Skip to main content

बदला

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 10/11/2013 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्‍या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती.

स्वच्छ मन

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 10/11/2013 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली. तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते. शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरी

आनंद - कार्लसन - डाव २

लेखक चतुरंग यांनी रविवार, 10/11/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली! असो डावाकडे वळतो. बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे.

मोदींच्या स्तुतीची किंमत?

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 10/11/2013 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारतरत्न लता मंगेशकरांनी मोदींचे जाहीर कौतुक केले आणि त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य केल्यापासून सरकारी वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळली आहे की काय असे वाटते. ही बातमी पहा http://maharashtratimes.indiatimes.com/nation/VIPs-named-kin-for-Padma-… पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे. आता ह्या पुरस्काराकरता लोक आपले वजन वापरतात हे एक उघड गुपित आहे. नाहीतर सैफ अली खान ह्याला पद्मश्री मिळण्याचे काय कारण?

मधल्यामध्ये....

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 10/11/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एक नाग पलंगाच्या डोक्याकडच्या भागाकडे वळवळत होता आणि खाली सासूबाई फुल टू पसरल्या होत्या. फुल डेडली सिचुएशन, माझ्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. नागाला शुक शुक केले... एक क्षण दुर्वासमुनींना जसा समाधी भंग केल्यावर आला असता तसा त्याला राग आला जोरात फुत्कारून काय घेतले, शेपाटीपण वेळावली पण मी जीवावर उदार होऊन त्याला म्हंटले "अरे हीच संधी आहे चाव त्यांना (हो मी त्यांच्या मागेही आहोजाहोच करतो ) डसून घे".... पण ह्याक....तो शांत होता जरा वेळाने निघाला तेव्हा त्याला म्हंटले " तू पण घाबरलास ना ??!!!!! मग कशाला बसलास जाऊन त्यांच्या डोक्यावर ?

प्रवास

लेखक भारी समर्थ यांनी रविवार, 10/11/2013 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात अंधुक दिसते वाट कठिण अशक्य प्रचंड घाट परि न टेकुनी किंचीत पाठ एकच बांध तु निश्चयगाठ चालत रहा रे चालत रहा रविकिरणांची घेऊन साथ अडेल तेथे घालून लाथ फुलात शोधुन न्यारी बात फळे यशाची चाखीत खात चालत रहा रे चालत रहा इथे प्रवासी तु न एकटा नवे सवंगडी, नविन वाटा गाठलेस जरी अपुल्या ध्येया नवशिखरे तु चढुनी जाया चालत रहा रे चालत रहा

HARRY HARLOW ची माकडं आपल्याला काय शिकवितातं !

लेखक कुमारकौस्तुभ यांनी शनिवार, 09/11/2013 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
हॅरी हार्लो ची थोडी पार्श्वभुमी हॅरी हार्लो या महान मानसशास्त्रज्ञाचा जन्म १९०५ मध्ये फ़ेअरफ़ील्ड काउंटी आयोवा येथे झाला.याने ग्रॅज्युएशन रीड कॉलेज मधुन पुर्ण केल्यावर हा स्टॅनफ़ोर्ड या प्रसिद्ध युनिव्हर्सीटी त मानसशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.हार्लोने सुरुवातीला लेविस टर्मन या प्रसिद्ध संशोधकाच्या हाताखाली उमेदवारी केली. लेविस हा त्या काळात gifted child मध्ये असलेल्या बुद्ध्यांका वर I.Q.

संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

लेखक उद्दाम यांनी शनिवार, 09/11/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे. http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला. मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले.

काश्मीर प्रश्न, नेहरु, माऊंटबॅटन वगैरे

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 09/11/2013 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
२६ ऑक्टोबर १९४७. हिंदूस्थानच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस. जम्मू-काश्मीर हे राज्य भारतात विलीन झाले. पण जम्मू-काश्मीर म्हटलं की काही लोक नेहरु, लेडी माउंटबॅटन, युनोत प्रश्न नेणे याच गोष्टी रवंथ करत बसतात. त्यापलिकडे चर्चा जातच नाही. JK म्हणूनच आज जम्मू-काश्मीरबाबत काही माहिती, विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. १. राज्याचे नाव 'जम्मू-काश्मीर' असे आहे. नुसते काश्मीर नाही. म्हणून इथून पुढे तसाच उल्लेख करुया. २.

आहे मी ब्राह्मण!! मग??

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/11/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं. "ब्राह्मण!!" "वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या. नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये.