Skip to main content

(गेम)

लेखक धन्या यांनी बुधवार, 02/10/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्रेम गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! गेम झाली तर माणूस गेला नाही झाली तर माणूस वाचला गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एक टपकला की दुसरा दुसरा टपकला की तिसरा गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! लपायला अजिबात जंगल नाय सावली आहे ती वड पिंपळाची गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एकडे आहे मंद मोर ज्याला सापडत नाही लांडोर ! गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते!

माझ्यासारखे आयुष्य....

लेखक mohite jeevan यांनी बुधवार, 02/10/2013 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात आपल्याला खुप काही मिळते ,ते टीकवने सुद्धा तीतकच महत्त्वाचे आसते. कोणाला वाटणार नाही आयुष्य आपले चांग़ले पाहीजे,पण दुसर्याचे आयुष्य आपल्यासारखे चांग़ले व्हावे आशी दुवा करणारा किशन हा आईवडीलाचा एकुता एक मुलग़ा होता,त्याचे वडील सरकारी आँफीसर होते.भरमसाठ वडीलाच्या पग़ारामुळे त्याचे आयुष्य ऐश आरामात जात होते,तरुणपणि त्याला काय पाहीजे ते मिळत आसे,घरच्याचा सग़ळ्याचा लाडका होता तो.

हिरा १

लेखक साऊ यांनी बुधवार, 02/10/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
दुपट्यातल्या तिला, पाळण्यात घालताना काय विचार करुन तिचं नाव ठेवल गेल असेल देव जाणे, पण त्या नावासारखे तिला अनेक पैलु होते, हे मात्र खरं आणि तो प्रत्येक पैलु पडताना होणार्‍या वेदनाही होत्या. कधीतरी धुसर बाळपणात, पप्पांच्या माग लागुन शेतावर जाताना, पप्पांनी मध्येच गल्लित थांबुन "हिराबाई, जरा ताईंना बोलवा" अस हाकारलं आणि त्या दगडी जोत्याच्या घरातुन 'आऊ' बाहेर आली. तेंव्हा मी तिला फारस निरखलं नसाव, कारण आठवतय ते फक्त तिच्या अंधार्‍या घरातल्या खिडकीत बसुन खाल्लेला गुळ अन त्या चुलीच्या प्रकाशात चमकणारी तिच्या नाकातली मोरनी! "या आऊ!" अस पप्पा तिला थोडस आदराने बोलवत.

यष्टी

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 01/10/2013 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
परवापासून घरात, साळंत “यष्टी येणार” बोल्तेत. गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले. आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात. राती भाकरी हाणली की माजे डोळे गपागपा मिटत्यात. आण्णा म्हन्ले, “अन्जाक्का, झोपू नका. आपण एसटी पहायला जाऊ” “अंदारात दिसाचं नाय; सकाळी जाऊ” असं म्या बोल्ले तर आजीबी हसाया लागली. चावडीवर पोरंसोरं, आजीसकट झाडून समद्या बायाबी आल्यता. मान्सं तमाकू थुकत व्हती. बत्तीच्या उजेडात म्या आण्णांच्या मांडीवर जाऊन बसली. ते ‘विकास व्हणार, गाव सुदारणार’ म्हनत व्हते. जोरात आवाज आला.

ओदिशा - ४ : झुकलेले शिवमंदीर आणि हिराकूड धरण

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 01/10/2013 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा - १ ओदिशा - २ ओदिशा - ३ १९-११-२०११. संबळपूरला काय पाहायचे ते ठरले होतेच. हिराकूड धरण आणि हुमा येथले झुकलेले शिवमंदीर. ते पाहून लौकरात लौकर कटक किंवा भुवनेश्वरला पोहोचायचे होते. त्या गाडीची किंवा बसची व्यवस्था देखील करायची होती. सकाळी न्याहारी मुख्य शहरातच करायची. मग फिरायला गाडी ठरवून बसेसची चौकशी करायची असे ठरले. ‘टेंपो’तून उतरलो तिथे ट्रॅव्हल कंपन्यांची कार्यालये हारीने लागलेली होती.

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - १ (इंटरनेटचा उदय)

लेखक नानबा यांनी मंगळवार, 01/10/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट.. गेल्या काही वर्षांत बहुधा सर्वात जास्त वापरलं गेलेलं आणि बोललं गेलेलं प्रकरण. इंटरनेटशी जोडला न गेलेला माणूस आणि डोंबिवली ते सीएसटी रेल्वे प्रवासात शेजारी बसलेल्या अनोळखी स्त्रीसोबत एक अक्षरही न बोलणारी स्त्री सापडणं निव्वळ अशक्य. इंटरनेट ने जग जवळ आणलं म्हणतात ते खोटं नाही. पूर्वी घरातला कोणी परदेशी गेला, की त्याच्या फ़ोनची वाट पाहत रात्री उशीरा पर्यंत जागं राहणं, आंतरराष्ट्रीय पोस्टकार्डाची वाट पाहणं इ इ. प्रकार या पठ्ठ्याने बघता बघता नाहीसे केले.

सत्यनारायणजी गोयंका यांचे निधन.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 01/10/2013 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना या तंत्राला भारतात आणण्याचे आणि त्याचे पूर्णपणे भारतीय करणारे श्री गोयंका गुरुजी यांचे निधन झाले आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटी याच्या बळावर जग विधायक पद्धतीने बदलता येते याचा आदर्श म्हणून मी गोयंका गुरुजी यांच्याकडे पाहतो. विपश्यना या तंत्राचा सर्वलोकांना लाभ होवो हिच गुरुजींना श्रध्दांजली असेल.

रसिकांतले काही 'अग्रणी'

लेखक तिमा यांनी सोमवार, 30/09/2013 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच, पार्ल्याच्या एका संस्थेत, लताच्या रागदारीवर आधारलेल्या गाण्यांवर एक सुंदर कार्यक्रम झाला. सादर करणारे , स्वतः रागदारी गाणारे होते. एकेक राग थोडक्यांत गाऊन, त्यानंतर त्यावर आधारित लताचे हिंदी चित्रपटातील एक गाणे लावत होते. हजार रसिकांचा श्रोतुवर्ग, तल्लीन होऊन कार्यक्रमाचा एक भागच बनले होते. अतिशय सुंदर अनुभव होता तो. माझ्या बाजूला एक वृद्ध सरदार बसले होते. निव्वळ गाण्याच्या आवडीने ते लांबून आले होते. रागाचे नांव सांगितले की, कुठले गाणे लावणार, याचा त्यांचा अंदाज वाखाणण्यासारखा होता. काहीही ओळखपाळख नसताना ते माझ्याशी मोकळेपणे संवाद साधत होते.

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक एच्टूओ यांनी सोमवार, 30/09/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

सुपर स्ट्रेसबस्टर

लेखक तिमा यांनी सोमवार, 30/09/2013 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझा भाचा, गेले वर्षभर कुठलातरी संगणक कार्यक्रम लिहित होता. काय ते पत्ता लागू देत नव्हता. परवा माझ्या वाढदिवसाला तो आला आणि एक छोटा पेन ड्राइव्ह भेट देऊ लागला. मी विचारले, " हे काय आहे ?", त्यावर तो हंसून म्हणाला," मामा, तुला ही सरप्राइज गिफ्ट आहे. हल्लीच्या आसपासच्या अनेक घटनांमुळे तू वैतागलेला असतोस ना ? म्हणून तुझ्यासाठी हा स्ट्रेस्-बस्टर गेम आहे. तू वापरुन बघ, तुला आवडला तर तुझ्या वयाच्या लोकांसाठी मी तो लाँच करीन." दुसर्‍या दिवशी मी तो संगणकावर उतरवला. बरोबर एक त्रिमिती दिसावे, म्हणून डोळ्यावर चढवण्याचा एक स्पेशल गॉगलही होता. त्याच्या वायर्स संगणकाला जोडल्या. व्वा! काय छान प्रकार होता.