Skip to main content

सरडा आणि इतर क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 14/09/2013 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
सरड्यांकरता आता सुगीचे (निवडणुकीचे) दिवस आले आहे: लाल-पिवळा, हिरवा-निळा सरडा तुझा रंग कोणता? ज्या रंगाचा किडा, त्या रंगाचा चोला. शिकारी मी आला, रंगनिरपेक्षवाला. *चोला = वस्त्र **आला = मोठा (उदा: आला अधिकारी) (२) डोळे झाले अधू दिसत नाही दिल्ली. मिळेल कुठे तो जादूचा चश्मा दावेल मला जो लालकिल्ला. (३) द्विभाषिक क्षणिका शरीर असले जरी म्हातारे दिल अभी जवान है. वरेल का मला ती सुंदरी उम्मीद अभी कायम है.
काव्यरस

सुखकर्ता दुखहर्ता - एक विचार

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 14/09/2013 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम सर्व मिपाकरांना श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! भारतीय तत्वज्ञानामध्ये भगवद्प्राप्तीच्या अनेक मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. ह्या भक्तीमार्गामध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य नि आत्मनिवेदन अशा नऊ प्रकारच्या भक्ती किंवा मार्ग सांगितले गेले आहेत.

निर्भया

लेखक देशपांडे विनायक यांनी शुक्रवार, 13/09/2013 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
TV वर बातमी पाहिली . निर्भया ला न्याय मिळाला PIFF मध्ये पाहिलेला 38 WITNESSESसिनेमाची आठवण झाली एका CRIME चा उपयोग करून घेऊन , एका महान सत्याची प्रचीती शेवटच्या एका दृश्याने घडवणे,एका थ्रिलर सिनेमाचे रुपांतर एका वैचारिक सिनेमात करणे स्तिमित करून जाते . 38 WITNESSES ची गोष्ट [मला जशी समजली तशी ] पुढील प्रमाणे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर रात्री एका तरुणीचा खून होतो . त्या तरुणीचे ओरडणे हिरो ऐकतो . हिरोची बायको बाहेर गावी गेलेली असते ती येते तेंव्हा तिला खुनाबद्दल कळते . नवरा तिला सांगतो कि तो खून झाला त्या वेळेस घरी नव्हता . कामावर गेलेला होता . पोलिसांना तो हेच सांगतो .

गणेशाची स्थापना. मूर्ती एक की दोन ? लहान की मोठी ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 13/09/2013 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे. ज्याच्या नामामधे विघ्नसमुद्राचे अगस्तीप्रमाणे शोषण करण्याचे सामर्थ्य आहे आणि वेदान्ताचे ज्ञानही जो करुन देतो असे मानले जाते त्या गणपतीचा वार्षिक उत्सव सर्वत्र भक्तीभावाने साजरा होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळापासून ते घरगुती गणेशाच्या स्थापनेपर्यंत सर्वत्र आनंदी आनंद आहे गणेशोत्सवाच्या विविध परंपरा श्रद्धेने श्रद्धाळू पाळत असतात. गणपतीच्या उत्त्पत्तीबाबत अनेक कथा पुराणात सापडतात.

सिरीया (contains some disturbing images)

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 13/09/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे. सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती map असद समर्थक - दमास्कस मध्ये map अमेरिकाविरोधी घोषणा द

कॉकटेल लाउंज : कलुआ अ‍ॅलेक्झांडर

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/09/2013 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे कलुआ अ‍ॅलेक्झांडर पार्श्वभूमी:

बायकोकडून गीफ्ट मिळालेल्या कोन्यॅकचा वापर आतापर्यंत फक्त 2-3 मित्रांना टेस्ट करून देण्यापुरताच झाला होता. स्निफ्टर ग्लास आणि क्युबन सिगार नसल्याने मीही अजुन म्हणावी तशी कोन्यॅक चाखलीच नाहीयेय. कोन्यॅक वापरून कॉकटेल बनवायचे मनात होते पण योग जुळून येत नव्हता. आज बाजारात गेल्यावर अमुल फ्रेश क्रीम दिसले आणि एकदम कलुआ आणि कोन्यॅक (ब्रॅन्डी) आठवली. लगेच अमुल फ्रेश विकत घेतले आणि कलुआ अ‍ॅलेक्झांडर करायचे ठरवले.

तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 13/09/2013 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां मी आज दवाखाना उघडा ठेवला होता आज दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन त्यामुळे आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर ठणाणा बोंबलणारे कर्णे आणि धडा धडा वाजणारे ढोल ताशे याच्या आवाजाची कटकट होणार होती ती टळली. मी थोड्या विचारात होतो संपादक मंडळाने व्यनि करून एक लेख लिहिण्यास सांगितले होते. मुळात मी काही सिद्ध हस्त लेखक नाही तेंव्हा असा मनात आला की लेख लिहिणे माझ्याच्याने जमणारे नव्हते. चार पाच मिनिटे विचार करून डोके शिणले तेंव्हा म्हटले कि गाणी लावावी.

" किती अडवू मी अडवू कुणाला ... (विडंबन)

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 13/09/2013 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -) "किती अडवू मी अडवू कुणाला, आज सिग्नलहि का बंद झाला द्या हो बाजू चला, रस्ता सोडा मला" - आला ओरडत पोलीस आला ..... पावसाळी खड्ड्यांत, रस्त्याच्या काठी, पोलीस अवतरले नाही हसू गालात, नाचवती चिखलात, सर्वजण कुरकुरले पोलीस दिसतो दुरून, शिट्ट्या झाल्या फुंकून, साऱ्या ट्र्याफिकचा गोंधळ झाला .....
काव्यरस

गणपतीची आरती

लेखक gaikiakash यांनी शुक्रवार, 13/09/2013 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी- सध्या गणेशउत्सव सुरू आहे व त्याअनुषंगाने घरी गणपतीची आरती म्हटल्या जाते. आमच्याकडे ह्या आरतीमधे एक कडवे जास्त म्हटल्या जाते. मी हे कडवे फक्त विदर्भात किंवा तिकडच्या भागातुन स्थलांतरीत झालेल्या कुटुंबातच ऐकले आहे. ते कडवे असे आहे: चरणीच्या घाग-या रूणझूण वाजती। तेणे नादे देवा वाद्ये गर्जती ॥ ताता ठुमकत ठुमकत नाचे गणपती। ईश्वर पार्वती कौतुक पाहती ॥ जय.॥३॥ लंबोदर पीतांबर फणीवरबंधना। ह्या कडव्या आधी हे म्हटल्या जाते. जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी ही विनंती. कळावे, आकाश

"बहर" डॉक्टर श्रीश क्षीरसागर

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी गुरुवार, 12/09/2013 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
१००/१२५ वृक्षांची ओघवत्या शैलीत, सचित्र ओळख करून देणारे एक बहारदार पुस्तक. श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर सावली धरणाऱ्या "अजान" वृक्षा पासून संपूर्ण भारत भरातल्या गोड्या पाण्यावर तरंगणार्या "जलकुंभी" पर्यंत अनेक वृक्ष ,त्यांचे मूलस्थान, पर्यावर्णातील त्यांचे महत्व, महती आणि माहिती सांगणारे हे पुस्तक हातात घेतले कि ठेववत नाही. अत्यंत सुंदर अशी छायाचित्रे हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिठ्य आहे. नाशिकच्या दैनिक "गावकरी" मध्ये "बहर' याच नावाने यातील काही लेख डॉक्टरांनी प्रकाशित केले होते. वाचकांचा प्रतिसाद पाहून हे सर्व लेख पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले आहेत.