Skip to main content

डोंबिवली कट्टा...अचानक.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 12/09/2013 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाची संकल्पना मिपावरील एका लेखावरून...पण शेवट थोडसा बदलून शनिवार दि. ७ सप्टेंबर २०१३ वेळ दुपारची. मी आपला मस्त पैकी भरतेट जेवून झोपलो होतो.आमची वामकुक्षीचीच वेळ ती.

3d visualisation : गणपती

लेखक स्पा यांनी गुरुवार, 12/09/2013 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती उत्सवात यावेळी गणपती बाप्पाचे visualisation करायचे ठरवले . आम्हाला काही खरी खुरी मूर्ती बनवता येत नाही, पण म्हटल खरं जमत नाही हरकत नाही ,3D मध्ये प्रयत्न करूयात. एक बेसिक मॉडेल नेट वर मिळाले, पण ते अगदीच raw होते , त्यात बरेच बदल करण्याची आवश्यकता होती. ते बदल केले . 3D फुलं आणि निरंजन वेगळी मॉडेल केली. निरांजनासाठी पितळ , आणि मूर्ती साठी तांबे .

एका काव्यप्रकाशन सोहळ्यात.....

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 12/09/2013 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : जातीपातीचा आणि आदरणीयांचा उल्लेख प्रसंगाच्या अनुषंगाने, सत्यम शिवम........!! .. . . बापानी आत्महत्या केली साहेब माझ्या.............मला पुढे काय बोलायचे तेच सुचेना........ . . . . उम्या शी मैत्री कधी, कशी आणि का जुळली ते कळलेच नाही...खर तर त्याला मी उम्या म्हणुन हाक मारत नव्हतो...उमेश कोठीकर अस भारदस्त नाव आणि तितकाच भारदस्त सरकारी हुद्दा असलेला, हा हसर्‍या चेहर्‍याचा मनुष्य कविता करतो, त्या ही वास्तवाशी निगडित, जळजळीत वास्तवाशी निगडित!!!

जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस !

लेखक psajid यांनी गुरुवार, 12/09/2013 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेचे बेताज बादशाह शंकर जयकिशन या जोडगोळी पैकी जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस ! आजच्याच तारखेला (१२ सप्टेंबर १९७१) वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी "जिना यहां मरणा यहां, इसके सिवा जाना कहां" म्हणणारा हा अवलिया यकृताच्या आजाराने हे जग सोडून निघून गेला. त्यांची आठवण येत असताना त्यांनी शैलेन्द्र, हसरत जयपुरी, वर्मा मलिक, नीरज, इंदीवर इत्यादी गीतकारांबरोबर संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर आणि आशयपूर्ण गाण्यांचा उल्लेख इथे मुद्दाम करावा वाटतो. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे या क्षेत्रातील आगमनानंतरचे करिअर घडवण्याचे कार्य त्यांना उत्तोमोत्तम गाणी गायला देऊन त्यांनी पूर्ण केले.

निरोप

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 12/09/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, जरा साताठ दिस म्या येला ट्रेकला जाऊन येतू, तंवर नीट करुन र्‍हावा, जास्त धूमशान करु नगा. मिपा बंद पाडू नका. मी ही ग्येले आन ही परतून आलेच! काय बाय मनात आल्येलं लिवल्यालं हाये. यमकं आणि बिमकं मिळेल का; न्हाईती तवा शोदू नये! ~ हुकूमावरुन (कोनाच्या म्हंजी?

नमस्कार! मला एका महत्वाच्या विषयावर मदत हवी आहे कृपया मदत करा…

लेखक अनंत छंदी यांनी गुरुवार, 12/09/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मला एका महत्वाच्या विषयावर मदत हवी आहे कृपया मदत करा… माझी आई वय वर्षे ७९, तिला २००४ साली एक हार्ट अटेक आला होता त्या नंतर यावर्षीच्या संक्रांतीपर्यंत तिला फ़ारसा त्रास झाला नाही अर्थात त्यासंबंधी गोळ्या नियमीत चालू होत्या.

माध्यमे आणि मोदीविरोध

लेखक इष्टुर फाकडा यांनी गुरुवार, 12/09/2013 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी दररोज मटा, लोकसत्ता आणि सकाळ (लोकसत्ता प्रामुख्याने) हि वृत्तपत्रे वाचतो/चाळतो. त्यातले मटा हे लेटेस्ट बातम्यांसाठी ('बातम्या' या शब्दाबद्दल मतभेद मान्य), सकाळ हे पत्रकारितेतल्या पक्षपातीपणाच्या प्रत्ययांसाठी आणि लोकसत्ता तुलनात्मक दर्जासाठी वाचत असतो. बातम्यांमधील मजकुरातून राजकीय पक्षांच्या धोरणात्मक हालचालीतून प्रेरित केली जात असणारी विधाने, कुरघोड्या, मारलेल्या कोलांट्या उड्या आणि उधळलेली मुक्ताफळे यातले भेद आणि समयोचित संधिसाधुपणा या गोष्टी मला track करायला आवडतात. पण गेल्या काही दिवसात माध्यमांमधील पक्षपातीपणा अचानक नागडेपणाने समोर येवू लागला आहे. असं मला वाटतं.

चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 12/09/2013 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥ कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला । मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥ न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥ मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे । कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥ न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥ प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया । धरून कायदा करी, खला शिकस्त देउया ॥ नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥ तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्

अभ्या निर्मित " मिपा" चे ब्यानर !

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 12/09/2013 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपा ला जसे नीलकांत प्रशान्त सारखे तंत्रज्ञ , तात्या, ई. एक्का, गवि, रामदास यांच्या सारखे लेखक,( आयला इतरांची नावे घेतली नाही म्हणून आमच्या नावाने श़ंख नको . बरेच आहेत हे "बेशर्त" कबूल !!! ) तसे सौ उ. स्पा व ( आणि डॉ, काशीनाथ घाणेकर या चालीवर ) अभ्या सोलापूर वाले सारखे ग्राफिक आर्टिस्ट लाभलेयत ! आपले नशीब दुसरं काय ! ( चांगल्या अर्थाने !) तर सांगायचं काय ! आपल्याला वेळोवेळी लागणारी ब्यानर वेळेत इथे लावणारे श्री अभ्या यांचे कवतिक उर्फ रसग्रहण ईई करण्यासाठी ह्या धाग्याचा उपदव्याप !

मोरया!

लेखक दशानन यांनी गुरुवार, 12/09/2013 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी आम्ही कोल्हापूरात नागराज गल्लीमध्ये राह्त होतो, मंडळाचा सुकाळ व माझा नवीन पोपट हा इत्यादी गाणी अजून तयार झाली नव्हती त्याच्या आधीची गोष्ट. लहानपणापासून मला विविध देवदेवतांचे जरा खासं आकर्षण होते, त्यांची चित्रविचित्र नावे, त्यांची वाहने, त्यांच्या अफाट अश्या विविध स्तरावरील निसर्गाला आपल्या ताब्यात ठेवणार्‍या शक्ती याचे मला अप्रुप होते. पण हे सगळे जाणत्या वयानंतर.. जेव्हा मला काही समजत देखील नसे तेव्हा पासून गणपती या देवतेच्या खूप प्रेमात आहे.