Skip to main content

प्रवास

लेखक भारी समर्थ यांनी रविवार, 10/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात अंधुक दिसते वाट कठिण अशक्य प्रचंड घाट परि न टेकुनी किंचीत पाठ एकच बांध तु निश्चयगाठ चालत रहा रे चालत रहा रविकिरणांची घेऊन साथ अडेल तेथे घालून लाथ फुलात शोधुन न्यारी बात फळे यशाची चाखीत खात चालत रहा रे चालत रहा इथे प्रवासी तु न एकटा नवे सवंगडी, नविन वाटा गाठलेस जरी अपुल्या ध्येया नवशिखरे तु चढुनी जाया चालत रहा रे चालत रहा
लेखनविषय:

वाचने 911
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

क्या बात है ! सही !

छान.

उत्तम अग्निपथ मधील कवितेची आठवण झाली............