Skip to main content

जॉर्डनची वारी भाग २ - जेराशची सफर

लेखक सौरभ_बडे यांनी शनिवार, 09/11/2013 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
जॉर्डन ची वारी भाग 1 आज लिहायला बसलो आणि काय लिहू आणि काय नको असे झाले. इतका मोठा ,रोचक इतिहास आणि तो बघताना आलेले अनुभव आपल्याला भारावून टाकतात. डोक्यात विचारांचा नुसता कल्लोळ माजलाय. ही सगळी माहिती संरचित स्वरुपात मांडणे अवघडच जाणार आहे. असो . प्रयत्न करतो. जॉर्डन विषयी थोडेसे: जॉर्डन (अधिकृत नाव जॉर्डनचे हशेमाईट राजसत्ताक ) हा मध्यपुर्व आशिया मधील एक राजसत्ताक देश. इस्राईल , पॅलेस्टाईन, सिरीया ,ईराक आणि सौदी अरेबिया असे शेजारी लाभलेला हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला आहे.

आनंद - कार्लसन सामना - डाव १

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 09/11/2013 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३ आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात! कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे.

मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 09/11/2013 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मालिकेचे नाव : महाभारत निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * ) संगीत दर्जा : उत्तम ( * * * * ) पुनर्प्रसारणाबद्दल : सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

"वेडी"

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 09/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
येताजाता शिव्या सारख्या गाड्यांवरती दगड मारते जरतारीच्या आवेशाने लक्तर दैवी ती सावरते केस पांढरे - जटाच भारी मिचमिच डोळे लुकलुकताना तोंड चालते हातांसोबत तारस्वराने ओरडताना येणारा अन् जाणाराही वाट वाकडी दुरून करतो मधमाश्यांच्या मोहोळाशी कोण कशाला उगाच भिडतो? हसते वेडी सदा मुखाने आनंदी परि कधी न दिसते मूल पाहुनी कुणी गोजिरे तळमळताना अश्रू पुसते स्थळकाळाशी तुटले नाते एकच आठव गतकाळाचे रहदारीने ठोकरलेल्या शिशुदेहाच्या कलेवराचे प्रेत टांगुनी वेशीवरती कुणी चौकशी, कुणी सांत्वना दुःखामागे धिंडवड्यांच्या नको जाहल्या उरी यातना वेड पांघरुन विसरू पाही दैवगतीची बधिर कहाणी जगत

कल्पिते

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 08/11/2013 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कल्पिते कथा मनी जळी स्थळी अंग जाळिते व्यथा उजाडते कळी जाणिवा उण्याच का बुडून त्यात पोकळी वंचना किती कशा दिशा न एक मोकळी कोष्टकेच जुंपली व्यापली कुळी झुंझली अनंग रोम रोम पाकळी अंतरी उदंड कंड बंड कोश वादळी थांग छिन्न बंद मुका ओहटी तळी का कुणी कुणास जोजवावे उरी अकारणे कशास आठवावे तरी व्याध वेध घेत धाव धावतो परी मिळेल जे मिळूनही रितीच टोकरी ……………… अज्ञात
काव्यरस

नवा करार

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 08/11/2013 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
परिस्थिती गंभीर होती विद्रोहाच्या ज्वाळा भडकल्या होत्या बंडखोरांच्या फौजा वेशीवर येउन थडकल्या होत्या आटपाट नगरातील राजघराणे अंतीम घटका मोजत होते पुनरुत्थानाच्या सर्व शक्यता अखेरच्या ते शोधत होते एक गट वेगळा निघाला विद्रोह्यांना जाउन मिळाला बंडखोरांच्या मदतीने सत्तेवर प्रस्थापित झाला बेदखल गटाने विजनवासात प्रतिज्ञा बदल्याची केली असंतुष्ट प्रजेच्या मदतीने पुनश्च सत्ता काबीज केली लढाई सतत सुरूच होती आज विजयश्री ह्याची उद्या सरशी त्याची सत्ता डगले बदलत होती रक्तपात नित्याचा झाला प्रजा विटली संहाराला ओळखून प्रजेच्या रोषाला दोन्ही गट बसले वार्तेला घमासान वाटाघाटीं नंतर सर्वमान्य तोडगा नि

स्त्रीशिल्पे

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/11/2013 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीशिल्पे......... जग निर्माण झाले त्या काळात.... सृष्टी जवळ जवळ तयार झाली होती. त्या श्रेष्ठ निर्मात्याला आढळले की त्याच्याकडील सर्व तत्वे ही सृष्टी निर्माण करतानाच संपली आहेत.

झोपलेले बर्फ

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 08/11/2013 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात कोणत्याही संवादाचा पाया असतो समोरच्याचे प्रथम ऐकून घेणे. काही व्यक्ती समोरच्याची मते आणि विचार दडपण्याचा प्रयत्न करतात. ते असे लोक असतात ज्यांना स्वत:ची मते आणि गृहीतके बदलण्यात स्वारस्य नसते, जी चुकीची असू शकतात. असे लोक एका खोट्या गृहीतकाच्या आधारे जगतात की ते नेहमी बरोबरच असतात आणि तेच नेहमी बरोबर असतात. असा व्यक्ती ज्याला समोरच्याचे ऐकायचेच नसते ते यासाठी की त्याला भीती वाटत असते की समोरच्याचे ऐकले तर त्यातले पूर्ण किंवा काही भाग स्वीकारावा लागेल आणि स्वत:च्या मनातल्या काही चुकीच्या गृहीतकांना धक्का बसेल.

होतीच तशी वेळ

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 08/11/2013 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
होतीच तशी वेळ, तिचं बोलावणं आलं होतं सगळी कामे दूर सारुन ,जाणं भागच होतं ठरवलेल्या ठिकाणी ,वेळेआधीच गेलो कोपर्‍यात एका, तिची वाट बघत उभा राहिलो इतक्यात नजर समोर गेली आणि मनाची खुण पटली इंद्रधनुषी रंग फुलवत,माझ्याकडे ती आली सुचेना काय बोलु, सुरुवात तिनेच केली काहीतरी चुकत होते, गालावर तिच्या नव्हती लाली संपताच तिचे बोलणे,पाठ फिरवुन गेली दूर जाणारी पावले,अश्रुंनी दिसेनाशी झाली आणि काय सांगू,बाजुने वाहता रस्ता मध्ये सुन्न होउन, मी उभा नुसता

mobile बद्दल मदत / मार्गदर्शन

लेखक Madhavi_Bhave यांनी शुक्रवार, 08/11/2013 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रश्न मिसळपाव वर विचारू शकतो कि नाही ते मला माहित नाही, पण मला मार्गदर्शन हवे आहे आणि मिसळपाव मंडळींसारखी योग्य माहिती दुसरे कोण देणार? मला mobile घायचा आहे. बजेट रु. १५००० ते १७०००/- पर्यंत आहे. मला शक्यतो चांगला कॅमेरा व सुस्पष्ट आवाज पाहिजे. इंटरनेट fast हवे जे mainly मला office mails वगैरे check करण्यासाठी पाहिजे. Whatsapp इत्यादी मी वापरते पण म्हणून मी काही youtube फ़ैन वगैरे नाही अहे. कधीतरी गाणी ऐकायला चालतात. चांगली memory हवी आहे कोणतरी nokia लुमिया घे म्हणून सांगतय, कोण samsung ला पर्याय नाही म्हणते तर कोण Micromax घे म्हणून सांगत आहे.