेम येथील भाषणात]
मी माझ्या लहानपणी एकदा बिहारमधील काँग्रेसच्या कार्यालयात गेलो होतो. त्या दिवसांत जगन्नाथ मिश्रा नावाच्या मुख्यमंत्र्यांचा शेवटचा काळ चालू होता. त्या जिल्हा कार्यालयात ब्राह्मणांचा मेळा लागला होता.
वॉल्डनकाठी विचार विहार (ऐसी अक्षरे मेळवीन-६)
वॉल्डनकाठी विचार विहार
लेखक – हेन्री डेव्हिड थोरो
अनुवाद –दुर्गा भागवत.

हॅलोविन हॅलोविन
कांतारा ए लेजेंड
कटाक्ष -
मुळ कन्नड चित्रपट
नाट्य, थरारपट
वेळ - २ तास ३० मिनिटे
हिंदी परभाषीकरण (डबिंग)
ओळख -
नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते.
मिसळपाव